दिवाळीपूर्वीच वेतनाचा ‘प्रकाश’
राज्यातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि सीएचबी प्राध्यापकांच्या खात्यात वेतन व मानधन जमा
उच्च शिक्षण संचालनालयाची विशेष मोहीम यशस्वी
पुणे : दिवाळी हा भारतीय संस्कृतीतील सर्वात मोठा सण आहे. अंधारावर प्रकाशाचा आणि निराशेवर आशेचा विजय साजरा करणारा हा सण प्रत्येक घरात आनंद, उत्साह आणि नवी उमेद घेऊन येतो. पण आनंदाची ही पणती तेव्हाच तेवते, जेव्हा घरात आर्थिक निश्चिंतता असते. कर्जाचे हप्ते, मुलांचे शिक्षण, घरखर्च आणि सणाची खरेदी या सगळ्यांचा भार पगारावरच असतो. वेतन वेळेवर मिळाले नाही, तर सणाचा आनंद चिंतेत हरवून जातो.
हीच जाणीव ठेवून उच्च शिक्षण संचालनालयाने संकल्प केला होता. दिवाळीपूर्वी प्रत्येक शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि तासिका तत्त्वावर (सीएचबी) कार्यरत असलेल्या हजारो प्राध्यापकांच्या खात्यात वेतन आणि मानधन जमा झालेच पाहिजे. गेले पंधरा दिवस संचालनालयाची संपूर्ण टीम अहोरात्र कार्यरत होती. विभागीय सहसंचालकांनी कोषागार कार्यालयांशी सातत्याने समन्वय साधला आणि त्रुटींची वेळीच पूर्तता केली. नियमित आढावा बैठकांमधून प्रत्येक टप्प्यावर लक्ष ठेवण्यात आले.
या प्रयत्नांचे फलित म्हणून राज्यातील सर्व दहा विभागांमध्ये वेतन आणि सीएचबी मानधन संबंधितांच्या खात्यात जमा झाले आहे.
“राज्यावर दुष्काळाचे सावट असताना कोणाच्याही अडचणीत भर पडू नये, हीच आमची भावना होती. होय, आम्ही करून दाखवलं. ज्ञानाचा दीप उजळवणाऱ्या प्रत्येकाच्या घरात आनंदाचे दीप उजळोत, हीच सदिच्छा,” असे उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी .त्यांनी सर्वांना दिवाळीच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
— उच्च शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे
Directorate of Higher Education, Pune retweeted
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या शिक्षणात आर्थिक अडथळा येऊ नये, यासाठी विद्यापीठांनी पुढाकार घ्यावा!
राज्यातील ३४ जिल्ह्यांमधील २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळी परिस्थिती घोषित करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित भागातील विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये होणाऱ्या प्रथम सत्राच्या परीक्षांचे पात्र विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्याबाबत उच्च शिक्षण संचालनालयाने परिपत्रक जारी केले आहे.
मात्र, केवळ शासन निर्णयाची अंमलबजावणी करून थांबायचे नाही. दुष्काळी परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांना शिक्षण घेताना येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन विद्यापीठे आणि महाविद्यालयांनी संवेदनशीलतेने पुढाकार घ्यावा, असे निर्देश आज राज्यातील सर्व सार्वजनिक विद्यापीठांचे कुलगुरू, प्र-कुलगुरू, कुलसचिव आणि महाविद्यालयांच्या प्राचार्यांसोबत झालेल्या ऑनलाइन आढावा बैठकीत दिले.
अतिवृष्टीच्या काळात राबवलेल्या मेंटर-मेंटी उपक्रमाप्रमाणे सक्षम महाविद्यालयांनी दुष्काळग्रस्त भागातील महाविद्यालये आणि विद्यार्थ्यांना मदतीचा हात द्यावा. उच्च शिक्षण क्षेत्राने ही परिस्थिती एक कुटुंब म्हणून एकत्रितपणे हाताळावी.
