राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिम!
राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत रविवार, दि. २२ नोव्हेंबर २०२६ रोजी ५ वर्षांपर्यंतच्या सर्व बालकांना पोलिओचे दोन थेंब अवश्य पाजावेत.
आपल्या परिसरातील लसीकरण केंद्रावर किंवा घरोघरी येणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून बालकांचे लसीकरण करून घ्या. पोलिओमुक्त भारताच्या या मोहिमेत सहभागी होऊन आपल्या बालकांचे आरोग्य सुरक्षित ठेवूया!
📅 रविवार, २२ नोव्हेंबर २०२६
⏰ सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत
#राष्ट्रीयपल्सपोलिओमोहीम #पोलिओमुक्तभारत #बालआरोग्य #पोलिओचेदोनथेंब
20
राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम!
आपल्या लहानग्यांचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेत सहभागी होऊया. रविवार, २२ नोव्हेंबर २०२६ रोजी ५ वर्षांखालील सर्व बालकांना जवळच्या लसीकरण केंद्रावर पोलिओचे दोन थेंब अवश्य पाजावेत.
आपल्या पाल्यांना पोलिओपासून सुरक्षित ठेवण्यासाठी पालकांनी ही जबाबदारी पार पाडावी आणि आपल्या परिसरातील इतरांनाही याबाबत जागरूक करावे.
सुदृढ बालक, निरोगी भारत!
#राष्ट्रीयपल्सपोलिओमोहीम #पोलिओमुक्तभारत #सुदृढबालकनिरोगीभारत #लसीकरण #लहूअण्णा
26
२५ वर्षांची प्रतीक्षा संपली! पाषाण-बाणेर लिंक रोडचा मार्ग अखेर मोकळा!
बाणेर, पाषाण आणि बालेवाडी परिसरातील नागरिकांसाठी गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला पाषाण-बाणेर लिंक रोडचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. या रस्त्यामुळे परिसरातील वाहतूक कोंडी कमी होऊन नागरिकांचा प्रवास अधिक सुलभ होण्यास मदत होणार आहे.
या कामासाठी कोथरूडचे आमदार मा. श्री. चंद्रकांतदादा पाटील यांनी स्वतः पुढाकार घेतला. प्रत्येक शेतकऱ्याच्या घरी जाऊन त्यांच्या अडचणी समजून घेतल्या, त्यांच्याशी संवाद साधला आणि भूसंपादनाचा प्रश्न सोडवण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले.
या संपूर्ण प्रक्रियेत चंद्रकांतदादांच्या मार्गदर्शनाखाली काम करताना, आपल्या माध्यमातून त्यांना सहकार्य करता आले आणि अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी हातभार लावता आला, याचे विशेष समाधान आहे.
तब्बल २५ वर्षांपासून रखडलेल्या या रस्त्याचा प्रश्न अवघ्या तीन महिन्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर मार्गी लागणे, ही परिसराच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वाची बाब आहे.
@ChDadaPatil
#PashanBanerLinkRoad #Baner #Pashan #Balewadi #PuneDevelopment #ChandrakantDadaPatil
1
30
पुण्यनगरीचे शक्तिपीठ, अनंतकोटी ब्रह्मांडनायक राजाधिराज योगीराज सद्गुरू शंकर महाराज यांना प्रकटदिनानिमित्त कोटी-कोटी नमन आणि सर्व भाविकांना मंगलमय शुभेच्छा!
भक्ती, श्रद्धा, सेवा आणि अध्यात्माचा दिव्य संदेश देणाऱ्या सद्गुरू शंकर महाराजांची कृपादृष्टी आपल्या सर्वांवर सदैव राहो. त्यांच्या आशीर्वादाने प्रत्येकाच्या जीवनात सुख, शांती, समृद्धी आणि समाधान नांदो, हीच प्रार्थना!
#श्रीशंकरमहाराज #शंकरमहाराजप्रकटदिन #जयशंकरमहाराज #सद्गुरूकृपा #पुण्यनगरी
21
स्वातंत्र्यासाठी लढणारे आदिवासी जननायक, ‘उलगुलान’ चळवळीचे प्रणेते भगवान बिरसा मुंडा यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन!
सर्वांना जनजातीय गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
#जनजातीय_गौरव_दिवस #BhagwanBirsaMunda #Tribute
31
भूदान चळवळीचे प्रणेते, अहिंसेचे पुजारी आचार्य विनोबा भावे यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन!
