#शेतकरी व ग्रामीण भागातील #उद्योजकांसाठी मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना
अर्ज प्रारंभ : २६ नोव्हेंबर २०२६ पासून
अनुदान : सर्वसाधारण प्रर्वगासाठी 50 टक्के ; एससी/एसटी 75 टक्के
49
बालपण फुलू द्या, स्वप्नांना उमलू द्या!
बालविवाह रोखण्यासाठी राज्यव्यापी मोहीम
#बालसंरक्षण
#बालकल्याण
#बालविवाहनिर्मूलन
#MahaDGIPR
33
औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये राबविण्यात येणारा अल्पमुदतीच्या रोजगारक्षम अभ्यासक्रम कार्यक्रम ‘संत रोहिदास अल्पमुदत रोजगारक्षम अभ्यासक्रम कार्यक्रम’ या नावाने ओळखला जाणार आहे.
This quoted post is unavailable.
1
26
कार्तिकी यात्रा २०२६ निमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात आयोजित शासकीय महापूजा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मानाचे वारकरी सुधाकर दशरथ शिंदे यांच्या हस्ते सपत्नीक संपन्न झाली.
📍पंढरपूर
कार्तिकी यात्रा २०२६ निमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात आयोजित शासकीय महापूजा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मानाचे वारकरी सुधाकर दशरथ शिंदे यांच्या हस्ते सपत्नीक संपन्न झाली.
राज्यातील दुष्काळी परिस्थिती दूर होऊन बळीराजा आणि सर्वसामान्य जनतेच्या जीवनात सुख, समृद्धी व समाधान नांदू दे, असे साकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्री विठ्ठलाच्या चरणी घातले.
यावेळी फलोत्पादन मंत्री भरत गोगावले, सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर, खासदार श्रीकांत शिंदे, खासदार संजय जाधव, आमदार अभिजित पाटील, बापूसाहेब पठारे, राजू खरे, जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, समितीचे कार्यकारी अधिकारी श्रीकांत यादव, समिती सदस्य व अन्य मान्यवर उपस्थित होते.
पंढरपूर येथे कार्तिकी यात्रेदरम्यान लाखो भाविक श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी येतात. सध्या संपूर्ण पंढरपूर भक्तिमय वातावरणाने भारावून गेले आहे. आपण सर्वजण येथे वारकरी भावनेने येतो. सर्वसामान्य वारकऱ्यांना श्री विठ्ठलाचे दर्शन सुलभतेने व कमी वेळेत मिळावे, यासाठी व्हीआयपी दर्शन बंद करण्यात आले आहे. त्यामुळे दर्शनासाठी लागणारा वेळ कमी होऊन वारकऱ्यांना लवकर दर्शनाचा लाभ मिळत असल्याबद्दल उपमुख्यमंत्री शिंदे यांनी समाधान व्यक्त केले.
राज्यातील ३१० तालुक्यांमध्ये दुष्काळी परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे. खरीप व रब्बी हंगामातील पाऊस अत्यंत कमी झाल्यामुळे शेतकऱ्यांवर मोठे संकट ओढवले असून, शेतीपिकांचे नुकसान झाले आहे. अशा संकटाच्या काळात शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. दुष्काळी परिस्थिती दूर होऊन चांगला पाऊस पडावा, बळीराजावरील संकट दूर व्हावे आणि त्याच्या जीवनात सुख-समाधानाचे दिवस यावेत, असे साकडे पांडुरंगाला घातल्याचे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.
दुष्काळी परिस्थितीतून शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व सर्व मंत्री शेतकऱ्यांच्या बांधावर तसेच त्यांच्या घरी जाऊन भेटी घेत आहेत. दिवाळीच्या काळात शासनाकडून आर्थिक मदत तत्परतेने वितरित करण्यात आली असून, दुष्काळी परिस्थितीत लागू असलेल्या विविध सवलतीही जाहीर करण्यात आल्या आहेत. आपत्तीच्या काळात शासन शेतकऱ्यांना तातडीने मदत करत असल्याचे त्यांनी सांगितले.
