District Information Office, Latur (@Infolatur) header
District Information Office, Latur (@Infolatur) profile picture

Official Twitter Handle of District Information Office, Directorate General Of Information & Public Relations, Government of Maharashtra, #Latur

Latur
Joined July 2015
Photo by District Information Office, Latur (@Infolatur)Photo by District Information Office, Latur (@Infolatur)Photo by District Information Office, Latur (@Infolatur)Photo by District Information Office, Latur (@Infolatur)Photo by District Information Office, Latur (@Infolatur)Photo by District Information Office, Latur (@Infolatur)Photo by District Information Office, Latur (@Infolatur)Photo by District Information Office, Latur (@Infolatur)Photo by District Information Office, Latur (@Infolatur)Photo by District Information Office, Latur (@Infolatur)
District Information Office, Latur retweeted
उद्योग मंत्री डॉ. उदय सामंत यांनी नांदेड तालुक्यातील सायाळ येथील शेतकरी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि ग्रामस्थांसोबत दिवाळी साजरी केली. राज्यातील शेतकऱ्यांनी सध्याच्या दुष्काळी परिस्थितीत खचून जाऊ नये, कोणतेही टोकाचे पाऊल उचलू नये. शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. पुढील दहा महिन्यांतील संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन पिण्याचे पाणी, टँकर, आनंदाचा शिधा यांसह आवश्यक उपाययोजनांचे नियोजन करण्यात येत आहे, अशी ग्वाही मंत्री डॉ. सामंत यांनी दिली. @samant_uday #दुष्काळ #शेतकरी #FarmerWelfare #DiwaliWithFarmers #Diwali
6
1
2
1,899
District Information Office, Latur retweeted
📍नागपूर दुष्काळामुळे हवालदिल शेतकऱ्यांना बळ, आत्मविश्वास देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांसोबत दिवाळी साजरी केली. शेतकरी कुटुंबात मुक्काम केला. सकाळी उठल्यानंतर तर्री पोह्याचा नास्ता घेतला. तुमच्यासोबत दिवस आनंदात गेला. छान झोप लागली, अशी कृतज्ञता मुख्यमंत्र्यांनी शेतकरी रामभाऊ बालपांडे यांचे घर सोडतांना व्यक्त केली. पुढल्या वर्षी वहिनींना सोबत घेऊन या, अशी विनंती भावाच्या आपुलकीने औक्षण केल्यानंतर अरूणाताईंनी मुख्यमंत्र्यांना केली. नरखेड तालुक्यातील लोहारी सावंगा येथे काल मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांसोबत दिवाळी साजरी केली. गावातच रामभाऊ बालपांडे या शेतकऱ्यांच्या घरी काल त्यांनी सायंकाळचे भोजन घेतले. शेतकऱ्यांशी संवाद साधल्यानंतर कुटुंबियांशी गप्पा करत मुक्काम केला. सकाळी उठल्यानंतर नास्त्यात घरच्या महिलांनी बनविलेला तर्री पोहा घेतला. पोहा मला आवडतो. आठवड्यातून किमान चार दिवस नास्त्यात पोहा असतो, असे कुटुंबियांशी गप्पा करतांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. लोहारी सावंगा गाव सोडतांना मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. शेतकरी कुटुंबात मुक्काम केल्यानंतर आपल्या भावना काय आहेत? असा प्रश्न विचारल्यानंतर बालपांडे कुटुंबाशी जवळीक झाली. त्यांनी छान आदरातिथ्य केले. शेतकरी रामभाऊ बालपांडे यांना देखील दुष्काळाचा फटका बसला. त्यांनी हार मानली नाही. कुटुंबातील तीन खातेदारांना कर्जमाफीचा लाभ मिळाला, याचे समाधान