भूमिहीन आणि गरजू कुटुंबांना जमिनीचा हक्क मिळावा, या उदात्त हेतूने त्यांनी भूदान चळवळीच्या माध्यमातून देशभर जनजागृती केली. त्यांचे विचार आणि कार्य सदैव प्रेरणादायी राहतील.
#AcharyaVinobaBhave #VinobaBhave #BhoodanMovement #SocialReformer
17
चिमुकल्यांच्या चेहऱ्यावरील हास्याने चंद्रकांतदादांसोबतची दिवाळी ठरली खास!
दिवाळी हा आनंद, उत्साह आणि आपुलकीचा सण. हा आनंद समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचावा, या भावनेतून राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा कोथरूडचे आमदार मा. श्री. चंद्रकांतदादा पाटील यांनी यंदाची दिवाळी कोथरूडमधील वस्ती भागातील नागरिकांसोबत साजरी केली.
यावेळी वस्तीतील कुटुंबीयांच्या घरी भेट देत त्यांच्याशी संवाद साधला. लहानग्यांना खाऊ आणि खेळण्यांचे वाटप करून त्यांच्या दिवाळीचा आनंद अधिक द्विगुणित केला. भेटवस्तू मिळाल्यानंतर चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर उमटलेले निरागस हास्य आणि त्यांनी उत्स्फूर्तपणे व्यक्त केलेले ‘Thank You चंद्रकांतदादा!’ हे शब्द या भेटीतील सर्वात आनंददायी क्षण ठरले.
समाजातील प्रत्येक घटकाच्या सुख-दुःखात सहभागी होणे, गरजूंना मदतीचा हात देणे आणि प्रत्येकाशी आपुलकीचे नाते जपणे, ही चंद्रकांतदादांची कार्यपद्धती राहिली आहे. त्
9
स्वातंत्र्यलढ्याचा धगधगता अंगार, सेनापती बापट !
क्रांतिकारक विचार, प्रखर राष्ट्रनिष्ठा आणि अन्यायाविरुद्ध संघर्षाची जिद्द यांचा संगम म्हणजे सेनापती पांडुरंग महादेव बापट ! स्वातंत्र्यलढ्यातील त्यांचे योगदान, निर्भीड नेतृत्व आणि समाजहितासाठी केलेला संघर्ष भारतीय इतिहासात सदैव प्रेरणादायी राहील. जयंतीदिनी त्यांच्या कर्तृत्वापुढे नतमस्त..
देशाच्या स्वातंत्र्यासाठी आयुष्य समर्पित करणाऱ्या या महान देशभक्ताचे कर्तृत्व प्रत्येक पिढीला राष्ट्रसेवेची प्रेरणा देत राहील.
क्रांतीची मशाल हाती, स्वातंत्र्याचा ध्यास उरी,
राष्ट्रासाठी जगले जीवन,
अमर राहिले नाव करी!
सेनापती बापट यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन !
#senaptibapat
31
बहिणीच्या मायेचा सुगंध, भावाच्या प्रेमाचा विश्वास,
हेच भाऊबीजेच्या नात्याचं अनमोल वैभव !
भाऊबीज म्हणजे केवळ औक्षणाचा सोहळा नाही, तर भाऊ-बहिणीच्या अतूट प्रेमाचा, विश्वासाचा आणि आयुष्यभर जपलेल्या भावनिक नात्याचा उत्सव आहे.
बहिणीच्या ओवाळणीत असते भावाच्या सुखी आयुष्याची प्रार्थना, तर भावाच्या भेटीत असतो बहिणीच्या आनंदाचा ध्यास. बालपणीच्या आठवणी, निरागस भांडणं, एकमेकांची काळजी आणि संकटकाळी धावून येणारी साथ !
या नात्याला अधिक सुंदर बनवते. काळ बदलतो, अंतर वाढतं, पण मनातील माया कधीच कमी होत नाही. या प्रेमळ नात्याचा गोडवा असाच सदैव दरवळत राहो! भाऊबीजेच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा !
#bhaubij #diwalicelebration #diwalivibes
90
उबाल तो बस बहाना था, पतीला तुम्हारा जल गया,
और तुम नासमझी में इसे अपनी जीत समझ बैठे!
अंजाम की बात वो न करें, जिनकी बुनियाद ही कमज़ोर हो,
अरे खेल पलटा है, अब अपनी असलियत भी समझ जाओगे!
एक बात मत भूलना… आप भी तो महायुती के ही हो, फिर ये बात क्यों भूल जाते हो ?
