जिल्हा माहिती कार्यालय,रायगड-अलिबाग (@InfoRaigad) header
जिल्हा माहिती कार्यालय,रायगड-अलिबाग (@InfoRaigad) profile picture

Official Twitter Account of District Information Office, #RAIGAD, Directorate General of Information & Public Relations, Gov. of Maharashtra

Joined July 2016
Photo by जिल्हा माहिती कार्यालय,रायगड-अलिबाग (@InfoRaigad)Photo by जिल्हा माहिती कार्यालय,रायगड-अलिबाग (@InfoRaigad)Photo by जिल्हा माहिती कार्यालय,रायगड-अलिबाग (@InfoRaigad)Photo by जिल्हा माहिती कार्यालय,रायगड-अलिबाग (@InfoRaigad)Photo by जिल्हा माहिती कार्यालय,रायगड-अलिबाग (@InfoRaigad)Photo by जिल्हा माहिती कार्यालय,रायगड-अलिबाग (@InfoRaigad)Photo by जिल्हा माहिती कार्यालय,रायगड-अलिबाग (@InfoRaigad)Photo by जिल्हा माहिती कार्यालय,रायगड-अलिबाग (@InfoRaigad)Photo by जिल्हा माहिती कार्यालय,रायगड-अलिबाग (@InfoRaigad)Photo by जिल्हा माहिती कार्यालय,रायगड-अलिबाग (@InfoRaigad)
संकटात शासनाची मदत ठरली शेतकऱ्यांसाठी आधार! भातशेतीच्या नुकसानीमुळे आर्थिक अडचण निर्माण झाली होती. अशा परिस्थितीत शासनाकडून मिळालेले ₹५,००० चे अनुदान थेट बँक खात्यात जमा झाले. — गजानन हरिश्चंद्र पाटील, शेतकरी, बोर्ली पंचतन, ता. श्रीवर्धन #शेतकरी #दुष्काळ
1
192
शासनाच्या मदतीने शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा! भातशेतीच्या नुकसानीपोटी शासनाकडून मिळालेले ₹५,००० चे अनुदान माझ्या बँक खात्यात जमा झाले आहे. संकटाच्या काळात शासनाकडून मिळालेली ही मदत मोलाची असून शेतीला पुन्हा उभारी देण्यासाठी आधार ठरणार आहे — पांडुरंग पाटील, बोर्ली पंचतन #दुष्काळ
1
187
राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मुक्या जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर होऊ नये, यासाठी पशुधनासाठी हिरवा व सुका चारा मुबलक प्रमाणात उपलब्ध व्हावा,म्हणून गायरान तसेच शेतकऱ्यांच्या वैयक्तिक जमिनीवर अतिरिक्त चारा पिकांच्या लागवडीला राज्य शासनाने अधिकृत मान्यता
1
169
महाराष्ट्र रोजगार हमी योजनेच्या (रोहयो) माध्यमातून ही कामे सामुदायिक उपयोगासाठी तसेच वैयक्तिक लाभार्थ्यांसाठी थेट हाती घेता येणार आहेत. या निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी सुरू झाली असून शासनाने अधिकृत शासन निर्णय जारी केला आहे.
17
संकटाच्या काळात बळीरायाच्या पाठीशी शासन खंबीर! श्रीवर्धन तालुक्यातील गासरे काठी येथील शेतकरी वैभव पोलेकर यांना भातशेतीसाठी शासनाकडून ₹५,००० ची अग्रिम मदत मिळाली. या मदतीबद्दल त्यांनी शासनाचे आभार मानले. शेतकऱ्यांना आर्थिक आधार देत संकटाच्या काळात शासनाचा मदतीचा हात! #दुष्काळ
1
150
दुष्काळी परिस्थितीत शासनाकडून ५ हजार रुपये प्राप्त झाल्याबद्दल शासनाचे धन्यवाद - वैभव कोळेकर | घालसुरे काठी | श्रीवर्धन #दुष्काळ #शेतकरी
1
195
माणगाव एसटी आगाराच्या ताफ्यात नव्याने दाखल झालेल्या 'राजमाता जिजाऊ' बसेसचे लोकार्पण पालकमंत्री भरतशेठ गोगावले आणि महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी एसटी महामंडळाचे अधिकारी, चालक-वाहक आणि माणगाव परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
246
घालसरे काठी, श्रीवर्धन शासनाच्या मदतीने शेतकऱ्याला दिलासा! भातशेतीच्या नुकसानीपोटी शासनाकडून मिळालेले ५ हजार रुपयांचे अनुदान माझ्या खात्यात जमा झाले आहे. संकटाच्या काळात शासनाने दिलेली ही मदत मोलाची आहे. रामकृष्ण आत्माराम मांद्रेकर, शेतकरी
1
228
जिल्हा माहिती कार्यालय,रायगड-अलिबाग retweeted
महाड आणि पोलादपूर तालुक्यांतील वनराई बंधाऱ्यांची प्रत्यक्ष पाहणी! शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही! #VanraiBandhara #WaterConservation #Diwali2026 #Shivsena #BharatshethGogawale
1
3
71
जिल्हा माहिती कार्यालय,रायगड-अलिबाग retweeted