वाटले. बालपांडे कुटुंब वारीला जातात. विठ्ठलाची अर्चना करणारा परिवार कधीही हतबल होत नाही. विपरीत परिस्थितीचा सामना करण्याचे बळ त्यांच्यात असते, असे मुख्यमंत्री म्हणाले. सकाळी नास्ता घेत असतांना ७५ वर्षांच्या कमलाबाई मानेराव मुख्यमंत्र्यांना भेटल्या. वयमानाने कामधंदा होत नाही. त्यामुळे बकरी पालनाचा प्रस्ताव व अपंग मुलाला आर्थिक मदतीचे प्रकरण करून देण्याची विनंती त्यांनी केली. त्यावर तातडीने कारवाई करण्यासोबतच कमलाबाईचे निराधार अनुदानाचे प्रकरण करता येईल का? याची पडताळणी करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. @Dev_Fadnavis #लोहारीसावंगा #दुष्काळ #शेतकरी #FarmerWelfare #DiwaliWithFarmers #Diwali
11
5
2,032
District Information Office, Latur retweeted
📍नागपूर पावसाअभावी शेतातील कापूस व तुरीची झाडे सुकत असून अशा परिस्थितीत कापसाची शेती करणारा शेतकरी हवालदिल झाला आहे. अशा शेतकऱ्यांना तातडीने आवश्यक मदत देण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कळमेश्वर तालुक्यातील कोहळी या गावातील बाबुराव काळे या शेतकऱ्याला दिली. दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या व्यथा समजून घेण्यासाठी व त्यांच्यासोबत दिवाळी साजरी करण्यासाठी लोहारी सावंगा या गावाला मुक्काम केला होता. आज मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन शेतीची पाहणी केली तसेच दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी शासन सोबत असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. लोहारी सावंगा येथून सकाळी सोनेगाव येथे येथील दिलीप सरोदे या शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन दुष्काळामुळे कापूस पिकांच्या सद्यस्थितीची माहिती घेतली. पावसाअभावी कापसाची वाढ झाली नाही तसेच कापसाची बोंड सुद्धा फुटली नाहीत त्यामुळे शेतकऱ्यांसमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत. अशा परिस्थितीत खचून न जाता शेतकऱ्यांना मदत करण्यात येत असल्याचे यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितले. वन्य प्राण्यांपासून पिकांच्या संरक्षणासाठी सौर कुंपणाची योजना प्रभावीपणे राबविण्यात येईल, अशी ग्वाही यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी कळमेश्वर तालुक्यातील बाबुराव काळे यांच्या शेताला भेट दिली तसेच कापूस व तुरीच्या पिकांची पाहणी केली. दीर्घ काळापासून पाऊस न पडल्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. पिकांच्या नुकसानी संदर्भात शेतकऱ्यांना तातडीने पाच हजार रुपयाची मदत दिली आहे उर्वरित मदतही शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येईल. कुणीही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. दुष्काळी परिस्थितीमध्ये आवश्यकतेनुसार धान्य उपलब्ध होत आहे परंतु ज्या शेतकऱ्यांकडे शिधापत्रिका नाही अशा शेतकऱ्यांना प्राधान्याने नोंदणी करून त्यांनाही लाभ देण्यात यावा, अशी सूचना यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली. @Dev_Fadnavis #दुष्काळ #शेतकरी #FarmerWelfare #DiwaliWithFarmers #Diwali
9
1
1,962
District Information Office, Latur retweeted