यासाठी उच्च शिक्षण संचालनालयात स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यासोबतच प्रत्येक विद्यापीठ स्तरावर टास्क फोर्स स्थापन करून विद्यार्थ्यांसाठी आवश्यक मदतकार्य सुरू करावे, तसेच या उपाययोजनांचा दर १५ दिवसांनी आढावा घ्यावा, असे निर्देश दिले आहेत.
दुष्काळाच्या संकटामुळे एकाही विद्यार्थ्याचे शिक्षण थांबू नये, हीच आपली सामूहिक जबाबदारी आहे.
#दुष्काळग्रस्तविद्यार्थी #परीक्षाशुल्कमाफी #उच्चशिक्षण #विद्यार्थीहित #HigherEducation #Maharashtra
@CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mieknathshinde @SunetraA_Pawar @BJP4Maharashtra
Directorate of Higher Education, Pune retweeted
आज मंत्रालयात उच्च व तंत्रशिक्षण विभाग आणि महाप्रीत (MAHAPREIT) यांच्यात राज्यातील ५७ शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालये व तंत्रनिकेतनांच्या सौरऊर्जिकीकरणासंदर्भात झालेल्या सामंजस्य करारांतर्गत आयोजित आढावा बैठक माझ्या अध्यक्षतेखाली पार पडली.
या बैठकीत शैक्षणिक संस्थांचा वीज खर्च कमी करून स्वच्छ व हरित ऊर्जेला चालना देण्यासाठी सर्व प्रशासकीय प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश दिले.
तसेच 'Ground-mounted Solar – Open Access' अंतर्गत चंद्रपूर, अमरावती, धाराशिव, वाशिम, कोल्हापूर, नंदुरबार, आर्वी, बीड, साकोली, जालना व खामगाव यांसह सर्व ५७ संस्थांमध्ये सौरक्षमेचा पूर्ण उपयोग करून ऊर्जा बचत व पर्यावरणपूरक परिसर निर्मितीवर भर देण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या.
या बैठकीस उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी. वेणूगोपाल रेड्डी, उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ संचालक तथा तंत्रशिक्षण विभागाचे संचालक डॉ. प्रमोद नाईक, उच्च शिक्षण विभागाचे उपसचिव अशोक मांडे, उपसचिव प्रताप लुबाळ, उपसचिव अमोल मुत्याल, सहसंचालक डॉ. अर्चना बोऱ्हाडे तसेच महाप्रीत आणि संबंधित संस्थांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
📍 २९ सप्टेंबर २०२६, मुंबई
#GreenEnergy #SolarEnergy #MAHAPREIT #HigherEducation #TechnicalEducation #MaharashtraGovernance
@CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mieknathshinde @SunetraA_Pawar @BJP4Maharashtra
Directorate of Higher Education, Pune retweeted
एकल माता पालक कुटुंबातील विद्यार्थ्यांना शिक्षणात आधार देण्यासाठी धोरणात्मक पाऊल!
आज मंत्रालयात एकल माता पालक कुटुंबातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सहाय्य, संरक्षण व सक्षमीकरणासाठी तयार करण्यात येत असलेल्या ‘धोरण-२०२६’ बाबत आढावा बैठक घेऊन सविस्तर चर्चा केली.
HSNC विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. हेमलता बागला यांच्या अध्यक्षतेखाली नियुक्त समितीने तयार केलेला अहवाल उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर व सहसंचालक डॉ. अर्चना बोऱ्हाडे यांच्याकडे सादर करण्यात आला.
एकल माता पालक कुटुंबातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेताना आर्थिक, सामाजिक किंवा शैक्षणिक अडचणींचा सामना करावा लागू नये, तसेच त्यांना आवश्यक शैक्षणिक सहाय्य व संरक्षण मिळावे, यासाठी हे धोरण तयार करण्यात येत आहे. या धोरणाचा लाभ देताना संबंधित विद्यार्थी-विद्यार्थिनीची संमती घेण्याबाबतही बैठकीत चर्चा करण्यात आली.