आषाढी व कार्तिकी यात्रेदरम्यान वारकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या सुविधांमध्ये दरवर्षी सुधारणा करण्यात येत आहेत. वारकऱ्यांसाठी आवश्यक सुविधा निर्माण करण्याकरिता शासनाकडून निधी उपलब्ध करून दिला जात आहे. दर्शन मंडपासाठी आवश्यक असलेला अतिरिक्त २५ कोटी रुपयांचा निधी पर्यटन विभागामार्फत तत्काळ उपलब्ध करून देण्यात आला आहे. पंढरपूर कॉरिडॉरचे काम सर्व संबंधितांना विश्वासात घेऊनच करण्यात येणार असल्याचेही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले.
प्रारंभी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांच्या पत्नी लता एकनाथ शिंदे तसेच मानाचे वारकरी सुधाकर दशरथ शिंदे व त्यांच्या पत्नी प्रणिता सुधाकर शिंदे यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा करण्यात आली. यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते मानाचे वारकरी शिंदे दाम्पत्याचा श्री विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती व वस्त्र देऊन सन्मान करण्यात आला. तसेच एसटी महामंडळातर्फे देण्यात येणारा एक वर्षाचा मोफत प्रवास पास त्यांना प्रदान करण्यात आला. मंदिर समितीच्या वतीने उपमुख्यमंत्री शिंदे यांचाही सन्मान करण्यात आला. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते मंदिर समितीच्या 'दैनंदिनी २०२७' चे प्रकाशन करण्यात आले.
@mieknathshinde @ibharatgogawale @iprakashabitkar @DrSEShinde
#कार्तिकीएकादशी #कार्तिकीवारी #कार्तिकीएकादशी२०२६ #पंढरपूर
34
समान नागरी कायद्याबाबत (#UCC) अमरावती विभागाची जनसुनावणी रविवार,दि. २९ नोव्हेंबर २०२६ रोजी नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती येथे आयोजित करण्यात आली आहे. यात विभागातील पाचही जिल्ह्यांतील नागरिकांना सहभागी होता येणार आहे.
सविस्तर वृत्त :
dio-akola.blogspot.com/2026/…
#युसीसी
54
#महात्मा_फुले यांचे विचार आजही शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक! शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीचे वास्तव मांडणारा ‘शेतकऱ्याचा असूड’ हा ग्रंथ आजही महत्त्वपूर्ण आहे. शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी या ग्रंथातील विचारांचा प्रचार, प्रसार आणि प्रबोधन होणे आवश्यक
- मंत्री छगन भुजबळ यांनी केले.
37
तुमचा फार्मर आयडी तयार आहे का ?
आजच जवळच्या सीएससी केंद्राला भेट द्या
#शेतकरी
#फार्मरआयडी
#FarmerID
#MahaDGIPR
51
महात्मा जोतीराव फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षानिमित्त वर्षभर विविध कार्यक्रम
#MahatmaPhule200
#महात्माफुले200 #MahatmaJyotiraoPhule_BicentenaryBirthYear #महात्माजोतीरावफुले_द्विशताब्दीजन्मवर्ष
35
राज्यातील दुष्काळी परिस्थितीत कोणतेही जनावर चारा आणि पाण्याअभावी दगावणार नाही, याची संपूर्ण खबरदारी राज्य शासनाने घेतली असून शेतकऱ्यांनी कोणत्याही परिस्थितीत आपली जनावरे अथवा #गोवंश विकू नये-
#दुष्काळनिवारणउपाययोजना मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष
तथा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे
36
जनगणना २०२७ च्या कामास जिल्हा प्रशासनाने सर्वोच्च प्राधान्य द्यावे- मुख्य सचिव राजेश अग्रवाल
* १० ते २४ जानेवारीदरम्यान स्वयं-गणना ;
* २५ जानेवारीपासून घरोघरी लोकसंख्या गणना
mahasamvad.in/222558
#census2027
#जनगणना
56
मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेअंतर्गत २४ योजनांसाठी महाडीबीटी २.० प्रणालीवर ऑनलाइन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध
#मत्स्यव्यवसाय
#मच्छीमार
#मत्स्यसंपदायोजना
#महाडीबीटी
#MahaDGIPR
23
शेतकरी सुखी व्हायचा असेल तर महात्मा जोतीराव फुले यांची त्रिसूत्री
#महात्माफुले200
#महात्माजोतीरावफुले_द्विशताब्दीजन्मवर्ष
#महाज्योती #महाराष्ट्रशासन
#MahatmaPhule200 #MahatmaJyotiraoPhule_BicentenaryBirthYear #MahaDGIPR
37
#अकाेला
#अमृतदुर्गोत्सव2026 मध्ये सहभागी होण्याची ३० नोव्हेंबरपर्यंत संधी !
