Member of Legislative Assembly, Hadapsar. | अध्यक्ष, मराठी भाषा समिती | Ex. Oppn. Leader, PMC.

Pune, India
Joined January 2014
अखेर इतिहास घडला. जनता झाली आमदार. हडपसर विधानसभा मतदारसंघातील माझ्या माय बाप जनतेचे आभार व्यक्त करण्यासाठी आज माझे शब्द अपुरे आहेत. हडपसरचा विकास अधिक गतिमान करण्यासाठी तुम्ही सर्वांनी मला हडपसर मतदारसंघाचे विधानसभेत प्रतिनिधित्व करण्याची संधी पुनश्च एकदा उपलब्ध करून दिली यासाठी सर्वप्रथम जनतेचे मनापासून आभार मानतो. माझे सहकारी आमदार योगेश अण्णा टिळेकर, शिवसेना शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांचे, महायुती चे सर्व नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते यांचे मनापासून आभार मानतो. या सर्वांनी दिलेली साथ आणि विश्वास माझ्यासाठी मोलाचा आहे. हडपसर चा विकास अधिक वेगाने पुढे नेण्यासाठी मी कटिबद्ध आहे हा माझा शब्द आहे. #जनतेचा_आमदार #इतिहास_घडला #हडपसर_विधानसभा #आमदार_चेतन_विठ्ठल_तुपे #महायुती
24
10
76
4,858
दसरा अर्थात विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा! विजयादशमीचा हा मंगलमय सण सर्वांच्या जीवनात सुख, समृद्धी, समाधान, यश, कीर्ती आणि उत्तम आरोग्य घेऊन येवो. समाजात बंधुभाव, एकोपा आणि सद्भावना वृद्धिंगत होवोत. राज्यावरील दुष्काळाचे संकट दूर होऊन बळीराजाला सुगीचे दिवस लाभोत.
3
196
‘रयतेला शिक्षण मिळाले पाहिजे’ हा ध्यास घेऊन बहुजन समाजातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची दारे खुली करणारे कर्मवीर भाऊराव पाटील हे महाराष्ट्राच्या शैक्षणिक चळवळीतील दीपस्तंभ होते.त्यांच्या जयंतीनिमित्त मनःपूर्वक अभिवादन!
1
93
आज माझे वडील, माजी खासदार आणि लोकनेते स्व. विठ्ठलराव तुपे पाटील यांच्या जयंतीनिमित्त आमच्या निवासस्थानी तसेच साने गुरुजी भवन येथे त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करत विनम्र अभिवादन केले.
1
76
मुंढवा केशवनगर परिसरातील वाहतूक समस्या सोडविण्यासाठी ग्रामस्थांबरोबर बैठक घेऊन आतापर्यंतच्या कामकाजाची व पाठपुराव्याची माहिती दिली. ग्रामस्थांकडूनच सहकार्य कमी पडत असल्याचे निदर्शनास आणून देऊन ग्रामस्थांना सहकार्य करण्याची विनंती केली.
1
2
5
320
आमचे सहकारी, मित्र परेशजी गुरव यांची वाढदिवसानिमित्त भेट घेऊन उत्तम आयुरारोग्यासाठी शुभेच्छा दिल्या.
3
17
514
नगरसेवक अजित आबा घुले यांनी आयोजित केलेल्या आखाड कार्यक्रमात उपस्थित होतो.
2
16
794
मुंढवा केशवनगर परिसरातील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी समस्त मुंढवा केशवनगर ग्रामस्थांनी आयोजित केलेल्या बैठकीला उपस्थित होतो. वाहतुकीची समस्या सोडवण्यासाठी घेतलेली ही २६वी बैठक होती. यावेळी वाहतूक समस्या सोडविण्यासंदर्भात वेळोवेळी केलेल्या प्रयत्नांबद्दल माहिती दिली.
3
2
7
431
पुढील कामांसाठीही मी सातत्याने पाठपुरावा करत असून लवकरच त्याही गोष्टी मार्गी लागतील. आपल्या प्रश्नांसाठी शासन, प्रशासन, स्थानिक लोकप्रतिनिधी सगळेच प्रयत्न करत असून ग्रामस्थांमध्येच एकमत करण्याची आवश्यकता आहे. ती केली तर आपले प्रश्न अधिक लवकर सुटतील अशी मला खात्री आहे.