या बैठकीस उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, राज्य सामाईक परीक्षा कक्षाचे आयुक्त दिलीप सरदेसाई, उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाचे संचालक तथा तंत्रशिक्षण विभागाचे संचालक डॉ. प्रमोद नाईक, उच्च शिक्षण विभागाचे उपसचिव अशोक मांडे, उपसचिव अमोल मुत्याल, उपसचिव प्रताप लुबाळ, सहसंचालक डॉ. अर्चना बोऱ्हाडे, HSNC विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. हेमलता बागला, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राजनीश कामत, समितीचे सदस्य तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रवास अधिक सुरक्षित, सुलभ आणि सक्षम करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे.
📍२८ सप्टेंबर २०२६ | मुंबई
#उच्चवतंत्रशिक्षण #एकलमातापालक #शैक्षणिकसहाय्य #शिक्षण #धोरण2026 #Maharashtra #HigherEducation #StudentEmpowerment
@CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mieknathshinde @SunetraA_Pawar @BJP4Maharashtra
Directorate of Higher Education, Pune retweeted
राज्यातील खासगी विद्यापीठांच्या संबंधित निकषांचा अभ्यास करण्यासाठी नियुक्त केलेल्या डॉ. भूषण पटवर्धन समितीची आढावा बैठक आज मंत्रालयात माझ्या अध्यक्षतेखाली पार पडली.
या बैठकीत खासगी विद्यापीठांचे निकष, उच्च शिक्षणाचा दर्जा, भविष्यातील गरजा व कार्यपद्धतीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. तसेच सर्वंकष अभ्यासांती योग्य शिफारसी सादर करण्यासाठी समितीला ऑक्टोबर २०२६ अखेरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून, निर्धारित वेळेत अभ्यास पूर्ण करून अंतिम अहवाल सादर करण्याच्या स्पष्ट सूचना प्रशासनाला दिल्या.
या बैठकीस उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, राज्य सामाईक परीक्षा कक्षाचे आयुक्त दिलीप सरदेसाई, उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, तंत्रशिक्षण संचालक डॉ. प्रमोद नाईक, उपसचिव अशोक मांडे, अमोल मुत्याल, प्रताप लुबाळ, सहसंचालक डॉ. अर्चना बोऱ्हाडे, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राजनीश कामत, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रविंद्र कुलकर्णी, प्र-कुलगुरू डॉ. अजय भामरे व समितीचे सदस्य (ऑनलाइन) उपस्थित होते.
📍२८ सप्टेंबर २०२६, मुंबई
#HigherEducation #TechnicalEducation #MaharashtraGovernment #PrivateUniversities #EducationPolicy #QualityEducation #Mumbai
@CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mieknathshinde @SunetraA_Pawar @BJP4Maharashtra
Directorate of Higher Education, Pune retweeted
विद्यार्थ्यांच्या कौशल्यविकासाला नवी दिशा!
आज मंत्रालयात DELL टेक्नॉलॉजी आणि लर्निंग लिंक्स फाउंडेशनच्या ‘उडान (UdAAN)’ कार्यक्रमाच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेऊन उच्च शिक्षणातील विद्यार्थ्यांसाठी आधुनिक व रोजगाराभिमुख कौशल्यविकासाच्या संधींबाबत सविस्तर चर्चा केली.
कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), क्लाउड कॉम्प्युटिंग आणि इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग यांसारख्या भविष्यातील तंत्रज्ञान क्षेत्रांमध्ये विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देऊन त्यांना उद्योगाच्या बदलत्या गरजांसाठी सक्षम करण्यावर विशेष भर देण्यात आला.
शिक्षणासोबतच डिजिटल कौशल्ये, तंत्रज्ञानाचे ज्ञान आणि रोजगारक्षमता वाढविण्यासाठी उद्योग व सामाजिक संस्थांच्या सहकार्याने विविध उपक्रम राबविण्याच्या दिशेने आज सकारात्मक चर्चा झाली.
