Amit Thackeray Speaks (@AmitThackerays) header
Amit Thackeray Speaks (@AmitThackerays) profile picture

अध्यक्ष,महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना । नेते, महाराष्ट्र नवनिर्माण सेना । अमितसाहेबांच्या सगळ्या बातम्या देणारे एकमेव फॅन पेज #AmitThackeraySpeaks

Joined July 2023
Photo by Amit Thackeray Speaks (@AmitThackerays)Photo by Amit Thackeray Speaks (@AmitThackerays)Photo by Amit Thackeray Speaks (@AmitThackerays)Photo by Amit Thackeray Speaks (@AmitThackerays)Photo by Amit Thackeray Speaks (@AmitThackerays)Photo by Amit Thackeray Speaks (@AmitThackerays)Photo by Amit Thackeray Speaks (@AmitThackerays)Photo by Amit Thackeray Speaks (@AmitThackerays)Photo by Amit Thackeray Speaks (@AmitThackerays)Photo by Amit Thackeray Speaks (@AmitThackerays)
Amit Thackeray Speaks retweeted
आज १४ नोव्हेंबर २०२६ रोजी पुण्यात सकाळ समूहाच्या साहित्य उत्सवात सकाळ समूहाचे संपादक श्री. निलेश खरे यांनी घेतलेली अराजकीय मुलाखत.
60
177
5
1,019
41,494
Amit Thackeray Speaks retweeted
सस्नेह जय महाराष्ट्र, भारतीय जनता पक्ष आणि त्यांनी पोसलेला विषारी सोशल मीडिया हा सध्या मुंबई, महाराष्ट्र येथे छठ पूजा हा मुद्दा वापरून कसा संघर्ष निर्माण करता येईल यासाठी आटोकाट प्रयत्न करतोय. त्यासाठी सोशल मीडियावर या पूजेच्या, त्यातून सुरु असलेल्या सांस्कृतिक आक्रमणांच्या रिल्स सोशल मीडियावर टाकत आहेत. हे पुरेसं नाही म्हणून मुंबईतील काही रेल्वे स्थानकांवर भोजपुरी गाणी वाजवून पाहिली, जी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने बंद पाडली तो भाग वेगळा. पण या सगळ्यातून अजून भारतीय जनता पक्षाला जो संघर्ष अपेक्षित आहे तो उभा राहत नाहीये ही त्यांना खंत आहे. आणि हा सगळा आटापिटा सुरु आहे आगामी उत्तर प्रदेश निवडणुकांसाठी. भारतीय जनता पक्षाचा जो काही एक थिंक टॅंक आहे त्याची बौद्धिक क्षमता कमकुवत झाली आहे असं दिसतंय. कारण निवडणुका जिंकण्यासाठी त्यांनी वर्षानुवर्षे वापरलेला फोडा आणि राज्य करा हा फॉर्म्युला आता काम करणार नाही. लोकसभेच्या निवडणुका आल्या की हिंदू मुस्लिम वाद पेटवायचा, मैदानांमध्ये, बागांमध्ये मुस्लिम बुरखा घातलेल्या स्त्रिया फिरवून बघा बघा आता हे आपल्या मैदाना आणि बागांपर्यंत आले असं सांगून लोकांना घाबरवायचं. अर्थात हिंदू स्त्रियांना आणि पुरुषांना बुरखे घालून दहशत निर्माण करतानाचे बरेचसे व्हिडिओ सोशल मिडीयावर दिसतातच. राज्यांच्या निवडणुका जवळ आल्या की जातींमध्ये विष कालवायचं, मागच्या वर्षी मुंबई महापालिकेच्या निवडणुका जिंकायच्या म्हणून कबुतरखान्यावरून गुजराती विरुद्ध मराठी वाद पेटवला. मी मागे अनेकदा माझ्या भाषणांत म्हणलं आहे की भाजपाला कामं दाखवून निवडणुका जिंकता येत नाही कळलं की दोन गटांमध्ये संघर्ष घडवून त्यांच्या सांडलेल्या रक्तावर हे निवडणुका जिंकतात. अर्थात तो पण एक वरवरचा देखावाच आहे, खरं काम निवडणूक आयोगच करतं. पण विजय कसा झाला यासाठी