Naresh Mhaske (@nareshmhaske) header
Naresh Mhaske (@nareshmhaske) profile picture

• खासदार - ठाणे लोकसभा मतदारसंघ • महाराष्ट्र प्रदेश समन्वयक, प्रवक्ता शिवसेना • शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख • माजी महापौर, ठाणे #ShivSena

Thane
Joined May 2014
Photo by Naresh Mhaske (@nareshmhaske)Photo by Naresh Mhaske (@nareshmhaske)Photo by Naresh Mhaske (@nareshmhaske)Photo by Naresh Mhaske (@nareshmhaske)Photo by Naresh Mhaske (@nareshmhaske)Photo by Naresh Mhaske (@nareshmhaske)Photo by Naresh Mhaske (@nareshmhaske)Photo by Naresh Mhaske (@nareshmhaske)Photo by Naresh Mhaske (@nareshmhaske)Photo by Naresh Mhaske (@nareshmhaske)
खासदार क्रीडासंग्राम सीझन २ अंतर्गत आनंद भारती समाज मैदान, चंदनी कोळीवाडा, कोपरी, ठाणे येथे आयोजित मल्लखांब स्पर्धेचा शुभारंभ माझ्या उपस्थितीत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. मल्लखांब हा केवळ खेळ नसून आपल्या संस्कृतीचा, परंपरेचा आणि शारीरिक सामर्थ्याचा वारसा आहे. या स्पर्धेत सहभागी झालेल्या खेळाडूंनी आपल्या चपळाई, ताकद, संतुलन आणि कौशल्यपूर्ण सादरीकरणातून मल्लखांब खेळाची सुंदर अनुभूती दिली. यावेळी मल्लखांब असोसिएशनचे पदाधिकारी, पंच आणि आयोजकांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. ठाणे शहरात मल्लखांब या पारंपरिक खेळाचा अधिक व्यापक प्रसार व्हावा, नव्या पिढीने या खेळाकडे आकर्षित व्हावं आणि अधिकाधिक खेळाडूंना प्रशिक्षण व स्पर्धेच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, याबाबत सकारात्मक चर्चा केली. खासदार क्रीडासंग्रामसारख्या उपक्रमांमुळे स्थानिक खेळाडूंना आपली प्रतिभा दाखवण्यासाठी हक्काचं व्यासपीठ मिळत असून, पारंपरिक खेळांना नवी ओळख आणि क्रीडा संस्कृतीला नवी दिशा मिळत आहे. खेळाडूंच्या मेहनतीला प्रोत्साहन देत, आपल्या मातीतल्या खेळांचा वारसा जपण्यासाठी आणि ठाण्याला क्रीडा क्षेत्रात अधिक सक्षम बनवण्यासाठी असे उपक्रम सातत्याने राबविण्यात आले पाहिजे. या कार्यक्रमाला महापौर शर्मिला पिंपळोलकर, सभागृह नेते हनुमंत जगदाळे, उपायुक्त मीनल पालांडे, कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, नगरसेविका मालती पाटील, नम्रता पमनानी, माझी परिवहन समिती सदस्य प्रकाश कोटवाणी, विभागप्रमुख संतोष बोडके, माजी सभागृह नेते कृष्णकुमार कोळी, महिला आघाडीच्या विभागप्रमुख मनीषा शिंदे, निर्मला काळे, माजी परिवहन सदस्य, आनंद भारती समाज ठाण्याचे प्रल्हाद नाखवा, अरविंद कोळी, हरेश्वर मोरेकर, कमलाकर कोळी, रोहित पिंपळकर यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, महिला शाखाप्रमुख, उपविभागप्रमुख, अधिकारी, कर्मचारी आणि मान्यवर उपस्थित होते. #nareshmhaske #KhasdarKridaSangram #MallakhambCompetition #TraditionalIndianSports #ThaneSports #SportsDevelopment
1
86
विडा आणि कापसे पैठणी यांच्या वतीने सी.के.पी. हॉल येथे आयोजित करण्यात आलेल्या लग्नसराई विशेष प्रदर्शनाला भेट दिली. या प्रदर्शनात लग्नसराईसाठी खास साड्या, आकर्षक पैठणी आणि विविध पारंपरिक वस्त्रांचा सुंदर संग्रह पाहायला मिळाला. प्रसिद्ध पत्रकार ज्ञानदा कदम यांनी या प्रदर्शनाचं आयोजन करून मराठी उद्योजकांना आणि त्यांच्या व्यवसायाला एक उत्तम व्यासपीठ उपलब्ध करून दिलं आहे. कापसे पैठणी हे पैठणी उत्पादन क्षेत्रातील एक नाव असून, मराठी उद्योजकांनी आपल्या कष्टातून उभ्या केलेल्या व्यवसायाला प्रोत्साहन मिळणं ही निश्चितच अभिमानाची