
Official X handle of Directorate General of Information and Public Relations (#DGIPR), #Government of #Maharashtra #महाराष्ट्र #शासन https://nitter.gq/t.co/vQ3dmidWWZ
Mumbai, India
Joined October 2014
- Tweets83.8K
- Following80
- Followers327K
- Likes120
‘TV 9 मराठी’ या वृत्तवाहिनीवरील ‘महाराष्ट्राचे महानिर्णय’ हा कार्यक्रम…
#साप्ताहिकमहाराष्ट्र
#MaharashtraThisWeek
#DGIPR
1,187
‘TV 9 भारतवर्ष’ या वृत्तवाहिनीवरील ‘महाराष्ट्र के महानिर्णय’ हा कार्यक्रम…
#साप्ताहिकमहाराष्ट्र
#MaharashtraThisWeek
#DGIPR
898
‘न्यूज 24’ या वृत्तवाहिनीवरील ‘प्रगतिशील महाराष्ट्र’ कार्यक्रम…
#साप्ताहिकमहाराष्ट्र
#MaharashtraThisWeek
#DGIPR
924
‘जय महाराष्ट्र’ या वृत्तवाहिनीवरील ‘समृद्ध महाराष्ट्र’ हा कार्यक्रम…
#साप्ताहिकमहाराष्ट्र
#MaharashtraThisWeek
#DGIPR
1,031
झी न्यूज’ या वृत्तवाहिनीवरील ‘महाराष्ट्र एक कदम आगे’ हा कार्यक्रम…
#साप्ताहिकमहाराष्ट्र
#MaharashtraThisWeek
#DGIPR
1,098
न्यूज 18 मराठी’ या वृत्तवाहिनीवरील ‘महाराष्ट्र विशेष’ कार्यक्रम…
#साप्ताहिकमहाराष्ट्र
#MaharashtraThisWeek
#DGIPR
786
न्यूज 18 इंडिया’ या वृत्तवाहिनीवरील ‘महाराष्ट्र Weekly’ हा कार्यक्रम…
#साप्ताहिकमहाराष्ट्र
#MaharashtraThisWeek
#DGIPR
781
इंडिया टीव्ही’ या वृत्तवाहिनीवरील ‘महाराष्ट्र Top 10’ हा विशेष कार्यक्रम…
#साप्ताहिकमहाराष्ट्र #MaharashtraThisWeek #DGIPR
792
CNN News 18’ या वृत्तवाहिनीवरील ‘अजेंडा महाराष्ट्र (Agenda Maharashtra)’ कार्यक्रम…
#साप्ताहिकमहाराष्ट्र
#MaharashtraThisWeek
#DGIPR
830
झी २४ तास’ या वृत्तवाहिनीवरील ‘महाराष्ट्र एक पाऊल पुढे’ कार्यक्रम…
#साप्ताहिकमहाराष्ट्र
#MaharashtraThisWeek
#DGIPR
1
793
विकसित महाराष्ट्राचे ध्येय साध्य करण्यासाठी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावीपणे वापर करावा. ग्रामीण भागात लघुउद्योगांना प्रोत्साहन आणि रोजगारनिर्मितीला चालना देऊन नागरिकांचे जीवन सुलभ करण्यात योगदान द्यावे. भारतीय प्रशासकीय सेवेची प्रतिमा अधिक उज्ज्वल करण्यासाठी अधिकाऱ्यांनी लोकांमध्ये राहून जनभावना जाणून घेऊन काम करावे, असे आवाहन मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी केले.
विकसित महाराष्ट्राचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी जिल्हास्तरावर प्रभावी नियोजन, विकासकामांची गती आणि प्रशासकीय यंत्रणेतील समन्वय अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने आयोजित दोन दिवसीय राज्यस्तरीय जिल्हाधिकारी परिषदेत मुख्य सचिव अग्रवाल बोलत होते. यावेळी मार्गदर्शन करताना मुख्य सचिव अग्रवाल म्हणाले की, प्रशासकीय अधिकारी हे धोरणांची प्रभावी अंमलबजावणी करणारे घटक असून त्यांची पदस्थापना कोणत्या ठिकाणी आहे, यापेक्षा त्यांनी विकासासाठी दिलेले योगदान अधिक महत्वाचे आहे. राज्य सकल उत्पादन, वस्तू व सेवा कर संकलन आणि थेट परकीय गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्र आघाडीवर आहे. राज्याची ही बलस्थाने लक्षात घेऊन विकसित महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी प्रत्येक अधिकाऱ्याने सकारात्मक आणि परिणामकारक दृष्टिकोनातून काम करणे आवश्यक आहे.
