Maha Forest Official retweeted
पुणे वनवृत्तांतर्गत वन विभागाच्या विविध कामांचा, सुरू असलेल्या उपक्रमांचा तसेच विकासकामांचा सविस्तर आढावा घेतला. वनसंवर्धन, वनक्षेत्राचे संरक्षण, वन्यजीव व्यवस्थापन आणि विभागासमोरील विविध प्रश्नांवर यावेळी चर्चा करण्यात आली.
पुणे येथील वन विभागाच्या कामकाजात अधिक गतिमानता आणून प्रलंबित विषय मार्गी लावण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या. वनसंपदेचे जतन आणि संवर्धन करताना प्रशासनाने अधिक प्रभावीपणे कार्यरत राहावे, यावर भर दिला.
Conducted a comprehensive review of the Pune Forest Circle’s ongoing activities, departmental operations and development projects.
The meeting focused on forest conservation, protection of forest areas, wildlife management and key challenges facing the department.
I directed the concerned officials to expedite pending matters, improve operational efficiency and strengthen the implementation of conservation measures.
Emphasis was placed on effective administration and the continued protection and sustainable management of Maharashtra’s forest resources.
#ForestConservation
#WildlifeProtection
#MaharashtraForests
Maha Forest Official retweeted
🔸 CM Devendra Fadnavis chaired a meeting regarding various issues of the Forest Department.
Minister Ganesh Naik, MoS Adv. Ashish Jaiswal and senior officials were present.
🔸 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली वन विभागाच्या विविध प्रश्नांसंदर्भात बैठक.
यावेळी मंत्री गणेश नाईक, राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
🔸 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी अध्यक्षता में वन विभाग के विभिन्न प्रश्नों के संदर्भ में बैठक।
इस अवसर पर मंत्री गणेश नाईक, राज्यमंत्री एड. आशिष जयस्वाल एवं वरिष्ठ अधिकारी उपस्थित थे।
🕑 1.50pm | 17-11-2026📍Mantralaya, Mumbai | दु. १.५० वा. | १७-११-२०२६📍मंत्रालय, मुंबई.
@Dev_Fadnavis @NaikSpeaks @Ashishjaisw3Adv
#Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai
Maha Forest Official retweeted
कोल्हापूर वन विभागाने गेल्या वीस दिवसांत लोकसहभागातून वनक्षेत्रात ४५० वनराई बंधारे उभारले असून, त्यामुळे सुमारे तीन कोटी लिटर पाणीसाठा निर्माण झाला आहे. एक हजार बंधारे उभारण्याचे उद्दिष्ट असल्याची माहिती कोल्हापूरचे उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील यांनी दिली.
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जलसंवर्धनाचे विविध उपाय करण्याचे आवाहन केले आहे. या आवाहनाला प्रतिसाद म्हणून या उपक्रमाची सुरुवात २ ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी जयंती तसेच वन्यजीव सप्ताहाच्या प्रारंभाच्या दिवशी करण्यात आली. या अभियानातून जलसंधारण, पर्यावरण संवर्धन आणि वन्यजीव संरक्षणाचा संदेश पोहोचवण्यात आला.
या अभियानात ग्रामस्थ, विद्यार्थी, महिला तसेच वन विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. लोकसहभाग आणि श्रमदानाच्या माध्यमातून अत्यल्प खर्चात वनराई बंधारे बांधण्यात आले आहेत. वनक्षेत्रात वनराई बंधारे बांधल्यामुळे पावसाचे पाणी अडवून ते जमिनीत मुरण्यास मदत होते. परिणामी, भूजल पातळी वाढण्यास तसेच परिसरातील विहिरी आणि इतर जलस्रोतांमधील पाण्याची उपलब्धता टिकवून ठेवण्यास हातभार लागतो. तसेच, पाण्याचा प्रवाह नियंत्रित होऊन मातीची धूप कमी करण्यास आणि मृदसंधारणाचे कार्य साध्य करण्यास मदत होते. जंगलामध्ये वन्यप्राण्यांसाठी पाण्याचे स्रोत उपलब्ध झाल्यामुळे त्यांच्या पिण्याच्या पाण्याची गरज जंगलातच भागविण्यास मदत होते, असे श्री. पाटील यांनी सांगितले.