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भर उन्हात शेतात जाऊन पीक परिस्थितीची पाहणी केली. आपण केवळ मंत्रालयात बसणारे मुख्यमंत्री नाही, तर अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांच्या आपण सोबत आहोत, असा विश्वास त्यांनी शेतात जाऊन दिला. दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी संकटात असल्याने त्यांना धीर देण्यासाठी दिवाळी शेतकऱ्याच्या घरी जाऊन साजरी करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला होता. त्यानुसार ७ नोव्हेंबर रोजी सायंकाळीच ते नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यातील लोहारी सावंगा येथे पोहचले. रात्री शेतकरी कुटुंबीयांसह भोजन करून रात्री ते भजनात सहभागी झाले. आज त्यांनी प्रत्यक्ष शेतात जाऊन, सरकार आपल्या पाठीशी आहे, असा दिलासा शेतकऱ्यांना दिला. दिलीप सरोदे या शेतकऱ्याच्या शेतात सोनेगाव रिठी येथे भेट दिली. #लोहारीसावंगा #दुष्काळ #शेतकरी #FarmerWelfare #DiwaliWithFarmers #Diwali
8
1
5
2,077
District Information Office, Latur retweeted
📍नागपूर आजवर एकाही मुख्यमंत्र्यांना आम्ही प्रत्यक्ष पाहिले नव्हते मात्र आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमच्या गावात मुक्काम करून आम्हाला आश्चर्याचा सुखद धक्का दिला, अशी भावना लोहारी सावंगा येथील महिलांनी व्यक्त केली. मुख्यमंत्री आपल्या छोट्याशा गावात आले आणि रात्रभर येथेच थांबले याचा झालेला आनंद या महिलांच्या चेहऱ्यावर दिसत होता. आजचा दिवस खूप आनंदाचा आहे. आज खऱ्या अर्थाने आम्ही दिवाळी साजरी केली. मुख्यमंत्री आज आमच्या कुटुंबाचा भाग झाले. त्यामुळे हा क्षण आमच्यासाठी आनंदाचा आणि अभिमानाचा आहे. राज्यातील लाडक्या बहिणींच्या पाठीशी ते नेहमीच उभे राहिले आहेत. त्यांनी दिवाळीत आमच्या गावात मुक्काम करणे ही आमच्यासाठी सर्वात मोठी भाऊबीज भेट असल्याचेही या महिलांनी सांगितले. #लोहारीसावंगा #दुष्काळ #शेतकरी #FarmerWelfare #DiwaliWithFarmers #Diwali
9
1
18
2,582
District Information Office, Latur retweeted
सध्याची दुष्काळी स्थिती पाहता विशेष बाब म्हणून जिथे गरज आहे तिथे झाडे जगविण्यासाठी केवळ शेतीकामाकरीता विंधन विहिरींवरील बंदी येत्या १५ डिसेंबरपर्यंत उठविण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यातील लोहारी सावंगा येथे मुख्यमंत्र्यांनी विविध ग्रामपंचायत सरपंचांशी संवाद साधला. या परिसरात मोठ्या प्रमाणात पशुधन आहे, मात्र पशू दवाखाने नाही, अशी व्यथा अनेक प्रतिनिधींनी मांडली. त्यावर गुरांच्या दवाखान्यांबाबत पाहणी करून लगेच निर्णय घेण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले. पुरेसे पैसे न मिळाल्याने जलजीवन मिशनची काही कामे अपूर्ण आहेत, मात्र आता ती प्राधान्याने पूर्ण केली जात आहेत. जेथील कामे ७५ टक्यांच्यावर पूर्ण झाली आहेत, तेथे तातडीने निधी उपलब्ध करून ती कामे पूर्ण केली जातील. अन्य ठिकाणची कामेही टप्प्यात पूर्ण केली जातील, असे याप्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले. शेतातील पिकांचे वन्य प्राण्यांकडून होत असलेले नुकसान गंभीर आहे. त्यासाठी तार कुंपण योजना अधिक व्यापक करण्यात येईल. जंगलाला लागून असलेल्या शेतांना यात विशेष प्राधान्य देण्यात येईल. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जलसाठ्यामधील गाळ काढून ती माती शेतीत टाकण्याची कामे हाती घेण्यात आली असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी नमूद केले. #लोहारीसावंगा #दुष्काळ #शेतकरी #FarmerWelfare #DiwaliWithFarmers #Diwali
9
2
8
2,649