विजय हा महायुतीचाच✌️
कोल्हापूरकरांचे मनःपूर्वक अभिनंदन!
@Dev_Fadnavis @mieknathshinde @SunetraA_Pawar @RaviDadaChavan @mohol_murlidhar @ChDadaPatil @dbmahadik @iprakashabitkar @BJP4Maharashtra
27
केंद्रीय नागरी हवाई वाहतूक व सहकार राज्यमंत्री, पुण्यनगरीचे लोकप्रिय खासदार मा.श्री. मुरलीधर अण्णा मोहोळ यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
आपणांस उत्तम आरोग्य, उदंड आयुष्य लाभो आणि आपल्या हातून जनहिताची व विकासाची अनेक लोकोपयोगी कार्ये घडोत, हीच मनःपूर्वक सदिच्छा!
#MurlidharMohol #HappyBirthday #Pune
30
दीपावलीच्या मंगलमय पर्वातील लक्ष्मीपूजनाच्या पवित्र दिवशी माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्या सर्वांवर सदैव राहो.
प्रत्येकाच्या घरात सुख, शांती, समृद्धी आणि समाधान नांदो. आपल्या आयुष्यात यश, आरोग्य आणि आनंदाची अखंड बरसात होवो, हीच मनःपूर्वक प्रार्थना.
आपणास व आपल्या परिवारास लक्ष्मीपूजनाच्या मंगलमय हार्दिक शुभेच्छा!
#LaxmiPujan #Diwali #Mahalakshmi #Prosperity
83
Lahu Balwadkar retweeted
ज्यांच्या हस्ते भूमिपूजन, त्यांच्याच हस्ते लोकार्पण!
@narendramodi @metrorailpune @OfficialPMRDA
#MaharashtraDoubleEngine #PuneMetro #Maharashtra
पुणे मेट्रोच्या माध्यमातून शहराच्या कनेक्टिव्हिटीला नवी दिशा!
पुण्याच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या दृष्टीने आजचा दिवस महत्त्वपूर्ण ठरला. देशाचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते पुणे मेट्रो मार्गिका-३ (माण–हिंजवडी ते शिवाजीनगर) चे दृकश्राव्य माध्यमातून लोकार्पण करण्यात आले. त्याचबरोबर पुणे मेट्रो फेज-२ मधील विस्तारित मार्गिकांचे भूमिपूजनही संपन्न झाले.
हिंजवडीच्या आयटी क्षेत्राला थेट शिवाजीनगरशी जोडणारी २३.२०३ किलोमीटरची ही उन्नत मेट्रो मार्गिका पुणेकरांच्या प्रवासासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. विशेषतः बाणेर, बालेवाडी, म्हाळुंगे आणि औंध या परिसरातील नागरिकांना या मेट्रोमुळे अधिक चांगली कनेक्टिव्हिटी उपलब्ध होणार आहे. आयटी क्षेत्रातील नोकरदार, विद्यार्थी, व्यावसायिक आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी प्रवास अधिक जलद, सुलभ आणि सोयीस्कर होण्यास मदत होईल.
पुण्याच्या पश्चिम भागातील वेगाने विकसित होणाऱ्या या परिसरांना हिंजवडी आणि शिवाजीनगरशी जोडल्यामुळे सार्वजनिक वाहतुकीचे जाळे अधिक सक्षम होणार आहे. रस्त्यांवरील वाहतूक कोंडी कमी करण्यासोबतच नागरिकांचा प्रवासाचा वेळ वाचविण्यासही या प्रकल्पाचा फायदा होईल.
विशेष म्हणजे, पुणे मेट्रो मार्गिका-३ ही देशातील पहिली १०० टक्के महिला संचालित मेट्रो मार्गिका ठरणार आहे. आधुनिक तंत्रज्ञान, पर्यावरणपूरक प्रवास आणि महिला सक्षमीकरणाचा सुंदर संगम या प्रकल्पातून साधला जाणार आहे.
या महत्त्वपूर्ण कार्यक्रमाला राज्यपाल श्री. जिष्णू देव वर्माजी, मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री सौ. सुनेत्रावहिनी पवार, केंद्रीय मंत्री श्री. मनोहर लाल खट्टरजी, केंद्रीय राज्यमंत्री श्री. मुरलीधरजी मोहोळ, राज्यमंत्री सौ. माधुरीताई मिसाळ, पुण्याच्या महापौर सौ. मंजुषा नागपुरे, पिंपरी-चिंचवडचे महापौर श्री. रवी लांडगे यांच्यासह लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते.