पसरवायला एक कारण मिळतं! जेन झी आंदोलनापासून भारतीय जनता पक्षाचा केंद्रापासून राज्यापर्यंतचा सत्तेतून पायउतार होण्याकडे प्रवास सुरु झाला आहे. लवकर हे घडणारंच आहे! यामुळे भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे पालक पार बिथरले आहेत. कारण सत्तेतून बाहेर फेकले गेले की यांनी गेल्या १२,१४ वर्षांत जे जे केलं आहे त्या सगळ्याची भुतं यांच्या मानगुटीवर बसतील आणि याचीच त्यांना भीती आहे. असो. अर्थात त्यांचं जे व्हायचं आहे ते होईलच ! माझी मराठी माणसांना विनंती आहे की त्यांनी आखलेल्या युद्धभूमीवर आपल्याला लढायची गरज नाही. ती महाराष्ट्राची पद्धत पण नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा गनिमी कावा बहुधा ते विसरले असतील पण आपण लक्षात ठेवला पाहिजे. गनिमी काव्याने कोणाला कधी कसं उत्तर द्यायचं हे आपण ठरवू , यांचा स्वार्थ आहे म्हणून उगाच त्यांनी आखलेल्या सापळ्यात आपण अडकायचं नाही हे नक्की. भारतीय जनता पक्षाने देशाची वाट लावली आहे, इथला सलोखा पार संपवला आहे, सहिष्णुता संपवली आहे. महाराष्ट्रात पण हेच सुरु आहे. केंद्रीय आदेशाने महाराष्ट्राला एकाच उद्योगपतीला आणि त्याच्या चिल्ल्यापिल्यांना विकून फक्त चहुबाजूनी ओरबाडण्याचे काम सध्या सुरू आहे! आपले महाराज आणि त्यांचे मावळे जिथे नांदले तो सह्याद्री पण यांनी पोखरायला सुरु केला आहे. जंगले दिली जात आहेत , जमिनी दिल्या जात आहेत, त्या उद्योगपतीला जे महाराष्ट्रात दिसेल ते दिलं जात आहे , पण आम्हाला त्याचं काहीच वाटत नाहीये. मी अनेकदा सांगत आलो की आपल्या मराठी समाजाइतका बेसावध समाज मी संपूर्ण देशात कुठे पाहिला नाही, काही घटना घडली की जागा होणारा आणि लगेच एक दोन दिवसात परत शांत होऊन सर्व विसरणारा! जे काही आपल्या आजूबाजूला घडतंय हे सगळं मराठी माणसाने विसरलं नाही पाहिजे. त्याचा योग्य वेळी राग आपण बाहेर काढला पाहिजे तरच शिवरायांच नाव घेण्याचा अधिकार आपल्याला प्राप्त होतो ! बाकी पूजेच्या नावाखाली सांस्कृतिक उन्माद कोणी घातलाच , ( अर्थात कोणी तशी हिंमत करेल असं वाटत नाही ) तर शांत आहोत म्हणजे गांडू नाही आहोत हे महाराष्ट्र ओरबाडणाऱ्यांनी आणि महाराष्ट्राच सांस्कृतिक वैभव बिघडवणाऱ्यांनी कायम लक्षात ठेवावे ! उत्तर भारतीयांना आणि गुजराती समाजाला पण समजलं पाहिजे की हे फक्त तुम्हाला आमच्या विरोधात उभं करून स्वतःचा स्वार्थ साधून घेत आहेत ! आणि जर त्यांच्या बरोबर सामील होऊन तुम्ही आमच्या अंगावर येणार असाल तर विसरू नका की हा महाराष्ट्र आहे ते ! येथे मरहट्टे राहातात ते ! भाजपाला सांगणे आहे की धार्मिक, किंवा राज्या राज्यात किंवा जातीपातीत संघर्ष निर्माण करणे यापेक्षा आता काही नवीन सुचतंय का ते पहा ! मराठी बांधवांना - भगिनींना आणि माझ्या महाराष्ट्र सैनिकांना सांगणे आहे की यांच्या सापळ्यात अडकू नका पण सतर्क राहा ! योग्य वेळी निर्णय घेऊ ! राज ठाकरे ।
731
1,059
176
5,488
510,090
आपणा सर्वांना दीपावलीच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
1
3
43
446
अहिल्या! ♥️
5
57
593
Amit Thackeray Speaks retweeted