District Information Office, Latur retweeted
नागपूर जिल्ह्यातील लोहारी सावंगा (ता.नरखेड) येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नासह चाऱ्याचा प्रश्न सोडविण्यासाठी जी गावे मदत करतील त्यांना संपूर्ण सहकार्य देण्यात येईल, सरपंचांनी मांडलेल्या सर्व सूचना व जलसंधारणाच्या प्रश्नासंदर्भात प्राधान्याने कामे सुरू करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली. स्थानिक लोकप्रतिनिधींसोबत संवाद साधताना नरखेड तालुक्यातील भिष्णूर च्या सरपंच श्रीमती लताताई बागडे यांनी, मुख्यमंत्री महोदयाना प्रथमच भेटत असल्याचे सांगत गावातील विविध प्रश्नांसंदर्भाचे निवेदन मुख्यमंत्र्यांना दिले. मुख्यमंत्र्यांनाच मला निवेदनाच्या स्थळ प्रतिवर पोहोच द्यावी अशी मागणी त्यांनी केली. स्थानिक स्वराज्य संस्थातील लोकप्रतिनिधींनी थेट मुख्यमंत्र्यांना पोहोच पावती मागावी ही घटना प्रथमच घडत होती, परंतु त्या मागची भूमिका समजावून घेताना मुख्यमंत्र्यांनी त्यांना पोहोच देण्याची सूचना यावेळी केली. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर स्थानिक स्वराज्य संस्थांमधील प्रतिनिधी जागृतपणे काम करत आहेत गावात पिण्याचे पाणी गुरांच्या चारा व जलसंधारणाच्या कामांना प्राधान्य देत असल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी समाधान व्यक्त केले. #लोहारीसावंगा #दुष्काळ #शेतकरी #FarmerWelfare #DiwaliWithFarmers #Diwali
8
2
2
2,171
District Information Office, Latur retweeted
📍 नागपूर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोहारी सावंगा (ता.नरखेड) येथे शेतकऱ्यांसोबत दिवाळी साजरी केली. शेतकरी रामभाऊ बालपांडे यांच्या निवासस्थानी त्यांनी मुक्काम केला होता. आज अरुणाबाई बालपांडे यांनी मुख्यमंत्री यांचे औक्षण केले. #लोहारीसावंगा #दुष्काळ #शेतकरी #FarmerWelfare #DiwaliWithFarmers #Diwali
18
3
16
2,923
District Information Office, Latur retweeted
दिवाळीचा उजेड जेव्हा शेतकऱ्याच्या घरात मंदावला होता, तेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली दिवाळी थेट शेतकऱ्याच्या अंगणात साजरी केली. दुष्काळाच्या छायेत असलेल्या नागपूर जिल्ह्यातील लोहारी सावंगा गावात मुक्काम करून त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला, त्यांच्या व्यथा ऐकल्या आणि केवळ आश्वासन नाही, तर प्रत्यक्ष पाण्याच्या योजनांचा लाभ देऊन दिलासा दिला. लोहारी सावंगा हे ४२६४ लोकसंख्या आणि ८४४ कुटुंबांचे गाव आहे. कापूस, तूर, संत्रा, मोसंबी, सोयाबीन, चना, गहू ही येथील प्रमुख पिके आहेत. यंदा पावसाअभावी पिके करपली, संत्रा बागा सुकल्या. अशा कठीण काळात मुख्यमंत्र्यांनी गावात येऊन बांधावर जाऊन नुकसानग्रस्त पिकांची पाहणी केली. शेतकरी हा राज्याचा कणा आहे. दुष्काळात शेतकरी एकटा नाही. सरकार तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. केवळ मदत देऊन थांबणार नाही, तर शेतकऱ्याला कायमस्वरूपी पाणी देणे हेच आमचे ध्येय आहे. सिंचन विहीर आणि साठवण तलावामुळे लोहारी सावंगा आता दुष्काळावर मात करेल, असे मुख्यमंत्री यांनी यावेळी सांगितले. शेतकऱ्यांना सिंचन विहिरी योजनेअंतर्गत दहा शेतकऱ्यांना सिंचन विहीर मंजूर करण्यात आल्या. या विहिरींमुळे शेतकऱ्यांना आता बारमाही पाण्याची सोय होणार आहे. लाभार्थी शेतकरी १. विमल शामराव खडगा २. सुमन रामभाऊ थापले ३. रामचंद्र