या बैठकीला अपर मुख्य सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, तंत्रशिक्षण संचालक डॉ. प्रमोद नाईक, DELL टेक्नॉलॉजीचे CSR प्रमुख प्रभात भट्टाचार्य आणि लर्निंग लिंक्स फाउंडेशनचे गणेश भागवत उपस्थित होते.
📍२८ सप्टेंबर २०२६ | मुंबई
#HigherEducation #SkillDevelopment #DigitalSkills #AI #CloudComputing #ElectronicsManufacturing
#मुंबई
@CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mieknathshinde @SunetraA_Pawar @BJP4Maharashtra
Directorate of Higher Education, Pune retweeted
शिक्षणाच्या वाटचालीत प्रत्येक विद्यार्थ्याला आधार!
एकल माता पालक कुटुंबातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सहाय्य, संरक्षण आणि सक्षमीकरणासाठी ‘धोरण-२०२६’ बाबत मंत्रालयात आढावा बैठक घेऊन सविस्तर चर्चा केली.
या महत्वपूर्ण बैठकीतील क्षणचित्रे!
#उच्चवतंत्रशिक्षण #धोरण2026 #एकलमातापालक #StudentEmpowerment #HigherEducation #Maharashtra
@CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mieknathshinde @SunetraA_Pawar @BJP4Maharashtra
Directorate of Higher Education, Pune retweeted
विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत ‘स्वामी विवेकानंद युवा सुरक्षा योजने’ची विद्यापीठे व महाविद्यालयांमध्ये प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबत आज मंत्रालयात आढावा बैठक घेतली.
योजनेचा लाभ प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोहोचावा, यासाठी विद्यापीठांनी महाविद्यालयांना स्पष्ट सूचना देऊन तातडीने कार्यवाही सुनिश्चित करावी, असे निर्देश दिले.
योजनेच्या अंमलबजावणीत दिरंगाई होऊ नये आणि विद्यापीठे-महाविद्यालयांमध्ये योग्य समन्वय राहावा, यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या.
या बैठकीस उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाचे संचालक तथा तंत्रशिक्षण विभागाचे संचालक डॉ. प्रमोद नाईक, उच्च शिक्षण विभागाचे उपसचिव अशोक मांडे, उपसचिव प्रताप लुबाळ, उपसचिव अमोल मुत्याल, सहसंचालक डॉ. अर्चना बोऱ्हाडे तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.
📍२९ सप्टेंबर २०२६ | मुंबई
#स्वामीविवेकानंदयुवासुरक्षायोजना #विद्यार्थीसुरक्षा #उच्चवतंत्रशिक्षण #विद्यार्थीकल्याण #महाराष्ट्र #StudentSafety #HigherEducation #MaharashtraGovernment
@CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mieknathshinde @SunetraA_Pawar @BJP4Maharashtra
संकल्प अभियानानिमित्त डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांची आकाशवाणीवर विशेष मुलाखत
पुणे, १८ सप्टेंबर २०२६ — पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे तसेच त्यांच्या सार्वजनिक जीवनातील कारकिर्दीला २५ वर्षे पूर्ण होत असल्याचे औचित्य साधून देशभर १७ ऑक्टोबरपर्यंत राबविण्यात येत असलेल्या ‘सेवा संकल्प अभियाना’चा भाग म्हणून आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागाने उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांची विशेष मुलाखत घेतली.
या मुलाखतीत डॉ. देवळाणकर यांनी महाराष्ट्रातील उच्च शिक्षणाची वाटचाल, विकसित भारताच्या संकल्पातील शिक्षणाची भूमिका, राष्ट्रीय शिक्षण धोरणाची (NEP) राज्यातील अंमलबजावणी, भारतीय ज्ञान परंपरा (IKS), कौशल्य विकास आणि मुलींना शिक्षण शुल्क माफी अशा विविध विषयांवर सविस्तर भाष्य केले. राज्यातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण, रोजगाराभिमुख शिक्षण उपलब्ध करून देण्याच्या शासनाच्या प्रयत्नांचीही त्यांनी माहिती दिली.