#वनराईबंधारे
#वनविभाग
Maha Forest Official retweeted
कोलामार्का संवर्धन राखीव क्षेत्र व नवीन विस्तारित तानसा वन्यजीव राखीव क्षेत्राला वन्यजीव अभयारण्य म्हणून मान्यता
१४ संवर्धन राखीव क्षेत्रांनाही मान्यता
#वनक्षेत्र
#MahaDGIPR
Maha Forest Official retweeted
गडचिरोली जिल्ह्यातील रानम्हशींसाठी ओळखल्या जाणाऱ्या कोलामार्का संवर्धन राखीव क्षेत्रास वन्यजीव अभयारण्य म्हणून घोषित करण्यात तसेच तानसा वन्यजीव अभयारण्य क्षेत्राजवळील नवीन विस्तारित तानसा वन्यजीव अभयारण्यास वन्यजीव अभयारण्य म्हणून घोषित करण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य वन्य जीव मंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. तसेच पुणे, रायगड, नाशिक, नंदुरबार, ठाणे, पालघर आणि चंद्रपूर जिल्ह्यांतील १४ संवर्धन राखीव क्षेत्रांच्या प्रस्तावांना मान्यताही यावेळी देण्यात आली.
महाराष्ट्र राज्य वन्यजीव मंडळाची २६ वी बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी वन मंत्री गणेश नाईक दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते. तसेच वन विभागाचे अपर मुख्य सचिव संजय खंदारे, प्रधान मुख्य वन संरक्षक (वन बल प्रमुख) एम. श्रीनिवास राव, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) श्रीनिवास रेड्डी, मंडळाचे सदस्य तथा मित्राचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रविण परदेशी यांच्यासह मंडळाचे इतर सदस्य उपस्थित होते.
राज्यातील सहा व्याघ्र प्रकल्पांचे गाभा, बफर व अधिसूचित पर्यावरण संवेदनशील क्षेत्र शांतता क्षेत्र म्हणून अधिसूचित करणे, मानव-वन्यजीव संघर्षाला नैसर्गिक आपत्ती घोषित करणे आणि व्याघ्र प्रकल्पांच्या बफर क्षेत्रातील इच्छुक गावांच्या पुनर्वसनासाठी धोरण तयार करणे या प्रस्तावांवरही बैठकीत चर्चा झाली. आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांची जबाबदारी, विद्यमान नुकसानभरपाई व्यवस्था आणि वन विभागाचे अधिकार यांची सुसंगती तपासून पुढील कार्यवाही करावी, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
अभयारण्य म्हणून घोषित झालेली; मात्र अद्याप प्रादेशिक वन विभाग किंवा वन विकास महामंडळाच्या व्यवस्थापनाखाली असलेली क्षेत्रे वन्यजीव शाखेकडे देण्याबाबत कर्मचारी समायोजन, प्रतिनियुक्ती आणि रिक्त पदांचा अभ्यास करून एका महिन्यात निर्णयासाठी प्रस्ताव सादर करण्याचे निर्देशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.
@Dev_Fadnavis @NaikSpeaks
#वन्यजीव #अभयारण्य
Maha Forest Official retweeted
वन्यजीव सप्ताह २०२६ निमित्त महाराष्ट्र शासनाच्या वन विभागाच्या वतीने आयोजित ‘इंटर-एजन्सी वर्कशॉप’ आज यशस्वीपणे संपन्न झाले.
वन्यजीव संवर्धनासाठी सामूहिक प्रयत्न, प्रभावी नियोजन आणि विविध विभागांमधील समन्वय अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने ही कार्यशाळा महत्त्वपूर्ण ठरली.
#वन्यजीव_सप्ताह
#WildlifeWeek2026
#WildlifeConservation
#ForestDepartment
#Maharashtra
Maha Forest Official retweeted
'वन्यजीव सप्ताह २०२६' च्या औचित्याने महाराष्ट्र शासन वन विभागाच्या वतीने आयोजित 'इंटर-एजन्सी वर्कशॉप' चे आज यशस्वी आयोजन करण्यात आले. यावर्षीच्या वन्यजीव सप्ताहाची मुख्य संकल्पना 'Connecting Habitats, Thriving Wildlife' (अधिवासांची जोडणी, वन्यजीवांची भरभराट) ही आहे.