मधुकर घोडे ४. मेघनाथ भिमराव राऊत ५. खुशाल महादेव बरडे ६. धनराज सदाशिव वैद्य ७. तेजराव नथुजी फंदी ८. संध्याताई मनोहर राऊत ९. रमेश चंपत काळे १०. दानीश खान हनिफ पठाण याच दौऱ्यात लोहारी सावंगा येथे साठवण तलावाचे बांधकाम करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला. हा प्रकल्प लघु सिंचन मृद व जलसंधारण विभागाच्या सन २०२२-२३ च्या दरसूचीनुसार अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे. साठवण तलाव प्रकल्प ▶️ प्रकल्पाचे ठिकाण: मौजा लोहारी सावंगा, ता. नरखेड, जि. नागपूर - नरखेडपासून ४० कि.मी. अंतरावर, गावाच्या दक्षिणेस ▶️ प्रकल्पाची अंदाजित किंमत: २४३.३५ लक्ष रुपये ▶️ तलावाची लांबी: २९० मी., महत्तम उंची ९.९० मी., माथा रुंदी ३.०० मी. ▶️ लघुत्तम संचय पातळी (L.S.L.): १०२.६० मी. ▶️ निम्नतम नाला तळपातळी (N.B.L.): ९७.९० मी. ▶️ सिंचन क्षेत्र: अप्रत्यक्ष सिंचन क्षेत्राला लाभ ▶️ लाभ झालेले गाव: लोहारी सावंगा या साठवण तलावामुळे शेतीच्या सिंचनाला लाभ मिळेल, गावातील विहिरींच्या पाण्याच्या पातळीत वाढ होऊन पिण्याच्या पाण्याची सोय होईल आणि या परिसरातील शेतकऱ्यांचे राहणीमान उंचावण्यास मदत होणार आहे. या तलावासाठी वन विभागाच्या मान्यतेने भूसंपादन झालेले आहे. मुख्यमंत्री आमच्या गावात दिवाळीला मुक्कामाला आले, आमच्यासोबत फराळ केला, आमचे दुःख ऐकले आणि पाण्याच्या योजना दिल्या, यामुळे गावात पुन्हा आशेचा उजेड पसरला आहे, अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली. @Dev_Fadnavis #लोहारीसावंगा #दुष्काळ #शेतकरी #FarmerWelfare #DiwaliWithFarmers #Diwali
9
3
5
1,168
District Information Office, Latur retweeted
📍शिर्डी (जि. अहिल्यानगर) जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी कोपरगाव तालुक्यातील 'कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना' कोळपेवाडी आणि 'सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना' संजीवनीनगर येथे भेट देऊन ऊसतोड कामगारांशी संवाद साधला. मंत्री राठोड यांनी प्रत्यक्ष ऊसाच्या फडावर जाऊन ऊसतोडणीच्या कामाचा अनुभव घेतला आणि कामगारांच्या अडचणी जाणून घेतल्या. दिवाळी निमित्त ऊसतोड कामगारांना शिधा किटचे वाटप करण्यात आले. ऊसतोड कामगारांची महामंडळाकडे राज्यात विशेष नोंदणी मोहीम राबविण्याबाबत शासन स्तरावर धोरणात्मक निर्णय घेण्याबाबत पुढाकार घेण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्रातील ऊसतोड कामगार अत्यंत कष्टाचे काम करतात आणि ते इतर राज्यांतही कामासाठी जातात. त्यांच्या समस्या शासनापर्यंत पोहोचवणे हा या भेटीचा मुख्य उद्देश असल्याचे मंत्री राठोड यांनी सांगितले. ऊसतोड कामगारांच्या मुलांच्या शिक्षणासाठी शाळा व वसतिगृहांची सुविधा उपलब्ध करून दिली जाईल. वसतिगृहात प्रवेश न मिळाल्यास पात्रतेनुसार योजनेतून आर्थिक मदत दिली जाईल. ऊसतोड कामाच्या ठिकाणी आरोग्य शिबिरांचे आयोजन करणे आणि सुरक्षा साहित्य उपलब्ध करून देण्यावर शासनाचा भर असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. कामगारांना दिवाळीसाठी फराळाची शिधा किट वाटप करण्यात आली. यावेळी आमदार आशुतोष काळे, आमदार विवेक कोल्हे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. @SanjayDRathods #ऊसतोडकामगार #दिवाळी
5
4
2,053
District Information Office, Latur retweeted