लोकप्रतिनिधी नेहमी लोकांमध्ये असतात, त्यामुळे त्यांना वस्तुस्थिती चांगली माहिती असते. अधिकाऱ्यांनीही लोकांमध्ये जास्तीत जास्त मिसळून जनभावना समजून घ्याव्यात. मंत्रालयातील अवर सचिव, उपसचिव यांनी क्षेत्रभेटी कराव्यात, असे आवाहन करुन अधिकाऱ्यांनी जिल्ह्यापुरते मर्यादित न राहता व्यापक दृष्टिकोन ठेवावा. त्याच वेळी तळागाळातील वस्तुस्थितीचे भानही ठेवावे, असे मुख्य सचिवांनी सांगितले. प्रशासकीय कामकाजातील औपचारिक बैठकांसाठी ऑनलाइन माध्यमांचा अधिकाधिक वापर करावा. मात्र, परस्पर समन्वय, संवाद आणि सहकार्य वाढविण्यासाठी आवश्यकतेनुसार प्रत्यक्ष भेटीही घ्याव्यात, असेही ते म्हणाले.
या परिषदेस महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव डॉ. श्रीकर परदेशी यांच्यासह राज्यातील विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी उपस्थित होते. महसूल विभागातील परिवर्तनात्मक सुधारणा तसेच बदलत्या काळातील जिल्हाधिकाऱ्यांच्या भूमिका आणि जबाबदाऱ्या या विषयावर अपर मुख्य सचिव (महसूल) विकास खारगे यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.
शासकीय योजनांतून किती कामे झाली, याबरोबरच त्या कामांचा नागरिकांना प्रत्यक्ष किती लाभ झाला, याचाही जिल्हानिहाय आढावा घ्यावा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव डॉ. श्रीकर परदेशी यांनी केले. मुख्यमंत्री कार्यालयाच्या प्रशासकीय अधिकारी राधा कुलकर्णी यांनी ‘विकसित महाराष्ट्र व्हिजन’ या विषयावर सादरीकरण करून मार्गदर्शन केले.
#विकसितमहाराष्ट्र
महात्मा जोतीराव फुले यांच्या विचारांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून शेतकऱ्यांना पाणी, दर्जेदार बियाणे, शेतीमालाला योग्य भाव आणि जलसंधारणाची मजबूत व्यवस्था देणे, हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल!
#MahatmaPhule200
#महात्माफुले200
#MahatmaJyotiraoPhule_BicentenaryBirthYear
#महात्माजोतीरावफुले_द्विशताब्दीजन्मवर्ष
📍पंढरपूर, जि.सोलापूर
#पर्यावरण संवर्धनाचे संस्कार लहान वयातच रुजवण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीने तयार करण्यात आलेले पाच विशेष पर्यावरण जनजागृती रथ आता संपूर्ण महाराष्ट्रात फिरणार आहेत. सौरऊर्जेवर चालणाऱ्या या पर्यावरण रथांचे उद्घाटन आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. २८ वर्षांपासून अव्याहतपणे सुरू असलेल्या ‘कार्तिकीची वारी, पंढरीच्या दारी’ या पर्यावरणपूरक उपक्रमाचा यशस्वी समारोप उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत करण्यात आला.
हवामान बदल, जागतिक तापमानवाढ, दुष्काळ आणि अतिवृष्टीच्या संकटांवर मात करण्यासाठी पर्यावरण रक्षण ही सामूहिक जबाबदारी आहे. लहान मुलांची आकलनशक्ती उत्तम असल्याने त्यांच्यात बालवयातच पर्यावरणाचे संस्कार रुजवल्यास ती मुले आपल्या कुटुंबालाही पर्यावरण रक्षणासाठी प्रवृत्त करतील आणि भविष्यात या चळवळीची खरी ब्रँड ॲम्बेसेडर ठरतील, असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला. हा उपक्रम राबवल्याबद्दल एमपीसीबीचे अध्यक्ष सिद्धेश कदम आणि त्यांच्या टीमचे विशेष कौतुक करून अभिनंदन केले.
दुष्काळ आणि अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘एक पेड माँ के नाम’ संकल्पनेप्रमाणे वृक्षारोपण वाढवण्याचे आवाहन त्यांनी केले. हवा आणि पाण्याचे प्रदूषण रोखणे, नद्या स्वच्छ ठेवणे आणि पर्यावरणपूरक विकास साधणे आवश्यक आहे. पांडुरंगाच्या भक्तीप्रमाणेच निसर्गाचीही भक्ती केली पाहिजे. वारी स्वच्छ, सुरक्षित, निर्मळ आणि पर्यावरणपूरक करण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे शिंदे यांनी सांगितले.