59
आता होणाऱ्या उड्डाणपुलासाठी भल्या पहाटे दादांबरोबर जाऊन जागा निश्चित करून निधी मंजूर करून घेतला. आदरणीय दादांमुळे कामाला गती आली आणि आता 130 कोटींचा उड्डाणपूल होणार असून त्याचे भूमिपूजन होते आहे. दादा आपल्याला सोडून गेले असले तरी आपल्या कामांसाठी तरतूद करून गेले.
39
संत शिरोमणी श्री सावता महाराज संजीवन समाधी सोहळा
1
2
156
श्रमात भक्ती, कर्मात ईश्वर आणि सेवेत समाधान… अशा महान संतपरंपरेचे दीपस्तंभ संत सावता माळी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त शतशः नमन! त्यांचे विचार आणि अभंग आपल्या जीवनाला सदैव प्रेरणा देत राहोत, हीच विठ्ठल चरणी प्रार्थना. #संतसावतामाळी #पुण्यतिथी #शतशःनमन #विठ्ठल
1
2
172
राज्याच्या उपमुख्यमंत्री मा.सुनेत्रावहिनी पवार यांच्या सूचनेनुसार व खा.पार्थदादा पवार यांच्या मार्गदर्शनानुसार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हडपसर विधानसभा मतदारसंघातील सर्व नगरसेवक, पदाधिकारी व बी.एल.ए. कार्यकर्त्यांचे विशेष सखोल पुनर्निरीक्षण कार्यक्रमाचे प्रशिक्षण आज पार पडले.
1
3
4
239
यावेळी उपस्थित राहून सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांबरोबर संवाद साधला. विशेष सखोल पुनर्निरीक्षणाबाबतच्या (SIR) अडचणी व प्रश्न समजून घेऊन संघटनेमार्फत नागरिकांना काय व कशा प्रकारे मदत करता येईल यासंबंधी सखोल चर्चा व विचारविनिमय करून कृती कार्यक्रम आखला. #SIR #हडपसर_विधानसभा
39
मुस्लिम समाज वधू वर सूचक मेळावा
1
2
3
276
हडपसर विधानसभा मतदार संघातील नागरिकांच्या समस्या आणि सूचना जाणून घेण्यासाठी होणारा जनता दरबार आज पार पडला. यावेळी उपस्थितांच्या अडीअडचणी समजून घेऊन पुढील कार्यवाहीच्या संबंधितांना सूचना दिल्या. #हडपसर_विधानसभा #जनता_दरबार #चेतन_विठ्ठल_तुपे_पाटील
1
2
155
ॲड.आयुब शेख विचार मंच, टॉप फाउंडेशन यांच्या आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभागातर्फे राज्याचे माजी उपमुख्यमंत्री, दिवंगत नेते आदरणीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त मुस्लिम समाजातील युवक युवतींसाठी मोफत वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
1
1
87
जागतिक आदिवासी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! जंगलाशी नातं, मातीशी नाळ आणि संस्कृतीशी घट्ट बांधिलकी… हीच आदिवासी समाजाची खरी ओळख. परंपरा जपूया, हक्कांसाठी उभे राहूया आणि पुढच्या पिढीसाठी समृद्ध वारसा निर्माण करूया. आदिवासी अस्मिता — आपला अभिमान! #जागतिकआदिवासीदिन #WorldTribalDay
1
136
मा.विद्याधर अनास्कर यांना सहकार महर्षी पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा साधना सहकारी बँकेमार्फत गौरव करण्यात आला.
1
2
240
साने गुरुजी शिक्षण संस्थेच्या कार्यकारी मंडळाची सभा संपन्न झाली. संस्थेचा अध्यक्ष या नात्याने संस्थेच्या अडीअडचणी समजून घेतल्या. यावेळी संस्थेच्या जमा खर्च हिशोबासह घटक शाखांच्या इमारत बांधकाम, देखभाल दुरुस्ती पत्र व्यवहार यासह संस्थेच्या महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा केली.
1
1
99