📍नागपूर दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शक्य तिथे विंधन विहिरी घेण्यास परवानगी देण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. नागपूर जिल्ह्यातील लोहारी सावंगा या गावात शेतकऱ्याच्या घरी मुक्काम करून दिवाळी साजरी केली. शेतकरी रामभाऊ बालपांडे यांच्या निवासस्थानी मुक्काम केला. शेतकऱ्यांसमोरील संकट आणि या संकटावर कशी मात करता येईल, या संदर्भात त्यांनी बालपांडे यांच्यासोबत संवाद साधला. चिंताग्रस्त शेतकऱ्यांना त्यांनी धीर दिला. हवामान बदलामुळे काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी झाली त्यानंतर पाऊसच पडला नाही आणि अद्यापही पाऊस नसल्यामुळे शेतातील पिकांची हानी झाली आहे. या दोन्ही प्रसंगांमध्ये शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांना मदत दिली जात आहे. काटोल, नरखेड परिसरात संत्र्यासह मोसंबीचे मोठ्या प्रमाणात पीक होत आहे. परंतु, बांगलादेशने निर्बंध घातल्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान सोसावे लागत आहे. या संदर्भात मिहान येथे मोठा प्रकल्प सुरू होत असून या पिकांवर प्रक्रिया करण्यासाठी शेतकऱ्यांना संधी उपलब्ध होणार आहे .शेतकरी अडचणीत येणार नाही, त्याची खबरदारी घेण्यात येत आहे. रब्बीचे पीक वाचवण्यासाठी काय उपाययोजना करता येईल, या संदर्भातही शेतकऱ्यांसोबत चर्चा केली. शेतीच्या संरक्षणासाठी कुंपण घालण्याची योजना राबविण्यात येत असून शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा. असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले. शेतकऱ्यांच्या दुःखांमध्ये सहभाग घेऊन दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्री आमच्या घरी आलेत सोबत मुक्काम केला तसेच आमच्या घरच्या चटणी भाकरीचा आस्वाद घेतला, याचा आम्हाला अभिमान वाटला, मुख्यमंत्र्यांनी आम्हाला जो धीर दिला त्यामुळे आम्हाला संकटावर मात करण्याची हिंमत मिळाली, अशी भावना रामभाऊ बालपांडे यांनी व्यक्त केली. @Dev_Fadnavis #लोहारीसावंगा #दुष्काळ #शेतकरी #FarmerWelfare #DiwaliWithFarmers #Diwali
10
1
13
2,173
District Information Office, Latur retweeted
📍नागपूर राज्यात दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना धीर देण्यासोबतच त्यांचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी त्यांच्यासोबत दिवाळी सण साजरा करण्याची भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केली होती. त्यानुसार त्यांनी आज लोहारी सावंगा (ता.नरखेड, जि. नागपूर) येथे शेतकऱ्यांसोबत दिवाळी साजरी केली. शेतकऱ्यांनी संवाद साधतांना दुष्काळाच्या संकटातून बाहेर पडू, असा विश्वास व्यक्त केला. गावातच रामभाऊ बालपांडे या शेतकऱ्यांच्या घरी भरीत भाकरीचे जेवण करुन मुक्काम केला. त्यांच्या आगमनानंतर महिलांनी पारंपरिक पद्धतीने त्यांचे स्वागत केले. त्यानंतर सामुदायिक प्रार्थनेत त्यांनी सहभाग घेतला. रामभाऊ बालपांडे या शेतकऱ्याच्या घरी जेवण करुन दिवाळी सणानिमित्त गावकऱ्यांशी संवाद साधला. त्यांच्या अडचणी, समस्या, दुःख जाणून घेतले. यावेळी शेतकऱ्यांनी मोकळेपणाने मुख्यमंत्र्यांशी संवाद साधत आपल्या समस्या मांडल्या. शेतकरी पुरुषोत्तम वघाळे यांनी खोरी प्रकल्पाचा प्रश्न मार्गी लावल्याचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर यासाठी मान्यता देण्यात आली असून लवकरच काम सुरू होणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. जगदीश