वन्यजीवांचे संरक्षण करणे, त्यांचे नैसर्गिक कॉरिडोअर्स सुरक्षित ठेवणे आणि मानव-वन्यजीव संघर्ष कमी करणे या उद्देशाने सर्व संबंधित यंत्रणांमध्ये समन्वय असणे अत्यंत गरजेचे आहे. याच पार्श्वभूमीवर या विशेष आंतर-संस्थात्मक कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यशाळेत वन विभागासह पोलीस, महसूल, रेल्वे, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि इतर विविध शासकीय यंत्रणांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला. वन्यजीवांची अवैध तस्करी रोखणे, रेल्वे किंवा महामार्गांवर होणारे प्राण्यांचे अपघात टाळण्यासाठी उपाययोजना करणे आणि संकटसमयी त्वरित एकत्रित मदत पोहोचवणे यासारख्या महत्त्वाच्या विषयांवर यादरम्यान सविस्तर चर्चा होऊन धोरणात्मक निर्णय घेण्यात आले.
आपली समृद्ध जैवविविधता आणि वन्यजीव ही महाराष्ट्राची अमूल्य नैसर्गिक संपत्ती आहे. तिचे जतन करण्यासाठी सर्व यंत्रणांनी एकत्रितपणे घेतलेला हा पुढाकार कौतुकास्पद आहे. या कार्यशाळेत सहभागी झालेल्या सर्व संस्थांच्या प्रतिनिधींचे आणि वन अधिकाऱ्यांचे मी मनःपूर्वक अभिनंदन करतो.
सदर कार्यक्रमप्रसंगी महाराष्ट्र राज्य पोलीस महासंचालक श्री. सदानंदजी दाते, अप्पर मुख्य सचिव वने श्री. संजय जी खंदारे, प्रधान मुख्य वनसंरक्षक वन्यजीव विभाग श्री. एस एस रेड्डी, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक वन्यजीव पश्चिम श्री. रविकिरण जी गोवेकर, मुख्य वनसंरक्षक मंत्रालय श्री. जितेंद्र जी रामगावकर, श्री. मुख्य वनसंरक्षक कांदळवन श्री. एन. आर प्रवीण, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान संचालक श्रीमती. अनिता पाटील, वन्यजीव गुन्हे नियंत्रण कक्ष उपसंचालक श्री. योगेश वडखर आदी मान्यवर उपस्थित होते.
------
On the occasion of Wildlife Week 2026, inaugurated the Inter-Agency Workshop organised by the Maharashtra Forest Department under this year’s theme, “Connecting Habitats, Thriving Wildlife.”
Wildlife conservation today requires more than the efforts of one department. Protecting natural corridors, reducing human-wildlife conflict, preventing wildlife trafficking and ensuring the safety of animals around railway tracks and highways all require close coordination between different agencies.
Senior officials from the Forest Department, Police, Revenue, Railways, National Highways Authority and other government agencies participated in the workshop. We discussed practical measures to strengthen coordination, improve response during wildlife emergencies and make our conservation efforts more effective.
Maharashtra is blessed with rich forests and through stronger inter-agency coordination and timely action, we can ensure safer habitats for wildlife and a better balance between nature and human development.
I appreciate the participation and contribution of all the officers and representatives who joined this important workshop.
#वन्यजीव_सप्ताह
#WildlifeWeek2026
#WildlifeConservation
#ForestDepartment
#Maharashtra
Maha Forest Official retweeted
आज तुर्भे येथे वरिष्ठ वनाधिकारी तसेच क्षेत्रीय स्तरावर कार्यरत अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी प्रभावी संवाद कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या संवाद कार्यशाळेचे नेतृत्व केले. वन विभाग आणि नागरिकांमधील संवाद अधिक सकारात्मक, पारदर्शक आणि परिणामकारक व्हावा, या उद्देशाने या कार्यशाळेत विविध महत्त्वाच्या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.
