Dr Shrikant Lata Eknath Shinde (@DrSEShinde) header
Dr Shrikant Lata Eknath Shinde (@DrSEShinde) profile picture

Member of Parliament, Kalyan Loksabha, Maharashtra, India

Thane, India
Joined February 2014
Photo by Dr Shrikant Lata Eknath Shinde (@DrSEShinde)Photo by Dr Shrikant Lata Eknath Shinde (@DrSEShinde)Photo by Dr Shrikant Lata Eknath Shinde (@DrSEShinde)Photo by Dr Shrikant Lata Eknath Shinde (@DrSEShinde)Photo by Dr Shrikant Lata Eknath Shinde (@DrSEShinde)Photo by Dr Shrikant Lata Eknath Shinde (@DrSEShinde)Photo by Dr Shrikant Lata Eknath Shinde (@DrSEShinde)Photo by Dr Shrikant Lata Eknath Shinde (@DrSEShinde)Photo by Dr Shrikant Lata Eknath Shinde (@DrSEShinde)Photo by Dr Shrikant Lata Eknath Shinde (@DrSEShinde)
भाजपचे ज्येष्ठ नेते, भारतरत्न मा. श्री. लालकृष्ण अडवाणीजी यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा..!! #Shivsena #DrShrikantEknathShinde #शुभेच्छा #LalKrishnaAdvaniJi #happybirthday
12
37
37
472
ज्येष्ठ साहित्यिक, मराठी मनाचे लाडके व्यक्तिमत्त्व पु. ल. देशपांडे यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन..!! #Shivsena #DrShrikantEknathShinde #maharashtra #अभिवादन #मराठीसाहित्य
11
39
36
458
नव्या आशांच्या ज्योतीने आसमंत उजळावा, सुख समृद्धीच्या प्रकाशात महाराष्ट्र तेजोमय व्हावा..!! सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा.. #HappyDiwali #Shivsena #Diwali2026 #DrShrikantEknathShinde #लक्ष्मीपूजन #maharashtra
12
39
40
901
लक्ष्मीपूजन आणि नरक चतुर्दशीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा..!! #Diwali2026 #Shivsena #DrShrikantEknathShinde #लक्ष्मीपूजन #maharashtra
13
41
50
549
📍 मुंबई डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन आणि आरोग्यदूत फाउंडेशनच्या वतीने विविध उपचार झालेल्या बालक आणि पालकांच्या दिवाळी स्नेहमेळाव्यात ज्येष्ठ पत्रकार व संपादकांनी व्यक्त केलेले मनोगत!
23
140
1
188
5,227
इतिहास केवळ वाचायचा नाही, तर अनुभवायचा असतो..!! छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम, स्वराज्याची दूरदृष्टी आणि पुरंदरच्या तहाची शौर्यगाथा नव्या पिढीपर्यंत पोहोचवणारे ‘जागर शिवबाच्या नावाचा - पुरंदरची शौर्यगाथा’ हे भव्य किल्ले प्रतिकृती प्रदर्शन डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन आणि जाणता राजा युवा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने डोंबिवलीत आयोजित करण्यात आले आहे. तसेच लेझर शोच्या माध्यमातून पुरंदरचा इतिहास अनुभवण्याची संधी आणि कल्याण शहरात उभे राहणाऱ्या मराठा आरमार स्मारकाची प्रतिकृती हे प्रदर्शनाचे विशेष आकर्षण आहे. येत्या १५ नोव्हेंबरदरम्यान डोंबिवली देवीचा पाडा येथे आयोजित या प्रदर्शनाला अवश्य भेट द्या आणि स्वराज्याच्या इतिहासाचा अनुभव घ्या. #Shivsena #DrshrikantEknathShinde #maharashtra #chatrapatishivajimaharaj #Dombivli #शौर्यगाथा
21
162
173
1,409
११ हजार हृदयांना नवी स्पंदने, २ हजार चिमुकल्यांना श्रवणाचा नवा सूर... हजारो कुटुंबांच्या आयुष्यात आनंदाची नवी पहाट! #Shivsena #DrShrikantEknathShinde #Diwali #maharashtra #DrShrikantShindeFoundation
33
176
176
1,614
