DISTRICT INFORMATION OFFICE, SOLAPUR (@Info_Solapur) header
DISTRICT INFORMATION OFFICE, SOLAPUR (@Info_Solapur) profile picture

Official Twitter account of DIO, Solapur. Directorate General of Information & Public Relations, Govt. of Maharashtra. #DGIPRNEWS #मी_जबाबदार

SOLAPUR, MAHARASHTRA
Joined July 2016
Photo by DISTRICT INFORMATION OFFICE, SOLAPUR (@Info_Solapur)Photo by DISTRICT INFORMATION OFFICE, SOLAPUR (@Info_Solapur)Photo by DISTRICT INFORMATION OFFICE, SOLAPUR (@Info_Solapur)Photo by DISTRICT INFORMATION OFFICE, SOLAPUR (@Info_Solapur)Photo by DISTRICT INFORMATION OFFICE, SOLAPUR (@Info_Solapur)Photo by DISTRICT INFORMATION OFFICE, SOLAPUR (@Info_Solapur)Photo by DISTRICT INFORMATION OFFICE, SOLAPUR (@Info_Solapur)Photo by DISTRICT INFORMATION OFFICE, SOLAPUR (@Info_Solapur)Photo by DISTRICT INFORMATION OFFICE, SOLAPUR (@Info_Solapur)Photo by DISTRICT INFORMATION OFFICE, SOLAPUR (@Info_Solapur)
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या सुख-दुःखात सहभागी होत संकटावर मात करण्यासाठी शासन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोहारी सावंगा (ता. नरखेड, जि. नागपूर) येथे शेतकऱ्यांसोबत दिवाळी साजरी केली. @Dev_Fadnavis @cbawankule #DiwaliWithFarmers #दिवाळी
191
DISTRICT INFORMATION OFFICE, SOLAPUR retweeted
📍नागपूर राज्यात दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना धीर देण्यासोबतच त्यांचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी त्यांच्यासोबत दिवाळी सण साजरा करण्याची भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केली होती. त्यानुसार त्यांनी आज लोहारी सावंगा (ता.नरखेड, जि. नागपूर) येथे शेतकऱ्यांसोबत दिवाळी साजरी केली. शेतकऱ्यांनी संवाद साधतांना दुष्काळाच्या संकटातून बाहेर पडू, असा विश्वास व्यक्त केला. गावातच रामभाऊ बालपांडे या शेतकऱ्यांच्या घरी भरीत भाकरीचे जेवण करुन मुक्काम केला. त्यांच्या आगमनानंतर महिलांनी पारंपरिक पद्धतीने त्यांचे स्वागत केले. त्यानंतर सामुदायिक प्रार्थनेत त्यांनी सहभाग घेतला. रामभाऊ बालपांडे या शेतकऱ्याच्या घरी जेवण करुन दिवाळी सणानिमित्त गावकऱ्यांशी संवाद साधला. त्यांच्या अडचणी, समस्या, दुःख जाणून घेतले. यावेळी शेतकऱ्यांनी मोकळेपणाने मुख्यमंत्र्यांशी संवाद साधत आपल्या समस्या मांडल्या. शेतकरी पुरुषोत्तम वघाळे यांनी खोरी प्रकल्पाचा प्रश्न मार्गी लावल्याचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर यासाठी मान्यता देण्यात आली असून लवकरच काम सुरू होणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. जगदीश देशमुख या शेतकऱ्याने ४३ वर्षांपूर्वी पायाभरणी झालेल्या पाझर तलावाची अडचण सोडवून तलाव पूर्ण करण्याची मागणी केल्यानंतर याबाबत आवश्यक कारवाई लवकरच करू, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. पाणी फाऊंडेशनचा युवा कार्यकर्ता जयंत चाफले यांनी जुन्या खोरी तलावाचे काम मार्गी लावल्याबद्दल आभार व्यक्त केले. राजेंद्र चाफले व तेजपाल चौधरी यांनी रोही, वाघ, रानडुकरांचा शेती पिकांना मोठा फटका बसत असल्याने त्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली. दरम्यान दुष्काळी परिस्थितीमुळे मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष तालुका स्तरावर देखील कक्ष सुरू करण्यात येत मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. नागपूर जिल्ह्याच्या एका टोकावरील असलेल्या आमच्या गावास भेट दिल्याने दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्याचे बळ आणि आत्मविश्वास दिला, अशी भावना व्यक्त करत गावकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. यावेळी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार राजू पोतदार, आमदार चरणसिंह ठाकूर, आमदार आशिष देशमुख, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी, माजी आमदार सुधाकर कोहळे, सरपंच विपीन चाफले आदी उपस्थित होते. @Dev_Fadnavis @cbawankule #लोहारीसावंगा #दुष्काळ #शेतकरी #FarmerWelfare #DiwaliWithFarmers #Diwali
7
6
1,746
DISTRICT INFORMATION OFFICE, SOLAPUR retweeted
📍नागपूर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लोहारी सावंगा येथे शेतकरी रामभाऊ बालपांडे यांच्या निवासस्थानी मुक्काम करणार आहेत. त्यांचे हे सुंदर कौलारु घर... @Dev_Fadnavis #लोहारीसावंगा #दुष्काळ #शेतकरी #FarmerWelfare #DiwaliWithFarmers #Diwali
2
16
1
60
9,856
दुष्काळग्रस्त शेतकरी पोपट सावंत यांच्या घरी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी दिवाळी साजरी करत कुटुंबीयांशी संवाद साधला. शासन शेतकऱ्यांच्या सुख-दुःखात ठामपणे सहभागी असल्याचा विश्वास व्यक्त केला. #दिवाळी #शेतकरी #सोलापूर #शासनआपल्या_दारी #DiwaliWithFarmers
1
3
306
सोलापूर जिल्ह्यात ‘जन आरोग्य संवाद यात्रा’ उत्साहात संपन्न! आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी जिल्ह्यातील डॉक्टर, कर्मचारी, रुग्ण व नागरिकांशी संवाद साधून आरोग्य यंत्रणेतील अडचणी जाणून घेतल्या. आरोग्य सेवा अधिक सक्षम, गुणवत्तापूर्ण व लोकाभिमुख करण्यावर भर! #सोलापूर
4
6
337
सोलापूरमध्ये ‘आरोग्य संवाद यात्रा’! सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी साधला थेट जनतेशी संवाद. जिल्ह्यातील विविध शासकीय रुग्णालये व आरोग्य संस्थांना भेटी देत आरोग्य सुविधांचा प्रत्यक्ष आढावा घेतला. #AarogyaSamvadYatra #Solapur #PublicHealth
2
2
297
शासकीय रुग्णालयांत रुग्णांना दर्जेदार आरोग्य सुविधा द्या! बोगस डॉक्टरांवर आठ दिवसांत कारवाई करा; सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांचे निर्देश. जिल्हा सामान्य व महिला रुग्णालयाला भेट देऊन कॅथलॅब, अतिदक्षता विभागासह विविध आरोग्य सुविधांची पाहणी केली. #Solapur #आरोग्यसेवा
1
4
5
409
सोलापूर जिल्ह्यातील ५ लाख १७ हजार शेतकऱ्यांच्या खात्यात २५८ कोटी ६४ हजार रुपयांची मदत जमा! दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी प्रत्येकी ₹५ हजारांची अग्रीम आर्थिक मदत. आतापर्यंत ५.१७ लाख शेतकऱ्यांना लाभ; उर्वरित पात्र शेतकऱ्यांनाही लवकरच मदत जमा होणार. #Solapur #शेतकरी
1
3
12
712
पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य; पाण्याचा काटकसरीने वापर करा! – पालकमंत्री जयकुमार गोरे उजनी धरणातील ६५ टक्के पाणीसाठ्याच्या पार्श्वभूमीवर पाणी बचतीचे आवाहन. पाण्याचा प्रत्येक थेंब जपणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा. #Solapur
1
3
9
596
उजनी धरणातील प्रस्तावित फ्लोटिंग सोलार, बॅटरी स्टोरेज व एआय डेटा सेंटर प्रकल्प विषयी माहिती देताना जिल्हाधिकारी -एस. कार्तिकेयन #UjaniDam #SolapurDevelopment #फ्लोअटींगसोलर
2
6
8
1,041
अवैध सावकारी व सक्तीच्या कर्जवसुलीविरोधात नागरिकांनी तक्रार करावी! – जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन #सोलापूर जिल्ह्यातील ११ तालुक्यांमध्ये अवैध सावकारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी दक्षता पथके कार्यरत. पंढरपूर तालुक्यातील सोनके येथे चार जणांच्या घरांची झडती घेऊन सहकार विभागाची कारवाई.