- सदर बैठकीमध्ये अटल बांबू समृद्धी योजना तसेच राष्ट्रीय बांबू मिशन यांच्या माध्यमातून बांबू लागवडीला प्रोत्साहन देताना शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान, मार्गदर्शन आणि बाजारपेठेशी जोडण्यावर भर देण्यात आला.
- बांबू लागवडीत Digital Transformation चा प्रभावी वापर करून लागवडीचे डिजिटल पद्धतीने निरीक्षण, माहितीचे संकलन, वाढीचे मूल्यांकन आणि व्यवस्थापन अधिक सक्षम करण्याच्या दिशेने प्रयत्न सुरु आहे.
- वन विभागातील कामांना अधिक शिस्तबद्ध, पारदर्शक आणि एकसमान कार्यपद्धतीची जोड मिळावी, या उद्देशाने तयार करण्यात आलेल्या "Model Rate Structure For Forestry Work and Forest Civil Works" या महत्वपूर्ण पुस्तकाचे लोकार्पण देखील बैठकीत करण्यात आले.
वनसंवर्धनासोबतच शेतकरी, स्थानिक नागरिक आणि वन विभाग यांच्यातील संवाद अधिक मजबूत करणे ही काळाची गरज आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, बांबू लागवडीला प्रोत्साहन, शेतकऱ्यांना आवश्यक मार्गदर्शन व बाजारपेठेशी जोडणी तसेच वन विभागाच्या कामकाजात पारदर्शकता आणि एकसमान कार्यपद्धती यावर या कार्यशाळेत विशेष भर देण्यात आला.
------
Chaired an 'Effective Communication Workshop' organized at Turbhe for senior forest officers and field-level officials and staff. The workshop focused on making communication between the Forest Department and citizens more positive, transparent and effective.
Key discussions included promoting bamboo cultivation through the Atal Bamboo Samruddhi Yojana and National Bamboo Mission, using digital technology for better monitoring and management, and strengthening transparency and uniformity in departmental work.
The workshop also saw the launch of the Model Rate Structure for Forestry Work and Forest Civil Works book.
The focus remains on stronger citizen engagement, supporting farmers and bringing greater transparency and efficiency to the Forest Department.
#वनसंवर्धन
#BambooCultivation
#AtalBambooSamruddhiYojana
#DigitalTransformation
#Maharashtra
Maha Forest Official retweeted
दुर्गम भागातील आश्रमशाळांमधील विद्यार्थी व कर्मचाऱ्यांसाठी दि. १९ ते २६ सप्टेंबर २०२६ दरम्यान 'सर्पदंश जनजागृती व प्रतिबंध अभियान'
#सर्पदंश
#सर्पदंशजनजागृती
#SnakeBiteAwareness
Maha Forest Official retweeted
विकसित महाराष्ट्र, हरित महाराष्ट्र!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मंत्रालय, मुंबई येथे महाराष्ट्र शासनाने महसूल विभाग आणि वन विभागाच्या समन्वयातून तयार केलेल्या ‘लँड बँक प्रोजेक्ट 2026’चे उदघाटन केले.
विकास आणि पर्यावरण संवर्धनाचा समतोल साधत महाराष्ट्र शासनाने महसूल व वन विभागाच्या समन्वयातून ‘लँड बँक’ प्रणाली विकसित केली आहे. पर्यायी वनीकरणासाठी आवश्यक असलेल्या अवनत वनजमिनी आणि वनेत्तर जमिनीची जिल्हानिहाय माहिती आता एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. यामुळे पर्यायी वनीकरणाच्या प्रक्रियेला गती मिळण्यासह पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या अमलबजावणीतील विलंब कमी होण्यास मदत होणार आहे. राज्यातील 36 जिल्ह्यांमधील एकूण 40,602 हेक्टर जमीन पर्यायी वनीकरणासाठी उपलब्ध करण्यात आली आहे.
यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री गणेश नाईक व मंत्रिमंडळातील इतर सदस्य उपस्थित होते.