पुढील महिनाभर उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या अंतर्गत राज्यभरातील विद्यापीठे व महाविद्यालयांमध्ये संकल्प अभियानांतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
...
1
128
Directorate of Higher Education, Pune retweeted
आज मंत्रालयात माझ्या अध्यक्षतेखाली भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी नागपूर येथे घेतलेल्या ऐतिहासिक बौद्ध धम्मदीक्षेशी संबंधित दुर्मिळ पत्रव्यवहार, कागदपत्रे व महत्त्वपूर्ण दस्तऐवज संकलित करून त्यांचा नवीन खंड प्रकाशित करण्याबाबत विशेष बैठक पार पडली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या या ऐतिहासिक धम्मदीक्षेचा दैदिप्यमान इतिहास आणि सामाजिक परिवर्तनाचे विचार पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी या दुर्मिळ साहित्याचे संकलन व संवर्धन करण्याबाबत बैठकीत सविस्तर चर्चा झाली.
हा महत्त्वपूर्ण ऐतिहासिक ठेवा अभ्यासक व नागरिकांना लवकरात लवकर उपलब्ध व्हावा, यासाठी संबंधित काम अत्यंत गतीने पूर्ण करून नवीन खंड येत्या २० ऑक्टोबर २०२६ रोजी दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर प्रकाशित करण्याचे स्पष्ट निर्देश प्रशासनाला दिले.
या बैठकीस उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाचे संचालक तथा तंत्रशिक्षण विभागाचे संचालक डॉ. प्रमोद नाईक, उच्च शिक्षण विभागाचे उपसचिव अशोक मांडे, उपसचिव प्रताप लुबाळ, सहसंचालक डॉ. अर्चना बोऱ्हाडे तसेच समितीचे सर्व सचिव व सदस्य उपस्थित होते.
📍 ९ सप्टेंबर २०२६, मुंबई
#BabasahebAmbedkar #DhammaChakraPravartanDin #Nagpur #MaharashtraGovernment #HigherEducation #DocumentaryHistory #Publication
@CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mieknathshinde @SunetraA_Pawar @BJP4Maharashtra
Directorate of Higher Education, Pune retweeted
मराठी भाषा विद्यापीठाच्या कामकाजाला गती देण्यासाठी महत्त्वपूर्ण आढावा बैठक!
अमरावती जिल्ह्यातील रिद्धपूर येथे स्थापन करण्यात आलेल्या मराठी भाषा विद्यापीठाच्या विविध प्रलंबित विषयांबाबत मंत्रालयात आढावा बैठक घेऊन सविस्तर चर्चा केली.
मराठी भाषा, साहित्य, संस्कृती आणि आपल्या समृद्ध ज्ञानपरंपरेच्या संवर्धनासाठी हे विद्यापीठ अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. विद्यापीठाच्या विविध प्रलंबित कामांना गती देऊन त्याचे कामकाज अधिक सक्षमपणे पुढे नेण्याबाबत बैठकीत सकारात्मक चर्चा झाली.
मराठी भाषेच्या संवर्धनासोबतच संशोधन, शिक्षण आणि ज्ञाननिर्मितीचे प्रभावी केंद्र म्हणून रिद्धपूर येथील मराठी भाषा विद्यापीठाची उभारणी करण्यासाठी शासन स्तरावर आवश्यक ती कार्यवाही गतिमान करण्याचा माझा प्रयत्न राहील.
या बैठकीस उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, उपसचिव प्रताप लुबाळ, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अविनाश आवलगावकर, अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे अध्यक्ष महंत कारंजेकर बाबा तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.