4
5
517
संशोधनाला चालना देत महाराष्ट्राची आरोग्यसेवा अधिक सक्षम करण्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा भर! शास्त्रीय पुराव्यांवर आधारित आरोग्यविषयक धोरणनिर्मिती व शासकीय आरोग्य योजनांच्या परिणामकारकतेतून नागरिकांना अधिक गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा मिळणार! #सोलापूर
2
6
389
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सोलापूर मध्यवर्ती बसस्थानकाची पाहणी करून प्रवासी सुविधांमध्ये सुधारणा करण्याचे निर्देश एसटी प्रशासनाला दिले. प्रवाशांशी थेट संवाद साधत त्यांच्या तक्रारी व सूचनांची दखल घेतली. #सोलापूर
1
7
539
सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेतून जिल्ह्यात जलसंधारणाची कामे प्रभावीपणे राबविणार! – मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन स्पर्धेत जलसंधारणाला ७०, तर गटशेतीला ३० गुणांचे महत्त्व. गावांची व प्रशिक्षणार्थींची निवड करून लोकसहभाग व श्रमदानातून जलसंधारणाची चळवळ उभी करण्याचे आवाहन. #सोलापूर
1
1
2
401
लोकसहभागातून जलसंवर्धनाचा आदर्श! माढा तालुक्यातील सापटणे येथे भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेच्या अधिकारी आणि ग्रामस्थांनी श्रमदानातून वनराई बंधाऱ्याची उभारणी केली. पावसाचे पाणी अडवून भूजल पुनर्भरणाला चालना देण्यासाठी ग्रामस्थांचा पुढाकार. #जलसंवर्धन #लोकसहभाग #सोलापूर
1
12
453
उजनी धरणातील प्रस्तावित प्रकल्पामुळे सोलापूरच्या विकासाला नवी दिशा! जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन उजनी जलाशयाच्या केवळ ९% क्षेत्रावर फ्लोटिंग सोलार; ९१% जलक्षेत्र खुले राहणार. २,००० मेगावॅट वीजनिर्मिती, २,८०० कायमस्वरूपी व ४० हजार प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष रोजगारांची संधी. #सोलापूर
23
10
7
115
11,173
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात २ नोव्हेंबरपासून प्रत्येकी ५ हजार रुपये अग्रीम मदत जमा होण्यासाठी यंत्रणांनी युद्धपातळीवर काम करावे. याद्या अपलोड करण्यासाठी ३१ ऑक्टोबर व १ नोव्हेंबर रोजीही प्रांताधिकारी व तहसील कार्यालये सुरू ठेवण्याचे निर्देश. जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन
1
3
13
855
महाराष्ट्राच्या सर्वसमावेशक व शाश्वत विकासासाठी टाटा कॅपिटलचे सामाजिक उत्तरदायित्व उपक्रम महत्त्वपूर्ण! शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, जलसंधारण व पर्यावरण संवर्धनाच्या माध्यमातून राज्यातील ५.५ लाखांहून अधिक नागरिकांना लाभ. – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
1
4
459
#महात्माफुले द्विजन्मशताब्दी वर्षानिमित्त शाळांमध्ये वर्षभर विविध उपक्रम! २२ एप्रिल २०२६ ते १० एप्रिल २०२७ या कालावधीत राज्यातील शाळांमध्ये सामाजिक समता, स्त्री शिक्षण, संविधानिक मूल्ये व सामाजिक न्यायावर आधारित शैक्षणिक, सांस्कृतिक आणि जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन #सोलापूर
2
5
522
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी ₹५,००० अग्रिम मदत! राज्यातील ३०४ दुष्काळी तालुक्यांतील पात्र शेतकऱ्यांसाठी ₹७,५०० कोटींच्या निधीला शासनाची मंजुरी. ३३% पेक्षा जास्त पीक नुकसान झालेल्या पात्र शेतकऱ्यांना मदत थेट बँक खात्यात जमा होणार. #दुष्काळमदत #शेतकरी
1
14
1,116