यावेळी रोजगार हमी योजना, फलोत्पादन व खारभूमी विकास मंत्री भरत गोगावले, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम, आमदार राजू खरे, सोलापूरचे जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन,माजी आमदार शाहजीबापू पाटील, पंढरपूर नगरपालिकेच्या नगराध्यक्ष ॲड.प्रणिता भालके आणि सर्व प्रशासकीय अधिकारी आणि वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्तिकीची वारी पंढरीच्या दारी या कार्यक्रमाच्या समारोपासाठी आले असता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या वारीत सहभागी झालेल्या वारकऱ्यांच्या साथीने हातात टाळ चिपळ्या घेऊन पांडुरंगाचा गजर केला. तर यानंतर वारकऱ्यांच्या खास आग्रहास्तव त्यांनी आधी वारकऱ्यांच्या आणि नंतर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांच्या साथीने फुगडी घातली.
@mieknathshinde
@mpcb_official
4
1,690
#महसूल विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध प्रशासकीय सुधारणा आणि नागरिकाभिमुख योजनांची जिल्हास्तरावर प्रभावी अंमलबजावणी करून नागरिकांचे प्रश्न प्रत्यक्षात सोडविण्यावर भर द्यावा. मंत्रिमंडळाचे निर्णय, नवीन पोर्टल किंवा कायद्यातील बदल ही सुधारणांची सुरुवात असते. या निर्णयांमुळे नागरिकांना प्रत्यक्ष लाभ मिळाला आणि त्यांचे प्रश्न सुटले, तरच महसूल सुधारणांना खऱ्या अर्थाने यश मिळते, असे महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांनी सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित जिल्हाधिकाऱ्यांच्या राज्यस्तरीय परिषदेत सांगितले.
शासनाच्या धोरणात्मक निर्णयांना अपेक्षित परिणाम मिळवून देण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी जिल्हास्तरीय यंत्रणांवर आहे. त्यामुळे प्रशासनाने केवळ निर्णयांची अंमलबजावणी न करता त्यातून नागरिकांना मिळणाऱ्या सुविधांचा आणि लाभांचा नियमित आढावा घ्यावा, असे त्यांनी स्पष्ट केले. परिषदेस मुख्य सचिव राजेश अग्रवाल, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव डॉ. श्रीकर परदेशी, जलसंधारण विभागाचे सचिव जितेंद्र पापळकर, मुख्यमंत्री कार्यालयातील प्रशासकीय अधिकारी राधा कुलकर्णी यांच्यासह सर्व विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी उपस्थित होते.
महसूल विभागात विविध सुधारणात्मक निर्णय घेण्यात येत आहेत. त्यांची माहिती अपर मुख्य सचिव विकास खारगे यांनी दिली. नागरिकांना मालमत्तेची सविस्तर माहिती उपलब्ध करून देणारे ‘लँड टायटलिंग’ विधेयक लवकरच अधिवेशनात मांडण्यात येणार आहे. राज्यात प्रत्येक तालुक्यात एकाच कार्यालयात दस्त नोंदणी, फेरफार व मालकी हक्क नोंदणीची सुविधा उपलब्ध करुन दिली जाणार आहे. शहरी भागातील प्रत्येक सदनिकाधारकाला स्वतंत्र मालमत्ता पत्रक देण्यासाठी ‘व्हर्टिकल प्रॉपर्टी कार्ड’ योजना राबविण्यात येणार आहे. इमारतीच्या मुख्य मालमत्ता पत्रकासोबत प्रत्येक सदनिकेचे क्षेत्रफळ नमूद असलेले स्वतंत्र पूरक पत्रक देण्याचे नियोजित आहे. जमिनीची आधी मोजणी, त्यानंतर दस्त नोंदणी आणि नंतर फेरफार अशी कार्यपद्धती स्वीकारण्यात येणार आहे. मोजणीचा सध्याचा कालावधी १४ ते २८ दिवसांपर्यंत कमी करण्याचे उद्दिष्ट असल्याचे खारगे यांनी सांगितले.
‘महाखनिज’ प्रणालीद्वारे उत्खननापासून खनिज वाहतुकीपर्यंत देखरेख ठेवण्यात येणार आहे. सर्व खाणी व वाळूघाटांचे ड्रोन सर्वेक्षण तसेच पाण्याखालील वाळू व गाळाचे आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे मोजमाप करण्यात येईल. जिल्हाधिकाऱ्यांनी उत्खनन, वाहतूक, स्वामित्वधन व दंडवसुलीचा नियमित आढावा घ्यावा. अकृषिक प्रमाणपत्राची अट रद्द केल्यानंतर त्याची अनावश्यक मागणी होणार नाही, याची दक्षता घ्यावी. ‘महाभूमी स्टॅक’वर जमिनीचे स्थान, मालकी, व्यवहार, बँक बोजा, दावे-हरकती, नकाशे व न्यायालयीन प्रकरणांची माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. नोंदणी व मुद्रांक विभागाची ६० आदर्श कार्यालये विकसित करण्यात येणार असून पासपोर्ट सेवा केंद्रांच्या धर्तीवर ही सुविधा उपलब्ध होईल. जुन्या नोंदणी अभिलेखांचे डिजिटायझेशन करून ते ‘महाभूमी स्टॅक’वर उपलब्ध करण्यात येतील, अशी माहितीही अपर मुख्य सचिव खारगे यांनी दिली.