बाब आहे. या प्रदर्शनाला महिला वर्गाचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असून, खरेदीसाठी महिलांची उत्स्फूर्त उपस्थिती पाहायला मिळत आहे. ठाण्यात अशा प्रकारचं प्रदर्शन आयोजित करून मराठी व्यावसायिकांना प्रोत्साहन देण्यासोबतच ग्राहकांना पारंपरिक वस्त्रांची खरेदी करण्याची उत्तम संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल ज्ञानदा कदम आणि कापसे पैठणीचे आयोजक यांना या सुंदर उपक्रमासाठी शुभेच्छा देत अभिनंदन केलं. #nareshmhaske #PaithaniSarees #KapsePaithani #MarathiEntrepreneurs #WeddingCollection #ThaneExhibition
1
7
1,796
ठाणे तेलुगू महासभेच्या वतीने आयोजित श्री व्यंकटेश्वर स्वामी पुष्पयाग महोत्सव आयोजित करण्यात आला होता. या महोत्सवात उपस्थित राहून श्री व्यंकटेश्वर स्वामींचं दर्शन घेतलं. तेलुगू समाज हा नेहमीच आमच्या सोबत राहिला असून, प्रत्येक वेळी ठामपणे पाठिंबा देत सामाजिक कार्यात आणि ठाण्याच्या विकासात मोलाचं योगदान देत आला आहे. ठाण्याच्या प्रगतीमध्ये तेलुगू समाजाचाही महत्त्वपूर्ण वाटा आहे. त्यांच्या प्रेमाबद्दल, विश्वासाबद्दल आणि सातत्यपूर्ण सहकार्याबद्दल संपूर्ण तेलुगू समाजाचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले. तसेच या धार्मिक सोहळ्याचं उत्कृष्ट आयोजन केल्याबद्दल ठाणे तेलुगू महासभेचे ए. व्ही. गुप्ता, डेव्हिड एच. प्रसाद, एम. जगदीश, व्ही. शिवकुमार, व्ही. पद्मजा, व्ही. मंजुळा आणि संपूर्ण समितीचं मनःपूर्वक कौतुक केलं. #nareshmhaske #VenkateswaraSwamy #Pushpayagam #ThaneTeluguMahasabha #TeluguCommunity #ThaneCulturalHeritage
1
1
198
लोकसत्ता प्रस्तुत ‘अभिजात लीट फेस्टिव्हल’च्या निमित्ताने ठाण्यात आयोजित करण्यात आलेल्या या साहित्यिक आणि सांस्कृतिक सोहळ्यात सहभागी होत विविध साहित्यिक, विचारवंत आणि मान्यवरांशी संवाद साधण्याची संधी मिळाली. आयुष्य उत्तम जगायचं असेल, तर उत्तम विचारांची गरज असते आणि हे विचार साहित्य, संस्कृती आणि ज्ञानाच्या माध्यमातूनच समृद्ध होत असतात. संत नामदेव महाराजांनी ‘नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी’ या अभंगातून ज्ञानाचा प्रकाश समाजात पोहोचवण्याची भावना व्यक्त केली. त्याच भावनेतून लोकसत्ता परिवाराने साहित्याच्या माध्यमातून विचारांचा ज्ञानदीप समाजात प्रज्वलित करण्याचं काम केलं आहे, याबद्दल लोकसत्ता संपादक श्री. गिरीश कुबेर आणि लोकसत्ता परिवाराने ठाणेकरांसाठी अशा सुंदर उपक्रमाचं आयोजन केल्याबद्दल ठाणेकरांच्या वतीने त्यांचे मनःपूर्वक आभार मानले. आज प्रख्यात अर्थतज्ज्ञ, संशोधक आणि वारकरी संप्रदायाचे अभ्यासक ह. भ. प. अभय टिळक यांच्या कीर्तनाचं आयोजन करण्यात आलं होतं. अर्थशास्त्राचा अभ्यास, संशोधन आणि वारकरी संप्रदायातील कार्य यांची सुंदर सांगड घालत ज्ञानप्रसार, मनाची शुद्धता तसेच परमार्थ आणि व्यवहार यांचा समन्वय साधण्याचे कार्य ते करत आहेत. त्यांच्या या वैचारिक आणि आध्यात्मिक योगदानाबद्दल त्यांचा माझ्या हस्ते सत्कार करण्यात आला. वाचनसंस्कृतीला प्रोत्साहन देणं, साहित्याची गोडी नव्या पिढीपर्यंत पोहोचवणं आणि विचारांची समृद्ध देवाणघेवाण घडवून आणणं, यासाठी अशा साहित्यिक उपक्रमांची आज नितांत गरज आहे. ठाण्यापुरतेच नव्हे, तर मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईसह विविध ठिकाणी लोकसत्ता परिवाराने आयोजित केलेले असे उपक्रम समाजाच्या वैचारिक समृद्धीसाठी निश्चितच महत्त्वपूर्ण आहेत. या सुंदर आयोजनासाठी यासाठी लोकसत्ता परिवारातील जयेश सामंत आणि निलेश पामनंद यांनी विशेष परिश्रम घेतले आणि विशेष सहकार्य केल्याबद्दल त्यांचं कौतुक केलं. यावेळी मंत्री प्रताप सरनाईक, खासदार सुप्रियाताई सुळे, आमदार जितेंद्र आव्हाड, आमदार निरंजन डावखरे, आमदार संजय केळकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. #nareshmhaske #Loksatta #AbhijatLitFestival #MarathiLiterature #ReadingCulture #ThaneCulturalEvents