११ हजार बालकांच्या हृदयांना नवे स्पंदन आणि २ हजार चिमुकल्यांच्या आयुष्यात श्रवणाचा नवा सूर देणाऱ्या सेवायज्ञाचा शुक्रवारी अभिमानास्पद टप्पा पूर्ण झाला. या बालकांच्या चेहऱ्यावरील हास्य आणि पालकांच्या डोळ्यांतील समाधान हीच यंदाची खरी दिवाळी होती. शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष, डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन आणि आरोग्यदूत फाउंडेशन यांच्या माध्यमातून गेल्या नऊ वर्षात अनेक गरजू बालकांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. मुंबई येथे या मुलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या 'दिवाळी स्नेहमेळाव्या'ला उपस्थित राहून चिमुकल्यांशी आणि त्यांच्या पालकांशी संवाद साधला. #Shivsena #DrShrikantEknathShinde #DrShrikantShindeFoundation #Diwali #दिवाळीस्नेहमेळावा #maharashtra
25
215
227
2,238
छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा केवळ पराक्रमाचा नाही, तर स्वराज्यासाठी केलेल्या संघर्षाचा, दूरदृष्टीचा आणि असामान्य मुत्सद्देगिरीचाही इतिहास आहे. हाच गौरवशाली इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने डोंबिवलीत आयोजित करण्यात आलेला ‘जागर शिवबाच्या नावाचा - किल्ले प्रतिकृती प्रदर्शन : पुरंदरची शौर्यगाथा’ हा उपक्रम निश्चितच अभिनंदनीय आहे. डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन आणि जाणता राजा युवा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या ऐतिहासिक प्रदर्शनाचे शुक्रवारी उद्घाटन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज आणि मुघल सरदार मिर्झाराजा जयसिंग यांच्यात झालेला पुरंदरचा तह हा मराठ्यांच्या इतिहासातील एक महत्त्वपूर्ण प्रसंग आहे. प्रतिकूल परिस्थितीत स्वराज्याचे रक्षण करण्यासाठी महाराजांनी दाखवलेली मुत्सद्देगिरी, दूरदृष्टी आणि निर्णयक्षमता यांचा परिचय या प्रदर्शनातून करून देण्यात येत आहे. विशेष म्हणजे या ठिकाणी आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून लेझर शोच्या माध्यमातून पुरंदर किल्ल्याचा इतिहास, त्यावरील संघर्ष आणि पुरंदरच्या तहाची संपूर्ण शौर्यगाथा उलगडण्यात येणार आहे. तसेच कल्याण येथे भविष्यात साकारण्यात येणाऱ्या मराठा आरमार स्मारकाची प्रतिकृती हे या प्रदर्शनाचे आणखी एक महत्त्वाचे आकर्षण आहे. केवळ इतिहास पाहण्याचा नव्हे, तर तो प्रत्यक्ष अनुभवण्याचा अनोखा उपक्रम डोंबिवलीकरांसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे. आपल्या गौरवशाली इतिहासाची ओळख नव्या पिढीला व्हावी आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार, पराक्रम व स्वराज्याची प्रेरणा प्रत्येकापर्यंत पोहोचावी, हाच या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे. हे ऐतिहासिक प्रदर्शन ६ ते १५ नोव्हेंबरदरम्यान डोंबिवली पश्चिम येथील जाणता राजा युवा प्रतिष्ठान कार्यालय, गावदेवी मंदिर - देवीचा पाडा येथे सर्वांसाठी खुले राहणार आहे. यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजेश कदम यांच्यासह सर्व स्थानिक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. #Shivsena #DrShrikantEknathShinde #maharashtra #chatrapatishivajimaharaj #शौर्यगाथा
26
192
202
1,524