माणगाव एस. टी. आगार येथे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (MSRTC) "राजमाता जिजाऊ" या नवीन बसेसचे लोकार्पण रायगडचे चे पालकमंत्री मा. श्री. भरत गोगावले साहेब व माझ्या हस्ते पार पडले. आपल्या भागातील ग्रामीण व शहरी प्रवाशांचा प्रवास अधिक सुरक्षित, सुखकर आणि आरामदायी व्हावा, यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. 'राजमाता जिजाऊ' या नवीन बसेसच्या माध्यमातून आपल्या लालपरीचा ताफा आणखी मजबूत झाला असून, यामुळे प्रवासी सेवेत अधिक सुलभता येईल असा मला विश्वास आहे. याप्रसंगी विभागीय नियंत्रक, स्थानिक लोकप्रतिनिधी, एसटी महामंडळाचे सर्व अधिकारी-कर्मचारी, चालक-वाहक बंधू आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. @ibharatgogawale #mangaon #raigad #adititatkare #msrtc
5
9
2,138
जिल्हा माहिती कार्यालय,रायगड-अलिबाग retweeted
श्रीवर्धन एस. टी. आगार येथे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (MSRTC) "राजमाता जिजाऊ" या नवीन बसेसचे लोकार्पण माझ्या हस्ते पार पडले. आपल्या भागातील ग्रामीण व शहरी प्रवाशांचा प्रवास अधिक सुरक्षित, सुखकर आणि आरामदायी व्हावा, यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. 'राजमाता जिजाऊ' या नवीन बसेसच्या माध्यमातून आपल्या लालपरीचा ताफा आणखी मजबूत झाला असून, यामुळे प्रवासी सेवेत अधिक सुलभता येईल असा मला विश्वास आहे. याप्रसंगी विभागीय नियंत्रक, स्थानिक लोकप्रतिनिधी, एसटी महामंडळाचे सर्व अधिकारी-कर्मचारी, चालक-वाहक बंधू आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ​#MSRTC #Shrivardhan #PublicTransport #AditiTatkare #maharashtra
3
11
1,892
दुष्काळाच्या सावटातही शेतकरी-कष्टकऱ्यांची दिवाळी आनंदात साजरी व्हावी,यासाठी शासनाकडून दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांच्या खात्यात ५ हजार रुपयांची अग्रीम मदत जमा करण्यात आली आहे.प्रत्येकाच्या घरात आनंदाचा दीप उजळावा, सर्वांनी आनंदाची दिवाळी साजरी करावी - पालकमंत्री भरत गोगावले #दुष्काळ
1
2
293
पालकमंत्री भरतशेठ गोगावले यांनी पोलादपूर येथील तुर्भे बुद्रुक,वझरवाडी,कलमवाडी व भोगाव बुद्रुक येथील वनराई बंधाऱ्यांची पाहणी केली आतापर्यंत ७६ वनराई बंधारे पूर्ण! श्रमदान आणि लोकसहभागातून पाणी अडविण्याचा, भूजल पातळी वाढविण्याचा व गावांना जलसमृद्ध करण्याचा संकल्प! #वनराईबंधारा
1
187
श्रमदानातून जलसंधारणाची लोकचळवळ! पालकमंत्री ना. भरतशेठ गोगावले यांनी मोहोप्रे, दहीवड व वडवली येथील वनराई बंधाऱ्यांची पाहणी करून जलसंधारणाच्या कामांचा आढावा घेतला. जिल्ह्यात संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी वनराई बंधारा अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. #वनराईबंधारा
1
2
2
301
महाड व पोलादपूर तालुक्यांत आतापर्यंत ३० ते ४० बंधारे उभारण्यात आले आहेत. आगामी उन्हाळ्यात पाणीटंचाईवर मात करण्यासाठी लोकसहभागातून जलसंधारणाची कामे अधिक व्यापक करण्याचे नियोजन आहे.
22
जिल्ह्यातील ५० आदिवासी मच्छीमारांसाठी ३ ते ५ नोव्हेंबरदरम्यान तीन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम जलाशय मत्स्यव्यवस्थापन,आधुनिक मत्स्यसंवर्धन तंत्रज्ञान, पाण्याची गुणवत्ता तपासणी तसेच मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजना व MahaDBT Portal 2.0 बाबत प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन व प्रात्यक्षिके
1
188
महाड I पालकमंत्री मा. ना. भरतशेठ गोगावले यांच्या हस्ते नव्याने दाखल झालेल्या राजमाता जिजाऊ बसचे लोकार्पण करण्यात आले. #राजमाता_जिजाऊ_बस #महाड #एसटी_महामंडळ #रायगड
2
241
जिल्हा माहिती कार्यालय,रायगड-अलिबाग retweeted
ग्रिन केन बांबू वर्ल्ड असोसिएशन सामुहिक सुविधा केंद्र भूमिपूजन समारंभ ! 📍 शिरगांव ता. मुरुड जि. रायगड | 🗓️ ५ नोव्हेंबर २०२६ #BambooDevelopment #GreenCaneBamboo #Raigad #Shivsena #BharatshethGogawale
3
6
92
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६ अंतर्गत आधार प्रमाणीकरण पूर्ण झालेल्या १,५९६ पात्र शेतकऱ्यांच्या कर्जखात्यात १२ कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत. शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देत शेतीसाठी नव्याने उभारी घेण्यास शासनाचा हातभार! #Raigad #शेतकरी #कर्जमुक्ती
1
1
251
रायगडमध्ये बांबू उद्योगाचे आदर्श मॉडेल उभारणार! व्हीबीजी रामजी योजनेतून अडीच एकर क्षेत्रावर बांबू लागवडीसाठी ₹७ लाखांचे अनुदान! -पालकमंत्री भरतशेठ गोगावले 📍 शिरगाव, ता. मुरुड येथे ग्रीन केन बांबू क्लस्टरच्या सामाईक सुविधा केंद्राचे भूमिपूजन यांच्या हस्ते संपन्न.
1
237