देशमुख या शेतकऱ्याने ४३ वर्षांपूर्वी पायाभरणी झालेल्या पाझर तलावाची अडचण सोडवून तलाव पूर्ण करण्याची मागणी केल्यानंतर याबाबत आवश्यक कारवाई लवकरच करू, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. पाणी फाऊंडेशनचा युवा कार्यकर्ता जयंत चाफले यांनी जुन्या खोरी तलावाचे काम मार्गी लावल्याबद्दल आभार व्यक्त केले. राजेंद्र चाफले व तेजपाल चौधरी यांनी रोही, वाघ, रानडुकरांचा शेती पिकांना मोठा फटका बसत असल्याने त्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली. दरम्यान दुष्काळी परिस्थितीमुळे मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष तालुका स्तरावर देखील कक्ष सुरू करण्यात येत मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. नागपूर जिल्ह्याच्या एका टोकावरील असलेल्या आमच्या गावास भेट दिल्याने दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्याचे बळ आणि आत्मविश्वास दिला, अशी भावना व्यक्त करत गावकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. यावेळी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार राजू पोतदार, आमदार चरणसिंह ठाकूर, आमदार आशिष देशमुख, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी, माजी आमदार सुधाकर कोहळे, सरपंच विपीन चाफले आदी उपस्थित होते. @Dev_Fadnavis @cbawankule #लोहारीसावंगा #दुष्काळ #शेतकरी #FarmerWelfare #DiwaliWithFarmers #Diwali
15
6
2,008
District Information Office, Latur retweeted
📍 नागपूर लोहारी सावंगा येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेस अभिवादन केले. त्यानंतर भजनी मंडळासोबत सामूहिक प्रार्थनेत सहभाग घेतला. @Dev_Fadnavis @cbawankule #लोहारीसावंगा #दुष्काळ #शेतकरी #FarmerWelfare #DiwaliWithFarmers #Diwali
13
2
16
2,390
District Information Office, Latur retweeted
📍 नागपूर लोहारी सावंगा येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सामूहिक प्रार्थनास्थळी आगमन झाले. स्थानिक शेतकरी महिलांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे व अन्‍य मान्यवर उपस्थित... @Dev_Fadnavis @cbawankule #लोहारीसावंगा #दुष्काळ #शेतकरी #FarmerWelfare #DiwaliWithFarmers #Diwali
1
13
4
31
11,247
District Information Office, Latur retweeted
📍नागपूर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लोहारी सावंगा येथे शेतकरी रामभाऊ बालपांडे यांच्या निवासस्थानी मुक्काम करणार आहेत. त्यांचे हे सुंदर कौलारु घर... @Dev_Fadnavis #लोहारीसावंगा #दुष्काळ #शेतकरी #FarmerWelfare #DiwaliWithFarmers #Diwali
2
18
2
69
10,677
District Information Office, Latur retweeted
📍नागपूर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लोहारी सावंगा येथे शेतकरी रामभाऊ बालपांडे यांच्या निवासस्थानी मुक्काम करणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर अरुणाबाई बालपांडे यांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत असलेला उत्साह... आगमणानिमित्त तयारी काय केली, जेवण काय बनवलं आहे हे सांगताना त्यांच्या उत्साही भावमुद्रा... @Dev_Fadnavis #लोहारीसावंगा #दुष्काळ #शेतकरी #FarmerWelfare #DiwaliWithFarmers #Diwali
1
17
2
71
4,600
District Information Office, Latur retweeted