दिवाळीत साकारलेल्या गड-किल्ल्यांच्या प्रतिकृतींचे छायाचित्र-सेल्फी amrutdurgotsav.com येथेअपलोड करा.
विद्यार्थी, तरुण, पालक, शिक्षक, संस्था व नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा!
26
दुष्काळग्रस्त भागातील वैद्यकीय विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कमाफीसाठी उत्पन्न मर्यादेची अट शिथिल
#शिक्षण
#दुष्काळ
#वैद्यकीयशिक्षण
#MahaDGIPR
28
आदिवासी वनपट्टाधारकांच्या मालकी हक्कांचे संरक्षण
११ जिल्ह्यांतील ३५ विधानसभा मतदारसंघांत पात्र लाभार्थ्यांना ७ ई आणि १२ ई उतारेव स्वामित्व प्रमाणपत्रे १५ डिसेंबरपर्यंत देण्याचेउद्दिष्ट
१ जानेवारी२०१५ पूर्वीपासून जमीनकसत असल्याचा पुरावाअसलेल्या शेतकऱ्यांना फार्मरआयडी दिला जाणार
34
रब्बी हंगामातील पिकांसाठी विमा नोंदणी सुरु.
✅ज्वारी, गहू, मका, उन्हाळी भात, मूग, हरभरा व कांदा या पिकांसाठी विमा संरक्षण उपलब्ध.
📷अधिक माहितीसाठी व नोंदणीसाठी :
pmfby.gov.in येथे भेट द्या.
#शेतकरी
#DroughtRelief
#Farmer
36
गेट वे ऑफ इंडिया 26/11 पीस कॉन्सर्ट : ग्लोबल पीस ऑनर्स
शांतता, सहकार्य आणि मानवतेची मूल्ये अधिक बळकट करणे गरजेचे आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारताच्या संकल्पपूर्तीसाठी तसेच सुरक्षित भारताच्या निर्मितीसाठी प्रत्येकाने योगदान द्यावे, असे आवाहनही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
गेट वे ऑफ इंडिया 26/11 पीस कॉन्सर्ट : ग्लोबल पीस ऑनर्स’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, मंत्री पंकजा मुंडे, मंगलप्रभात लोढा, भारतरत्न सचिन तेंडुलकर, अंजली तेंडुलकर, जॅकी श्रॉफ, सुनील शेट्टी, करण जोहर, अक्षय कुमार, बीएमसी आयुक्त अश्विनी भिडे, मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती, उद्योगपती अनंत अंबानी यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
प्रगती आणि समृद्धी साध्य करण्यासाठी समाजातील प्रत्येक व्यक्तीचा सहभाग महत्वाचा आहे. शांतता व सुव्यवस्था राखणे ही शासनाची जबाबदारी असली, तरी समाजातील प्रत्येक घटकाची साथ आणि सहभाग लाभल्यास शांततेचे रूपांतर लोकचळवळीत होऊ शकते, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.
दिव्यज फाउंडेशनने शिक्षण, आरोग्य, महिला सक्षमीकरण, स्वच्छता आणि समाजकल्याण या क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य केले आहे. गरजूंच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडविण्यासाठी फाउंडेशनकडून करण्यात येत असलेले प्रयत्न कौतुकास्पद आहेत. निःस्वार्थ भावनेने समाजासाठी योगदान देणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करणारा हा उपक्रम शांतता आणि मानवतेचा संदेश देणारा आहे. अशा पुरस्कारांमुळे समाजातील सेवाकार्यासाठी प्रेरणा मिळते. पुरस्कारप्राप्त सर्व मान्यवरांचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी अभिनंदन केले.