प्रशासकीय अधिकाऱ्याने केवळ निवेदने किंवा सूचनांवर प्रतिक्रिया देण्यापुरते मर्यादित न राहता परिवर्तनशील दृष्टिकोनातून काम करावे. जिल्हाधिकाऱ्यांकडे येणाऱ्या प्रत्येक नागरिकाचे म्हणणे संवेदनशीलतेने ऐकून त्याला न्याय देण्याचा प्रयत्न करावा. इतर शासकीय विभाग, लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था, अभ्यासक, कार्यकर्ते आणि प्रसारमाध्यमांशी समन्वय साधून विकसित महाराष्ट्राच्या उद्दिष्टपूर्तीसाठी एकत्रितपणे काम करावे, असे आवाहन अपर मुख्य सचिव विकास खारगे यांनी यावेळी केले.
2
1,692
माझी धान पिकाची शेती आहे. सततची नापिकी व पावसाच्या अनियमिततेमुळे मी कर्ज फेडू शकलो नाही. मात्र यावर्षी कर्जमुक्ती योजनेच्या माध्यमातून मला पूर्ण कर्जमाफी मिळाली आहे. त्यामुळे मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचा आभारी आहे - संतोषकुमार बागडे (रा. गोनाम्ब्रे, जि. भंडारा)
#शेतकरीकर्जमुक्तीयोजना२०२६
#शेतकरी
#महाकर्जमुक्ती
#पुण्यश्लोकअहिल्यादेवीहोळकर
#महाराष्ट्रशासन
#MahaDGIPR
#Farmerwelfare
1
1,646
तुमच्या कलागुणांना द्या हक्काचे व्यासपीठ!
मुंबई शहर जिल्हास्तरीय युवा महोत्सव २०२६-२७ मध्ये सहभागी होऊन नृत्य, गायन, पथनाट्य, चित्रकला आणि कविता लेखन अशा विविध कलाप्रकारांतून आपली प्रतिभा सादर करा!
#युवामहोत्सव
#कलागुणांचाजागर
#मुंबई
#YouthFestival2026
1,598
पाण्याअभावी आमची द्राक्षबाग वाळून गेल्याने ती काढून टाकावी लागली. अशा परिस्थितीत आम्हाला शासनाकडून ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ च्या माध्यमातून कर्जमाफी झाली आहे. त्याबद्दल शासनाचे आभार तसेच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचे मनापासून धन्यवाद - अरविंद मंडले (रा. बोलवाड, ता. मिरज, जि. सांगली)
#शेतकरीकर्जमुक्तीयोजना२०२६
#शेतकरी
#महाकर्जमुक्ती
#पुण्यश्लोकअहिल्यादेवीहोळकर
#महाराष्ट्रशासन
#MahaDGIPR
#Farmerwelfare
1,555
लाडकी बहीण योजनेचे ई-केवायसी पोर्टल पुन्हा सुरू झाल्याचा technotiger07 या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन करण्यात येणारा दावा खोटा आहे.
#FactCheck
#DGIPRFactCheck
महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी प्रक्रिया पुन्हा सुरु केलेली नाही आणि याबाबत कोणताही शासन निर्णय (GR) किंवा अधिकृत घोषणा केलेली नाही. महिलांनी खोट्या आणि फसव्या लिंकवर क्लिक करुन कुठलीही वैयक्तिक माहिती देऊ नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
#मुख्यमंत्रीमाझीलाडकीबहिण
एसटी बसमध्ये सर्व पुरुषांसाठी अर्ध्या तिकिटाची सुविधा सुरू झाल्याचा आणि त्याबाबत शासन निर्णय जारी झाल्याचा 'महाराष्ट्र live' या यू ट्यूब चॅनलवरील दावा खोटा आहे.
#FactCheck
#DGIPRFactCheck
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने किंवा राज्य शासनाने सर्व पुरुषांना अर्ध्या तिकिटाची सवलत देण्याचा कोणताही निर्णय घेतलेला नाही आणि त्याबाबत कोणताही शासन निर्णय जारी केलेला नाही. एसटी प्रवासातील ५० टक्के भाडे सवलत केवळ महिलांसाठी आहे.
#MSRTC