टोरेंट हायड्रो पॉवर प्रकल्पासाठी होत असलेल्या वृक्षतोडीच्या विरोधात आज २८ ऑक्टोबर २०२६ रोजी कर्जत येथे सभेला संबोधित केलं. आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची सभा आहे म्हणल्यावर कर्जत येथे इंटरनेट बंद केलंय म्हणे. इंटरनेट बंद केलं म्हणून सूर्य उगवायचा थांबतो का? नुसतं कर्जतमध्ये बंद केलंय, पण बाकी अख्खं जग बघतंय. अर्थ्या तासात सगळं भाषण युट्युबवर पडेल मग सगळं जग बघेल. हे लोकं कोणत्या जगात जगतात तेच कळत नाही. मनात काळं असेल तर अशा गोष्टी करायच्या सुचतात. * आज सकाळी जंगलात जी झाडे तोडली आहेत ती बघायला गेलो होतो, तिथं लाकडं रचून ठेवली होती. तोडलेल्या झाडांची रचलेली लाकडं पाहून जंगलाच्या अंत्यसंस्काराला आल्यासारखं वाटलं. * हे राज्यात बसलेले मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना केंद्रात बसलेल्या दोघांकडून शून्य किंमत आहे. कोणता प्रकल्प करायचा, कसा करायचा हे सगळं दिल्लीत ठरतं. * मी पूर्वीपासून सांगत होतो, हा महाराष्ट्र जर या दोघांच्या हातात गेला तर महाराष्ट्र महाराष्ट्राच्या हातात राहणार नाही. * आज तुम्ही रडत बसता आणि निवडणुकीच्या तोंडावर जातीच्या, धर्माच्या नावावर यांना मतदान करता. परत पुढचे पाच वर्ष रडत बसता. किती काळ हे चालू राहणार. * आमच्या लाडक्या बहिणींना १५०० रुपये देतायत. हे १५०० रुपये देऊन तुमची तोंडं बंद केली जात आहेत. * त्यादिवशी मी मुख्यमंत्र्यांचं निवेदन ऐकत होतो. मुख्यमंत्री निवेदनात म्हणाले, केंद्राने आणि एका खाजगी कंपनीने ठरवून आम्हाला सांगितलं आणि त्यानंतर हा प्रकल्प सुरू झाला. हे सगळं केंद्रात ठरतं हे मुख्यमंत्र्यांनीच सांगितलं. * सत्तेची भिती, पदाची भिती या भितीमधून या गोष्टी घडतात. हा असा गप्प, शांत राहणारा, मान खाली घालून चालणारा हा महाराष्ट्र? गुजरातमधली २ माणसं आमचा महाराष्ट्र चालवणार? * आज मी जंगलात भेट दिली तेव्हा मला महिला भेटल्या. हात जोडून विनंती करत होत्या, आमचं जंगल वाचवा. तुमच्यावर हात जोडायची वेळ येते? तुमचे कोयते काय करतात अशावेळी ? * आज भीमाशंकरचा प्रकल्प आलाय. त्याचं टेंडर वगैरे काही नाही असाच देऊन टाकलाय. महाराष्ट्रात सह्याद्रीच्या कुशीत अशाच प्रकारचे एकूण २३ प्रकल्प येत आहेत. * यापुढे महाराष्ट्रात जे खाजगी प्रकल्प येत आहेत. त्यांना जे पाणी आणि वीज लागणार आहे त्याची तरतूद व्हावी यासाठीची पूर्वतयारी म्हणून हे प्रकल्प सुरू केले जात आहेत * या सगळ्यातून तुमचे मतदारसंघ फोडले जात आहेत असे प्रकल्प आले की तुम्ही आहात त्या ठिकाणाहून दुसरीकडे स्थलांतरित होणार. आणि तिथे दुसरे लोकं स्थायिक होणार. हे सगळं तुम्ही समजून घेतलं पाहिजे. * सर्बियामध्ये तरुणांनी, तिथल्या जेनझीने सत्तापालट करून दाखवला. मी आधीही माझ्या भाषणांत सांगितलंय जेनझी या महाराष्ट्राच्या खेडापाड्यातसुद्धा आहे. तुम्ही कधी जागे होणार आहात? * तुम्ही जर शांत बसणार असाल तर मला तुमचं नेतृत्व नाही करायचं. हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे म्हणायचं आणि पेटून उठायचं नाही याला काय अर्थ आहे? * गडचिरोलीत