📍नागपूर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शेतकऱ्यांसोबत दिवाळी साजरी करण्यासाठी लोहारी सावंगा येथे आगमण होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये उत्सुकता आणि उत्साह आहे. ठिकठिकाणी सजावट, रांगोळ्या घातल्या जात आहेत. त्याची ही काही छायाचित्रे.... @Dev_Fadnavis #लोहारीसावंगा #दुष्काळ #शेतकरी #FarmerWelfare #DiwaliWithFarmers #Diwali
10
3
7
2,378
District Information Office, Latur retweeted
📍नागपूर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शेतकऱ्यांसोबत #दिवाळी साजरी करण्यासाठी लोहारी सावंगा (ता. नरखेड, जि. नागपूर) येथे आगमण होणार असल्याने गावात उत्साहाचे वातावरण आहे. शेतीसह विविध प्रश्न मांडण्याची गावकऱ्यांना संधी मिळणार असून ग्रामस्थांना भेटीची उत्सुकता लागली आहे. मुख्यमंत्री आपल्या गावात येऊन शेतकऱ्यांसोबत दिवाळी साजरी करणार आहेत, ही आमच्यासाठी आनंदाची बाब आहे. गावातील शेतकऱ्यांचे प्रश्न त्यांच्यापर्यंत थेट पोहोचतील आणि गावाच्या विकासाच्या अपेक्षांवरही चर्चा करता येईल, अशी भावना ग्रामस्थांमध्ये आहे. शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेण्यासाठी मुख्यमंत्री स्वतः गावात येत असल्याने या भेटीकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर गावात आवश्यक तयारी सुरु आहे. @Dev_Fadnavis #लोहारीसावंगा #दुष्काळ #शेतकरी #FarmerWelfare #DiwaliWithFarmers #Diwali
1
16
2
23
1,843
District Information Office, Latur retweeted
📍 नागपूर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लोहारी सावंगा येथील शेतकरी रामभाऊ बालपांडे यांच्या घरी आगमन झाले. कुटुंबातील सदस्यांशी त्यांनी आपुलकीने संवाद साधला.. @Dev_Fadnavis #लोहारीसावंगा #दुष्काळ #शेतकरी #FarmerWelfare #DiwaliWithFarmers #Diwali
23
4
134
6,818
District Information Office, Latur retweeted
📍 इटकी (ता. सांगोला, जि. सोलापूर) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केल्यानुसार दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या सुख-दुःखात सहभागी होण्यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी इटकी येथील शेतकरी पोपट गोविंद सावंत यांच्या घरी भेट देऊन त्यांच्या कुटुंबीयांसमवेत #दिवाळी साजरी केली. यावेळी मंत्री भोसले यांनी सावंत कुटुंबीयांना दिवाळीचा फराळ व आहेर देत शुभेच्छा दिल्या. शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असून कोणत्याही परिस्थितीत खचून न जाता धैर्याने परिस्थितीचा सामना करावा, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सावंत यांच्या कुटुंबात तीन सदस्य असून त्यांच्या नावे १ हेक्टर २६ आर शेतजमीन आहे. या क्षेत्रात मका व बाजरी पिकांची लागवड करण्यात आली होती. पर्जन्यमानातील तुटवड्यामुळे मक्याचे ०.५० हेक्टर व बाजरीचे ०.५० हेक्टर असे एकूण १ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. बाधित क्षेत्राचा पंचनामा पूर्ण करण्यात आला असून शासन निर्णयानुसार त्यांच्या खात्यावर अग्रीम आर्थिक मदत जमा करण्यात आली आहे. यावेळी मंत्री भोसले यांनी सावंत कुटुंबीयांशी संवाद साधून शेतीची सद्यस्थिती, पिकांचे नुकसान तसेच शासनामार्फत उपलब्ध करून देण्यात आलेल्या मदतीबाबत माहिती घेतली. @Dev_Fadnavis @Shivendraraje11 #दुष्काळ #शेतकरी #FarmerWelfare #DiwaliWithFarmers #Diwali
10
17
2,411