मराठी भाषा आणि संस्कृतीचा गौरव वाढविणाऱ्या या विद्यापीठाच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
📍९ सप्टेंबर २०२६ | मुंबई
#मराठीभाषा #मराठीभाषाविद्यापीठ #रिद्धपूर #उच्चशिक्षण #mumbai
@CMOMaharashtra @Dev_Fadnavis
@mieknathshinde @SunetraA_Pawar @BJP4Maharashtra
Directorate of Higher Education, Pune retweeted
विद्यार्थ्यांच्या नवकल्पनांना उद्योगांची जोड!
आज मंत्रालयात माझ्या अध्यक्षतेखाली उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या वतीने आयोजित आढावा बैठकीत विद्यार्थ्यांच्या नवकल्पनांना, संशोधनाला आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत राज्याची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
बैठकीत राज्यातील विद्यापीठे व उद्योग क्षेत्रात समन्वय साधून कल्पकतेला उद्योगाभिमुख दिशा देणे, संशोधनाचे प्रत्यक्ष व्यवसाय व स्टार्टअपमध्ये रूपांतर करण्यासाठी आवश्यक सुविधा व संस्थात्मक पाठबळ पुरवणे आणि मुंबई व शिवाजी विद्यापीठाच्या इन्क्युबेशन सेंटरद्वारे नवउद्योगांना थेट बाजारपेठेशी जोडणाऱ्या सक्षम राज्यस्तरीय धोरणाला गती देण्याबाबत प्रशासनाला निर्देश दिले.
या बैठकीस उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाचे संचालक तथा तंत्रशिक्षण विभागाचे संचालक डॉ. प्रमोद नाईक, उपसचिव अमोल मुत्याल, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरचे कुलगुरू डॉ. राजनीश कामत व संबंधित अधिकारी उपस्थित होते.
📍 ९ सप्टेंबर २०२६, मुंबई
#StartupMaharashtra #IncubationCenter #StartupEcosystem #YouthEmpowerment #EmploymentGeneration
@CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mieknathshinde @SunetraA_Pawar @BJP4Maharashtra
Directorate of Higher Education, Pune retweeted
गुणात्मक शिक्षणाचा गौरव, गुरुजनांचा खरा सन्मान!
आज सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संत ज्ञानेश्वर सभागृहात आयोजित विशेष सोहळ्यात उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या वतीने दिला जाणारा 'डॉ. जे. पी. नाईक आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार' सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला.
सन २०१२ नंतर तब्बल १४ वर्षांच्या प्रदीर्घ खंडानंतर केवळ गुणवत्तेच्या निकषावर ही गौरव परंपरा पुन्हा सुरू करण्यात आली असून राज्यातील ४२ गुणवंत प्राध्यापक व शिक्षकांना हा पुरस्कार प्रदान करताना मला अतिशय आनंद झाला.
विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता त्यांना अंतर्मुख करून विचार करायला लावणारे आणि जीवनमूल्यांची पेरणी करणारे शिक्षण आज गरजेचे आहे. आगामी वर्षापासून शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यासोबतच शिक्षण क्षेत्रातील नवप्रयोगांसाठी 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर विशेष पुरस्कार' सुरू करण्याची घोषणाही यावेळी केली.
या सोहळ्यास उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, डॉ. किशोर इंगळे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. सुरेश गोसावी, प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांच्यासह राज्यातील विविध महाविद्यालयांचे पुरस्कारप्राप्त प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यापीठाचे कर्मचारी उपस्थित होते.