शेतीची सुपीक जमीन आणि जंगलातली झाडे कापून ती जमीन एका खाणीसाठी दिली. * जंगलातली झाडं जेव्हा तोडली तेव्हा त्या झाडावर राहणारे पक्षी वर हवेत घिरट्या घालत होते. ही घिरट्या घालायची वेळ पुढच्या काळात तुमच्यावरसुद्धा येणार आहे. * हे सगळे प्रकार, त्यासाठी केलेली आंदोलनं, मोर्चे हे तुम्ही निवडणुकीच्यावेळी लक्षात ठेवलं पाहिजे. नाहीतर उपयोग काय या सगळ्या आंदोलनांचा? * ज्या सह्याद्रीत शिवछत्रपती खेळले, बागडले तो सह्याद्री आज महाराष्ट्राचेच लोक संपवत आहेत. आणि महाराष्ट्रातला नागरिक हताश होऊन बघत बसला आहे. याबद्दल शिवछत्रपतींना काय वाटत असेल, याचा एकदा विचार करा. * या सगळ्या अन्यायाविरोधात जर आपल्याला लढता येत नसेल तर परमेश्वरच वाचवू शकेल या महाराष्ट्राला. * शिवरायांनी आज्ञापत्रात सांगून ठेवलंय कोणतंही झाड कापले जाऊ नये. निदान त्या शिवछत्रपतींचं तरी ऐकणार आहोत की नाही आपण? * महावितरणचा IPO डिसेंबरमध्ये महाराष्ट्र सरकार लाँच करणार आहे. म्हणजे यापुढे तुमच्या घरात येणाऱ्या वीजेचा दर हे सरकार नाही तर एक खाजगी कंपनी ठरवणार आहे. * जिथे जिथे महाराष्ट्रावर संकट येईल तिथे महाराष्ट्र एकत्र आला पाहिजे. हा महाराष्ट्र वेगवेगळा ठेऊन चालणार नाही नाहीतर यांना जे साध्य करायचंय ते साध्य होईल. * उद्या टोरंटचा हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर याचं वितरण कसं होणार आहे? कुठे होणार आहे? कुणामार्फत होणार आहे? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे सरकारने जरूर दिली पाहिजेत. * तुम्हाला मी आत्ता सांगतो, आज या गोष्टी तुम्ही हसण्यावारी नेत आहात. भविष्यात तुमची पोरं म्हणतील, माझा बाप नालायक निघाला. जेव्हा महाराष्ट्राकडे लक्ष द्यायला पाहिजे होतं तेव्हा लक्ष दिलं नाही. * जर तुम्ही जागे असाल आणि पेटून उठलात तर त्या एकाच गोष्टीला जगातलं कोणतंही सरकार घाबरतं.हे जर नको असेल तर लोण्यासारखे थंड बसा. * जर आपली जंगलं वाचवायची असतील तर शिवछत्रपतींचे आज्ञापत्र वाचा. महाराष्ट्रातला माणूस पेटून उठला या गोष्टीचा शिवछत्रपतींनाही आनंद वाटेल. * मी उद्योगधंद्यांविरोधातला माणूस नाही, महाराष्ट्राचा विकास झाला पाहिजे हे माझंही मत आहे. पण महाराष्ट्राला काय हवं आहे हे महाराष्ट्रातल्या माणसांनी ठरवलं पाहिजे. दुसरं कोणी ठरवून चालणार नाही. * मला फक्त एवढंच सांगायचंय जिवंत रहा. जी लढाई करायचीय त्याचं नेतृत्व तुम्हाला करायचंय. मी तुमच्या बरोबर आहे पण नेतृत्व तुम्हालाच करायचंय. मलाही बघायचं आहे, महाराष्ट्र जिवंत आहे की नाही. * शिवछत्रपतींच्या मृत्यूनंतर सुद्धा १२५ वर्षे या संपूर्ण हिंद प्रांतावर मराठ्यांनी राज्य केलं. तो मराठी माणूस आज शांत कसा बसलाय? * मला पोलिसांनाही सांगायचंय त्यांना साथ देऊ नका. तुम्हीही या महाराष्ट्राचे नागरिक आहात, तुम्हालाही मुलं-बाळं आहेत. उद्या तुमच्याही घरावर टकटक होणार. राज ठाकरे ।
138
1,042
23
5,165
98,099
रॅलीत सहभागी झाल्यामुळे Torrent कंपनीने नोकरीवरून काढलं; अमित ठाकरे यांना समजताच स्वतःचा पर्सनल नंबर देत नोकरी देण्याचं आश्वासन !
