
ALT मानव साधन विकास संस्था संचलित ‘जन शिक्षण संस्थान’, सिंधुदुर्ग (कौशल्य व उद्योजकता विकास मंत्रालय, भारत सरकार पुरस्कृत)च्या वतीने सिंधुदुर्गनगरी येथे संस्थेच्या कार्यालयात प्रशिक्षकांना एक दिवसीय 'क्षमता वृद्धी प्रशिक्षण' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष श्री. मोहन होडावडेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी व्यवस्थापकीय कमिटीचे उपाध्यक्ष श्री योगेश प्रभू, सदस्य सौ. वैदेही ओगले, सौ. अनुराधा दिक्षित, श्री. अमर निरमळे, श्री. मुकेश मेश्राम – व्यवस्थापक ,जिल्हा अग्रणी बँक कुडाळ, संचालक श्री. सुधीर पालव, MSVS चे संचालक श्री. नंदकिशोर परब आदि मान्यवर तसेच प्रशिक्षणार्थी आणि ३५ प्रशिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक कार्यक्रम अधिकारी श्री रमाकांत मेस्त्री यांनी, तर प्रास्ताविक श्री सुधीर पालव यांनी केले. अध्यक्ष श्री मोहन होडावडेकर यांनी उपस्थितांना व्यवसायच्या दृष्टीने मार्गदर्शन केले. तसेच ग्रामीण भागात स्वयंरोगराविषयी व प्रशिक्षणात अडचण आल्यास मदतीसाठी वेळोवेळी सहकार्य करण्याची ग्वाही दिली. आभार मेस्त्री यांनी मानले. तद्नंतर श

ALT जन शिक्षण संस्थान सिंधुदुर्ग व ग्रामपंचायत घोडगे यांच्या संयुक्त विद्यमाने घोडगे येथे जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. मानव साधन विकास संस्था संचलित ‘जन शिक्षण संस्थान’, सिंधुदुर्ग (कौशल्य व उद्योजकता विकास मंत्रालय, भारत सरकार पुरस्कृत) व ग्रापंचायत घोडगे तालुका कुडाळ यांच्यावतीने घोडगे ग्रामपंचायत येथे जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. महिलांना आपली स्वतःची स्वच्छ्ता किती महत्त्वाची आहे व ती कशाप्रकारे करावी या विषयी त्यांना चंद्रस्वा क्रिएशन्स चे व्यवस्थापक श्री. स्नेहल पेडणेकर यांनी मार्गदर्शन केले. प्रत्येक महिलेने आर्थिकदृष्ट्या स्वतःच्या पायावर उभे राहावे यासाठी जन शिक्षण संस्थान कौशल्यावर आधारित विविध प्रकारची प्रशिक्षणे राबवित आहे व त्याचा महिलांनी उपयोग करून रोजगार व स्वयंरोजगार करून सक्षम व्हावे असे आवाहन जन शिक्षणाचे सहा.कार्यक्रम अधिकारी श्री. गणेश परब यांनी केले. ग्रामपंचायत मार्फत विविध प्रकारच्या महिलांसाठी योजना राबविल्या जातात त्याचा फायदा गावातील महिलांनी कसा घ्यावा याविषयी मार्गदर्शन घोडगे ग्रामपंचायत चे ग्रामसेवक श्री.गणेश भोगले यांनी केले.




