@narendramodi @Dev_Fadnavis @mohol_murlidhar @ChDadaPatil @madhurimisal @BJP4Maharashtra
#PuneMetro #MetroLine3 #HinjewadiToShivajinagar #Baner #Balewadi
28
🚇 पुण्याच्या विकासाचे नवे पर्व… मेट्रोच्या माध्यमातून प्रगतीला नवी गती!
पुणे शहराच्या पायाभूत सुविधांच्या विकासातील महत्त्वपूर्ण टप्पा ठरणाऱ्या पुणे मेट्रोच्या विविध प्रकल्पांच्या उद्घाटन आणि भूमिपूजन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
मा. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी यांच्या शुभहस्ते (दूरदृश्य प्रणालीद्वारे) माण-हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रो मार्गिका-३ चे लोकार्पण तसेच पुणे मेट्रो टप्पा-२ अंतर्गत विविध मेट्रो मार्गिकांचे भूमिपूजन होणार आहे.
या महत्त्वपूर्ण सोहळ्याच्या निमित्ताने केंद्रीय राज्यमंत्री मा. श्री. मुरलीधर मोहोळ यांनी पुणेकरांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
हिंजवडी आयटी पार्क ते शिवाजीनगरदरम्यान प्रवास करणारे नोकरदार, विद्यार्थी आणि नागरिकांसाठी हा मेट्रो मार्ग महत्त्वपूर्ण ठरणार असून, प्रस्तावित मेट्रो मार्गिकांमुळे पुणे शहराच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला नवी दिशा मिळणार आहे.
पुण्याचा विकास, आधुनिक पायाभूत सुविधा आणि नागरिकांसाठी अधिक सुलभ वाहतूक व्यवस्था या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल!
चला, पुण्याच्या विकासाच्या या नव्या पर्वाचे साक्षीदार होऊया!
📅 मंगळवार, ३ नोव्हेंबर २०२६
⏰ सकाळी १०:३० वाजता
📍 बॅडमिंटन हॉल, श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे-बालेवाडी, पुणे.
@mohol_murlidhar
#PuneMetro #PuneDevelopment #ViksitPune #MurlidharMohal #UrbanMobility
1
74
महाराष्ट्राच्या ऐतिहासिक वैभवाचा आणि सांस्कृतिक वारशाचा अनोखा आविष्कार!
मा. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या पुढाकारातून तसेच मृणाल्स एंटरटेनमेंट आणि लहू बालवडकर सोशल वेल्फेअर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘मिस अँड मिसेस हेरिटेज इंडिया २०२६ – सीझन ५’ या भव्य सोहळ्याला बाणेर येथील बंटारा भवन येथे उपस्थित राहण्याचा आनंद मिळाला.
मृणाल सुमित गायकवाड यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या विशेष सोहळ्यात महाराष्ट्रातील २१ ऐतिहासिक गड-किल्ल्यांचा गौरवशाली इतिहास फॅशन शोच्या माध्यमातून सादर करण्यात आला. पारंपरिक वेशभूषा, ऐतिहासिक संदर्भ आणि आकर्षक सादरीकरणातून महाराष्ट्राच्या समृद्ध ऐतिहासिक व सांस्कृतिक वारशाचे दर्शन घडले.
इतिहास, संस्कृती आणि आधुनिक फॅशन यांचा सुंदर संगम घडवण्यासोबतच महिलांना आपले कलागुण, आत्मविश्वास आणि व्यक्तिमत्त्व सादर करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणारा हा उपक्रम विशेष कौतुकास्पद आहे.
यावेळी कॅबिनेट मंत्री मा. श्री. चंद्रकांत दादा पाटील, संकल्पन मृणाल सुमित गायकवाड ,कोथरूड उत्तर मंडल अध्यक्ष श्री. सचिन पाषाणकर आदी मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते.
@ChDadaPatil
#MissAndMrsHeritageIndia2026 #MaharashtraHeritage #FortsofMaharashtra #WomenEmpowerment #marathiculture
28
आज ‘श्रीयश एंटरप्रायझेस’ या नवीन व्यावसायिक कार्यालयाचे उद्घाटन उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले.
यावेळी श्रीयश एंटरप्रायझेसच्या नव्या व्यावसायिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या व्यवसायाच्या माध्यमातून उत्तरोत्तर प्रगती साधत यशाची नवनवी शिखरे गाठावीत आणि भरभराटीची वाटचाल घडावी, हीच मनःपूर्वक सदिच्छा!