📍 ५ सप्टेंबर २०२६, पुणे
#शिक्षक_पुरस्कार #डॉ_जेपी_नाईक_पुरस्कार #HigherEducation #DrJPNaikAward #EducationalExcellence #ValuesInEducation #Pune
@CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mieknathshinde @SunetraA_Pawar @BJP4Maharashtra
Directorate of Higher Education, Pune retweeted
कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी पेलणाऱ्या एकल माता आणि त्यांच्या पाल्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी 'एकल' विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास आणि त्यांच्या आयुष्यातील संघर्षाला योग्य आधार देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
(५ सप्टेंबर २०२६ | डॉ. जे. पी. नाईक आदर्श राज्य पुरस्कार सोहळा, पुणे)
#एकलमाता #एकलविद्यार्थी #EkalStudents #SingleMother #StudentSurvey #EducationSupport #WomenEmpowerment
@CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mieknathshinde @SunetraA_Pawar @BJP4Maharashtra
Directorate of Higher Education, Pune retweeted
आपल्या आयुष्यातील प्रत्येक परंपरेमागे एक सखोल अर्थ आणि विज्ञान असते. केवळ अंधानुकरण न करता, त्यामागील मूळ उद्देश व तर्क समजून घेऊन, त्यांना विवेकाने आचरणात आणणे हीच खऱ्या शिक्षणाची दिशा आहे.
(५ सप्टेंबर २०२६ | डॉ. जे. पी. नाईक आदर्श राज्य पुरस्कार सोहळा, पुणे)
#IndianTradition #TraditionAndScience #वैज्ञानिकदृष्टिकोन #विवेकवादीविचार
@CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mieknathshinde @SunetraA_Pawar @BJP4Maharashtra
Directorate of Higher Education, Pune retweeted
गुरुजनांचा सन्मान, उज्ज्वल भविष्याची उभारणी!
आज सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात उच्च व तंत्रशिक्षण विभागातर्फे आयोजित सोहळ्यात राज्यातील ४२ गुणवंत शिक्षकांना 'डॉ. जे. पी. नाईक राज्य शिक्षक पुरस्काराने' गौरविताना मनस्वी आनंद झाला.
या पुरस्कार सोहळ्यातील क्षणचित्रे...
📍 ५ सप्टेंबर २०२६, पुणे
#DrJPNaikAward #HigherEducation #PuneUniversity #EducationalExcellence #TeacherAwards #शिक्षक_पुरस्कार #उच्च_आणि_तंत्रशिक्षण #पुणे
@CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mieknathshinde @SunetraA_Pawar @BJP4Maharashtra
Directorate of Higher Education, Pune retweeted
डॉ. जे.पी. नाईक आदर्श शिक्षक पुरस्कारांची निवड ही कोणत्याही शिफारशीविना, केवळ गुणवत्ता आणि पारदर्शकतेच्या आधारेच करण्यात आली आहे. 'चौकट वाढवेन पण ती मोडणार नाही' या भूमिकेवर ठाम राहत, शिक्षकांच्या सन्मानाची ही समृद्ध परंपरा आम्ही जपली आहे.
(५ सप्टेंबर २०२६ | डॉ. जे. पी. नाईक आदर्श राज्य पुरस्कार सोहळा, पुणे)
#आदर्शशिक्षकपुरस्कार #शिक्षकसन्मान #गुणवत्ता_आणि_पारदर्शकता #डॉजेपीनाईक #EducationFirst #Pune
@CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mieknathshinde @SunetraA_Pawar @BJP4Maharashtra
Directorate of Higher Education, Pune retweeted
आज मंत्रालयात राज्यातील सर्व सार्वजनिक विद्यापीठांच्या कुलगुरूंसोबत ऑनलाईन आढावा बैठक माझ्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत राज्यातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच आरोग्य सुविधा आणि विद्यार्थीपूरक पोषक वातावरण उपलब्ध करून देण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
विद्यापीठांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी व सर्वांगीण विकासासाठी अतिशय संवेदनशीलतेने व तत्परतेने कार्य करणे गरजेचे असून, त्यांच्या अडचणींवर तातडीने व ठोस उपाययोजना कराव्यात. तसेच कुलगुरूंनी विद्यार्थ्यांशी नियमित संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घ्याव्यात आणि त्यावर केलेल्या कार्यवाहीचा सविस्तर अहवाल सादर करावा, अशा स्पष्ट सूचना यावेळी प्रशासनाला दिल्या.