8
57
2
496
17,837
शस्रपूजन 🚩
1
6
331
15,445
छत्रपती शिवाजी पार्क परिसरात walking साठी आलेल्या लोकांना जबरदस्ती detain करत आहे ही तक्रार मिळताच मनसे नेते व मनविसे अध्यक्ष मा. अमित साहेब ठाकरे यांनी निषेध नोंदवले. #मनसे #AmitThackeray
1
11
49
767
आदित्य ठाकरे व अमित ठाकरे यांचा गाडीवर चढून आंदोलकांशी संवाद #AadityaThackeray #AmitThackeray #shivajipark
1
8
44
973
ठाकरे!
5
19
1
142
1,064
Amit Thackeray Speaks retweeted
सस्नेह जय महाराष्ट्र, ५ ऑक्टोबर २०२६ ला मी जेंव्हा पुण्यात एमपीएससी आंदोलक विद्यार्थ्यांची भेट घेतली तेंव्हा मी तुमचं म्हणणं, तुमच्या रास्त अपेक्षा याबद्दल मुख्यमंत्र्यांशी बोलेन असं आश्वस्त केलं होतं. स्वतःचा राहता जिल्हा, तालुका, आपलं घर तसेच आपल्या कुटुंबाला सोडून नोकरीसाठी राब राब राबणाऱ्या तरुणांना आणि तरुणींना पाहिलं की जिवाची कालवाकालव होते. म्हणून आज या विषयावर माझी मुख्यमंत्र्यांशी सविस्तर चर्चा झाली. ते देखील पूर्णपणे सकारात्मक आहेत हे जाणवलं. आणि येत्या काही दिवसांत MPSC च्या विद्यार्थ्यांच्या नोकऱ्यां संदर्भात एक चांगली बातमी येईल अशी अपेक्षा आहे . तेंव्हा विद्यार्थ्यांनी देखील संयम ठेवावा. राज ठाकरे ।
102
278
15
2,540
237,357
मोर्चा निवडणूक आयोगाच्या विरोधात आहे, तर मग सत्ताधारी पक्ष उत्तर का देतो आहे? श्री. अमित राजसाहेब ठाकरे
1
7
45
517
ठाकरेंचा मोर्चा, देशभर चर्चा!
2
13
114
971
Amit Thackeray Speaks retweeted
सस्नेह जय महाराष्ट्र, निवडणूक आयोगाच्या मनमानी कारभाराच्या विरोधात महाराष्ट्रातील सर्व राजकीय पक्षांचा 'गर्जना' मोर्चा येत्या ४ ऑक्टोबर २०२६ ला निघणार आहे. याबाबत तुम्हाला सर्वांना माहीतच आहे. पण मोर्च्याचा आधीचा मार्ग बदलावा अशी विनंती मुंबई पोलिसांनी केली होती. त्या विनंतीला मान देऊन हा मोर्चा 'मेट्रो सिनेमा' ते 'बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालय' असा निघणार आहे. या बदललेल्या मार्गाची महाराष्ट्र सैनिकांनी, शिवसैनिकांनी आणि मोर्च्यात सामील होणाऱ्या सर्व राजकीय पक्षांनी आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी नोंद घ्यावी. बाकी मोर्च्याला भेटूच ! राज ठाकरे । …. Jai Maharashtra, The ‘Garjana’ (Roar) protest march, organized by all political parties in Maharashtra against the Election Commission's arbitrary functioning, is scheduled for October 4, 2026. You are all aware of this. However, the Mumbai Police had requested a change to the march's original route. Acceding to that request, the march will now proceed from ‘Metro Cinema’ to the ‘Brihanmumbai Municipal Corporation (BMC) Headquarters’ ‘Maharashtra Sainiks’, ‘Shiv Sainiks’, as well as all participating political parties and their office-bearers, should take note of this revised route. See you at the march! Raj Thackeray
115
316
10
1,642
112,234
Amit Thackeray Speaks retweeted
गर्जना..! लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी रविवार ४ ऑक्टोबर, सकाळी १० वाजता. मेट्रो सिनेमा, मरीन लाईन्स ते मुंबई महानगरपालिका मुख्यालय.
4
43
164
2,926
Amit Thackeray Speaks retweeted
कावळ्याच्या शापाने गाय मरत नसते. तूर्तास एवढेच !
326
609
74
5,161
344,956
Amit Thackeray Speaks retweeted
गणपती बाप्पा मोरया 🙏🏼 आपणा सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!
2
26
196
4,391
गणेशोत्सवाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! #गणेशोत्सव #GaneshChaturthi
1
6
350