दिवाळी हा आनंदाचा, समाधानाचा आणि नात्यांमधील जिव्हाळा अधिक दृढ करणारा सण. मात्र, एखाद्या कुटुंबाच्या आयुष्यात हरवलेला आनंद पुन्हा परत आणता येणे आणि एखाद्या चिमुकल्याच्या चेहऱ्यावर नव्या आयुष्याचे हास्य फुलवता येणे, यापेक्षा मोठा आनंद कोणता. आज मुंबईत असाच एक सोहळा संपन्न झाला. राज्याचे उपमुख्यमंत्री मा. श्री. एकनाथ शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष, डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन आणि आरोग्यदूत फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने गेल्या नऊ वर्षांपासून सुरू असलेल्या या सेवायज्ञाने आज एक मोठा टप्पा गाठला आहे. महाराष्ट्रातील ११ हजार बालकांवर मोफत हृदयशस्त्रक्रिया, तर २ हजार यशस्वी कॉक्लिअर इम्प्लांट शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. वैद्यकीय मदत कक्षाचे मंगेश चिवटे यांचा मोलाचा वाटा आहे. हजारो कुटुंबांच्या आयुष्यात आशेचा नवा किरण निर्माण करणारा हा प्रवास खऱ्या अर्थाने समाधान देणारा आहे. मा . शिंदे साहेबांच्या प्रमुख उपस्थितीत आज मुंबई येथे आयोजित करण्यात आलेल्या 'दिवाळी स्नेहमेळाव्या'ला उपस्थित राहून अनेक चिमुकल्यांशी आणि त्यांच्या पालकांशी संवाद साधण्याची संधी मिळाली. आजच्या स्नेहमेळाव्यात शस्त्रक्रियेनंतर नव्या आयुष्याची सुरुवात केलेल्या बालकांना आणि त्यांच्या पालकांना भेटता आले. यावेळी काही पालकांनी आपल्या संघर्षाचा प्रवास, उपचारांदरम्यान मिळालेली मदत आणि आज आपल्या मुलांच्या आयुष्यात फुललेला आनंद अगदी मोजक्या; पण हृदयाला स्पर्श करणाऱ्या शब्दांत व्यक्त केला. त्यांच्या भावना ऐकताना उपस्थित प्रत्येकाचे मन हेलावून गेले. काही क्षण तर शब्दांपलीकडचे होते. या चिमुकल्यांवर उपचार करून त्यांना नवे आयुष्य देणाऱ्या डॉक्टरांचाही यावेळी सन्मान करण्यात आला. तसेच दिवाळीच्या निमित्ताने सर्व बालकांना भेटवस्तू देत त्यांच्या आनंदात सहभागी होता आले. मा. एकनाथ शिंदे साहेबांनीही यावेळी सर्व बालकांशी आणि पालकांशी मनमोकळा संवाद साधत त्यांच्या आनंदात सहभाग घेतला. माझ्यासाठी या उपक्रमाचे खरे यश केवळ ११ हजार हृदयशस्त्रक्रिया किंवा २ हजार कॉक्लिअर इम्प्लांट शस्त्रक्रियांचा आकडा नाही, तर आज स्वतःच्या पायावर उभी राहिलेली, हसत-खेळत बागडणारी आणि नव्या स्वप्नांच्या दिशेने वाटचाल करणारी ही हजारो बालके आहेत. ज्या कुटुंबांसाठी आपल्या मुलाच्या उपचारांचा खर्च पेलणे अशक्य होते, त्यांच्या आयुष्यात या माध्यमातून आशेचा आणि विश्वासाचा नवा अध्याय लिहिता आला, हीच सर्वात मोठी कमाई आहे. हा सेवायज्ञ असाच अखंड सुरू ठेवत अधिकाधिक गरजू बालकांना निरोगी आयुष्याची संधी उपलब्ध करून देण्याचा आमचा संकल्प आहे. यावेळी कार्यक्रमाला ज्युपिटर हॉस्पीटलचे डॉ. आशुतोष सिंह, डॉ. अमोल गीते, डॉ. रमेश काझगी, डॉ. श्रीनिवास, डॉ. उपल, डॉ. आशिष भुमकर, डॉ. ऋषिकेश वैद्य, डॉ. सुधीर कदम, डॉ. आदित्य मानके, डॉ. निखिल जाधव, डॉ. मिनी बोधनीवाला, डॉ. जितेंद्र हरियान, डॉ. संतोष शेट्टी, डॉ. नीरज उत्तम, डॉ. मनोज सिंगल यांच्यासह न्यूज 18 लोकमतचे संपादक मंदार फणसे, एबीपी माझाचे संपादक राजीव खांडेकर, झी २४ तासचे संपादक कमलेश सुतार, साम टीव्हीचे संपादक निलेश खरे, जय महाराष्ट्रचे संपादक प्रसाद काथे, एनडीटीव्ही मराठीचे जितेंद्र दीक्षित, लोकशाही न्यूजच्या संचालक अंजनी नायडू, आणि एबीपी माझाच्या संपादक श्रीमती सरिता कौशिक, टीव्ही 9 मराठीचे इनपुट एडिटर मोहन देशमुख, लोकसत्ताचे ज्येष्ठ पत्रकार संदीप आचार्य यांच्यासह विविध माध्यमांचे प्रतिनिधी, उपचार घेतलेल्या बालकांचे पालक आणि मान्यवर उपस्थित होते. #Shivsena #DrShrikantEknathShinde #Diwali2026 #EknathShinde #HappyDiwali #mumbai
20
193
227
2,255