या बैठकीला उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाचे संचालक डॉ. प्रमोद नाईक, उपसचिव अशोक मांडे, महाराष्ट्र राज्य कला संचालनालयाचे संचालक डॉ. किशोर इंगळे, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंमलबजावणी समितीचे अध्यक्ष तथा माजी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्यासह राज्यातील सर्व सार्वजनिक विद्यापीठांचे कुलगुरू ऑनलाईन उपस्थित होते.
📍१८ ऑगस्ट २०२६,मुंबई
#HigherEducation #StudentWelfare #QualityEducation #Maharashtra #UniversityMeeting #StudentFirst
@CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mieknathshinde @SunetraA_Pawar @BJP4Maharashtra
Directorate of Higher Education, Pune retweeted
आज मुंबई येथे उच्च शिक्षण क्षेत्रातील प्रशासकीय कामकाज अधिक गतिमान, पारदर्शक, सुरक्षित आणि कागदरहित करण्यासाठी उच्च शिक्षण संचालनालयाच्या कार्यक्षेत्रातील अशासकीय अनुदानित महाविद्यालयांसाठी ‘ई-ऑफिस प्रणाली’चे लोकार्पण माझ्या हस्ते पार पडले.
या प्रणालीद्वारे राज्यातील १,२३१ अशासकीय अनुदानित महाविद्यालये, विभागीय कार्यालये, संचालनालय व मंत्रालय डिजिटल पत्रव्यवहाराने थेट जोडले जातील. 'सेवार्थ आयडी'शी संलग्न असणाऱ्या या व्यवस्थेमुळे ई-फाईल, प्रस्ताव व अहवालांचे व्यवस्थापन वेगाने आणि सुरक्षितपणे होऊन कागदरहित, पारदर्शक व गतिमान प्रशासनाला चालना मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त केला.
या सोहळ्याला उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, उपसचिव प्रताप लुबाळ, उपसचिव अशोक मांडे, सहसंचालक डॉ. अर्चना बोऱ्हाडे यांच्यासह संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
📍१२ ऑगस्ट २०२६, मुंबई
#eOffice #DigitalGovernance #HigherEducation #GovernmentOfMaharashtra #DigitalMaharashtra
@CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mieknathshinde @SunetraA_Pawar @BJP4Maharashtra
Directorate of Higher Education, Pune retweeted
आज मंत्रालयात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची (NEP) राज्यात प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी राज्यातील सर्व सार्वजनिक विद्यापीठांच्या कुलगुरूंची ऑनलाईन बैठक माझ्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी राज्यातील उच्च शिक्षण क्षेत्रातील विविध विषयांवर सविस्तर आढावा घेण्यात आला.
या बैठकीत शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून ४ वर्षांच्या ऑनर्स अभ्यासक्रमाचा आराखडा तयार करणे, १ आठवड्यात एकसमान शैक्षणिक वेळापत्रक लागू करणे आणि विद्यार्थ्यांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी कुलगुरू व प्र-कुलगुरूंनी दर आठवड्याला ५० विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याच्या सूचना दिल्या.
तसेच महाविद्यालयांचे क्लस्टर तयार करून सुविधांचे सामायिकरण वाढवणे, दरमहा क्लस्टर उपक्रम राबवणे आणि पेपरफुटी रोखण्यासाठी कठोर SOP तयार करण्याचे यावेळी आदेश दिले.
या बैठकीस उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, MSBTE संचालक डॉ. प्रमोद नाईक, उपसचिव प्रताप लुबाळ, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी, NEP समितीचे अध्यक्ष डॉ. नितीन करमळकर यांच्यासह सर्व कुलगुरू उपस्थित होते.
📍 ११ ऑगस्ट २०२६, मुंबई
#NEP2020 #HigherEducation #MaharashtraEducation #QualityEducation #StudentFirst #UniformAcademicCalendar #EducationReform #Mumbai
@CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mieknathshinde @SunetraA_Pawar @BJP4Maharashtra














