#ShriYashEnterprises #OfficeInauguration #GrandOpening #NewBeginnings #businessgrowth
14
सामाजिक बांधिलकी जपूया, दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे येऊया!
केंद्रीय राज्यमंत्री मा. श्री. मुरलीधर मोहोळ यांच्या वाढदिवसानिमित्त संस्कृती प्रतिष्ठानच्या वतीने दुष्काळग्रस्त शेतकरी बांधवांच्या कुटुंबांना मदतीचा हात देण्यासाठी धान्य संकलन मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे.
या उपक्रमाच्या माध्यमातून गरजू कुटुंबांच्या घरातील चूल पेटती राहावी आणि त्यांच्या दिवाळीत आनंदाचे क्षण फुलावेत, हा प्रामाणिक प्रयत्न आहे.
या मोहिमेसाठी खालील धान्य व जीवनावश्यक वस्तूंचे संकलन करण्यात येत आहे :
* साखर
* हळद पावडर
* मिरची पावडर
* बाजरी
* बेसन
* तूप
* पोहे
* सुजी
* मैदा
* तूरडाळ
* चहा पावडर
* वाटाणा
या सामाजिक उपक्रमात आपण सर्व नागरिक, मित्रपरिवार, हितचिंतक आणि कार्यकर्त्यांनी सढळ हस्ते धान्य व जीवनावश्यक वस्तूंचे योगदान देऊन सहभागी व्हावे, ही नम्र विनंती.
आपण दिलेली छोटीशी मदत एखाद्या कुटुंबासाठी मोठा आधार ठरू शकते!
📅 कालावधी : २५ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर २०२६
📍 संकलन स्थळ :
लहू बालवडकर जनसंपर्क कार्यालय,
सर्व्हे क्र. १६, बाणेर-बालेवाडी रोड,
ब्राव्हेरिया सोसायटीसमोर, बालेवाडी, पुणे.
📞 अधिक माहितीसाठी संपर्क :
९३७१९९००७७ | ८३८०९९००७७
@mohol_murlidhar
#SanskritiPratishthan #धान्यसंकलनमोहीम #सामाजिकबांधिलकी #दुष्काळग्रस्तशेतकरी #शेतकरीबांधव
18
पुण्याच्या विकासाला नवी दिशा, प्रगतीला नवी गती!
पुणे शहराच्या विकासाच्या प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे छत्रपती शिवाजीनगर–हिंजवडी मेट्रो मार्गाचे लोकार्पण!
पुणेकरांची अनेक वर्षांची प्रतीक्षा संपवणारा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प शहराच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला नवी उंची देणारा ठरणार आहे. विशेषतः हिंजवडी आयटी पार्क आणि शिवाजीनगर परिसरादरम्यान प्रवास करणाऱ्या नोकरदार, विद्यार्थी आणि नागरिकांसाठी हा मेट्रो मार्ग मोठी सुविधा उपलब्ध करून देणार आहे.
मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस, केंद्रीय राज्यमंत्री मा. श्री. मुरलीधर मोहोळ आणि सर्व लोकप्रतिनिधींच्या प्रयत्नांतून पुण्याच्या पायाभूत सुविधांच्या विकासाला नवी गती मिळत आहे.
📍 छत्रपती शिवाजीनगर–हिंजवडी मेट्रो मार्ग लोकार्पण
📅 ३ नोव्हेंबर २०२६
#ViksitPune #PuneMetro #PuneDevelopment #ShivajinagarHinjewadiMetro #BJP4Pune
15
सत्याचा आग्रह, समाजपरिवर्तनाचा मार्ग !
महर्षी स्वामी दयानंद सरस्वती यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या क्रांतिकारी विचारांना विनम्र अभिवादन. सत्य, स्वाभिमान, शिक्षण आणि सामाजिक सुधारणांचा त्यांनी आयुष्यभर पुरस्कार केला.
अन्याय, अज्ञान आणि अंधश्रद्धेविरुद्ध त्यांनी दिलेला लढा समाजाला नवी दिशा देणारा ठरला. समाजाप्रती असलेल्या त्यांच्या बांधिलकीला शतशः नमन आणि त्यांच्या विचारांची ज्योत तेवत ठेवणे, हीच त्यांना खरी आदरांजली!
21

