कायद्याचा धाक किंवा युद्धाच्या माध्यमातून शांतता प्रस्थापित होऊ शकत नाही; शांततेसाठी सकारात्मक संवाद आणि परस्पर विश्वास आवश्यक आहे. ‘ग्लोबल पीस ऑनर्स’च्या माध्यमातून हाच विचार पुढे नेला जात आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाची सुरक्षा व्यवस्था अधिक सक्षम झाली असून, दहशतवाद आणि नक्षलवादाविरोधातील लढ्याला निर्णायक दिशा मिळाली आहे. सीमेवर लढणारे शूर जवान आणि अहोरात्र कार्यरत असलेल्या पोलीस व सुरक्षा यंत्रणांमुळे देशाच्या सुरक्षेशी कोणीही खेळू शकणार नाही, असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला.
शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी शासनाच्या प्रयत्नांसोबतच समाजातील प्रत्येक घटकाचा सक्रिय सहभाग आवश्यक आहे. ‘ग्लोबल पीस ऑनर्स’सारखे उपक्रम समाजात एकोपा, बंधुभाव आणि सामंजस्याची भावना रुजविण्यासोबतच शांतता व सुरक्षिततेचा संदेश देतात. शहर शांत आणि सुरक्षित असेल, तर समाज आणि प्रत्येक कुटुंबात सुख-समाधान नांदेल, असे सांगून उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी पुरस्कारप्राप्त मान्यवरांचे अभिनंदन केले.
अमृता फडणवीस म्हणाल्या की, जग पूर्वीपेक्षा आता अधिक जोडले आहे पण एकमेकांची मनापासून काळजी घेणे शांतता जपणे महत्वाचे आहे. शांतता म्हणजे मानवतेची उपस्थिती आहे. २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याची आठवण करून देताना पोलीस, कमांडो, अग्निशमन दलाचे जवान, डॉक्टर, परिचारिका आणि सामान्य नागरिकांनी इतरांचे प्राण वाचवण्यासाठी दाखविलेल्या धैर्याला त्यांनी अभिवादन केले.
या कार्यक्रमात शांती, मानवता, सामाजिक कार्य आणि देशसेवेसाठी उल्लेखनीय योगदान देणाऱ्या मान्यवरांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात अभिनेता टायगर श्रॉफ यांनी सादर केलेल्या श्रीगणेश वंदनेने झाली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आध्यात्मिक गुरू सद्गुरू जग्गी वासुदेव यांची मुलाखतकाराच्या भूमिकेतून मुलाखत घेतली. यावेळी जीवन जगण्याचा मार्ग दाखविणारे सद्गुरू यांचे विचार ईशा फाउंडेशनच्या माध्यमातून ४० भाषांमध्ये पोहोचविण्यात येत असल्याचा उल्लेख करण्यात आला. अभिनेता रणवीर सिंग यांनी भारतरत्न सचिन तेंडुलकर यांची मुलाखत घेतली. यावेळी अभिनेता शाहरुख खान यांनी उपस्थितांना संबोधित केले. कार्यक्रमात अमिताभ बच्चन यांचा व्हिडिओ संदेशही दाखविण्यात आला.
अमृता फडणवीस यांनी ‘ये मेरे वतन के लोगो’ आणि ‘ऐ वतन, मेरे आबाद रहे तू’ ही देशभक्तिपर गीते सादर केली. अभिनेता अक्षय कुमार यांनी ‘तेरी मिट्टी में मिल जावा’ आणि ‘सुनो गौर से दुनिया वालो’ या गीतांवर नृत्य सादर केले, तर गायक सुखविंदर सिंग यांनी ‘मेरे देश की धरती सोना उगले’, ‘चक दे इंडिया’ आणि कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी ‘जय हो’ हे गीत सादर करून उपस्थितांची दाद मिळवली.
@Dev_Fadnavis @mieknathshinde @SunetraA_Pawar @rahulnarwekar @Pankajamunde @MPLodha
#GlobalPeaceHonours2026
39
महात्मा जोतीराव फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षानिमित्त वर्षभर विविध कार्यक्रम #MahatmaPhule200 #महात्माफुले200 #MahatmaJyotiraoPhule_BicentenaryBirthYear #महात्माजोतीरावफुले_द्विशताब्दीजन्मवर्ष
49

