1
3
275
ठाणे पूर्व येथील गांधीनगर कुष्ठरुग्ण वसाहतीतील विठ्ठल रखुमाई मंदिर समितीच्या वतीने दरवर्षी मोठ्या भक्तिभावाने आयोजित करण्यात येणाऱ्या कार्तिकी एकादशी सोहळ्यानिमित्त या मंदिरात जाऊन श्री विठ्ठल रखुमाई यांचं दर्शन घेतलं. कार्तिकी एकादशीला या मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात. यावेळी पालखी सोहळ्याचं देखील आयोजन केलं होतं. या सोहळ्यात परिसरातील नागरिक मोठ्या उत्साहाने सहभागी होतात. मंदिरात दर्शन घेतल्यानंतर महाप्रसादाच्या कार्यक्रमासंदर्भात मंदिर समितीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी चर्चा केली. रात्री उशिरा पोहोचूनही मंदिर समितीच्या कार्यकारिणीने अत्यंत आपुलकीने माझं स्वागत केलं, याचा विशेष आनंद झाला. ठाणे पूर्वमधील हे प्रशस्त मंदिर आणि त्याला जोडलेला सभागृह परिसरातील धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांसाठी महत्त्वाचं केंद्र आहे. महाराष्ट्रातील विविध कुष्ठरुग्ण वसाहतींमधील पंचमंडळी, पाहुणे आणि बांधवही या सोहळ्यात आवर्जून उपस्थित राहून मुक्काम करतात. वर्षभर मंदिर समितीच्या वतीने अनेक सामाजिक, धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं देखील आयोजन केलं जातं. या सर्व उपक्रमांमागे मेहनत घेणाऱ्या कार्यकर्त्यांचं, पदाधिकाऱ्यांचं आणि मंदिर समितीच्या संपूर्ण टीमचे मनापासून कौतुक केलं. ही सर्व मंडळी माझ्या लहानपणापासूनची आहेत, त्यामुळे त्यांच्याशी असलेलं नातं आणि आपुलकी कायमच विशेष आहे. यावेळी शाखाप्रमुख विजय पाटील, उपशाखाप्रमुख कांती नाईक, प्रभाकर मेहेत्रे, दिलीप वाघमारे, मंदिर समितीचे दीपक तरळ, रमेश पाटील तसेच पोलीस खात्यातील शशी माळी आणि इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. #nareshmhaske #KartikiEkadashi #VitthalRakhumai #ThaneEast #SpiritualCelebration #MaharashtraCulture
1
4
224
खासदार क्रीडा संग्रामाच्या माध्यमातून ठाणे जिल्ह्यात खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध क्रीडा स्पर्धांचा उत्साह पाहायला मिळत आहे. याच क्रीडा महोत्सवांतर्गत नवी मुंबई येथे आयोजित बॉक्स क्रिकेट स्पर्धेला काल रात्री भेट दिली. गोठवली गावातील आर.एस.ए. मैदानावर पार पडणाऱ्या या स्पर्धेत नवी मुंबईतील जवळपास ४६ संघांनी सहभाग नोंदवला असून, तरुण खेळाडूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला. यावेळी स्पर्धेचे आयोजक, युवा सेनेचे नवी मुंबई जिल्हाप्रमुख अनिकेत म्हात्रे, ऐरोली युवासेना शहरप्रमुख चेतन पाटील, बेलापूर विधानसभा युवासेना शहरप्रमुख जयदीप रामदास तसेच संपूर्ण आयोजन टीमचे विशेष कौतुक केलं. तरुणांना खेळासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणारे असे उपक्रम केवळ खेळाला प्रोत्साहन देत नाहीत, तर संघभावना, मैत्री, शिस्त आणि खिलाडूवृत्तीही जोपासतात. या स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व खेळाडूंना पुढील सामन्यांसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. @DrSEShinde #nareshmhaske #KhasdarKridaSangram #BoxCricket #ShrikantShinde #NaviMumbaiSports #YouthSports
1
1
4
190