@narendramodi @Dev_Fadnavis @SunetraA_Pawar @cbawankule @NaikSpeaks
#Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai
Maha Forest Official retweeted
आज महाराष्ट्र राज्याची वनविभागाची आढावा बैठक पार पडली. वनविभागाच्या कामकाजाचा आढावा घेताना वनसंवर्धन आणि पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने विविध महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा करण्यात आली.
- वन्यजीव संरक्षण
वन्यजीवांचे नैसर्गिक अधिवास सुरक्षित ठेवणे आणि जैवविविधतेचे प्रभावी संरक्षण करणे.
- मानव-वन्यजीव सहअस्तित्व
मानव-वन्यजीव संघर्ष कमी करून दोघांमध्ये सुरक्षित आणि संतुलित सहअस्तित्व निर्माण करण्यासाठी उपाययोजनांवर भर.
- शाश्वत वन व्यवस्थापन
वैज्ञानिक दृष्टिकोन, आधुनिक तंत्रज्ञान आणि प्रभावी नियोजनाच्या माध्यमातून वनसंपदेचे शाश्वत व्यवस्थापन.
- पर्यावरण संवर्धन
निसर्ग आणि पर्यावरणाचे संरक्षण करताना शाश्वत विकासाला चालना देण्यासाठी आवश्यक उपाययोजनांचा आढावा.
वन, वन्यजीव आणि पर्यावरण ही आपली अमूल्य नैसर्गिक संपत्ती आहे. तिचे संवर्धन करताना विकास आणि पर्यावरण यांचा समतोल साधण्यावर शासनाचा सातत्याने भर राहील.
#वनविभाग
#वन्यजीव_संरक्षण
#SustainableForestManagement
#Biodiversity
#Maharashtra
Maha Forest Official retweeted
मूल्यप्रस्तावाधारित व्याघ्र संवर्धनासाठी शासनाचे नवे पाऊल
शाश्वत वन्यजीव पर्यटन व व्याघ्र संवर्धनासाठी ११ महत्त्वाचे सामंजस्य करार
#व्याघ्रसंवर्धन #वन्यजीव #वनसंवर्धन #वन्यजीवपर्यटन
#SaveTigers #SustainableTourism #ProjectTiger #Wildlife #MahaDGIPR
Maha Forest Official retweeted
एशियाटिक बिग कॅट सोसायटीच्या वतीने व्याघ्र संवर्धनासह इतर प्रजातींचे संरक्षण, बचाव आणि जनजागृतीसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची सविस्तर माहिती...
@Dev_Fadnavis
#Maharashtra #DevendraFadnavis #InternationalTigerDay
Maha Forest Official retweeted
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज नागपूर येथे 'आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन 2026' निमित्त मार्व्हल कंपनीने विकसित केलेल्या एआय आधारित मानव-वन्यजीव निरीक्षण प्रणालीचे (AI Based Human Wildlife Monitoring Platform) उदघाटन करण्यात आले.
@Dev_Fadnavis @NaikSpeaks @DRPANKAJBHOYAR @Ashishjaisw3Adv @Sumitwankhede86
#Maharashtra #DevendraFadnavis #InternationalTigerDay
Maha Forest Official retweeted
🤝 CM Devendra Fadnavis presided over the signing and exchange of 3 MoUs at the programme organized on the occasion of 'International Tiger Day 2026' in Nagpur, today. A total of 11 MoU's were exchanged in the programme.
Following MoUs were exchanged:
🔸Tadoba-Andhari Tiger Conservation Foundation (TATRCF) and Airbnb India Pvt. Ltd - To promote community-based tourism around Tadoba-Andhari Tiger Reserve and to provide digital training, onboarding, online listing support to homestay owners and improve local livelihoods through sustainable tourism.
🔸Navegaon–Nagzira Tiger Reserve (NNTR) and Tata Motors Foundation (TMF) - To implement the Integrated Village Development Programme (IVDP 2.0) in villages located within the buffer and eco-sensitive zones and to promote sustainable rural development through livelihood enhancement, natural resource management, health, education and community empowerment.
🔸Aaroha Group, Mahindra Holidays and Resorts India Limited and the Maharashtra Forest Department - To promote eco-tourism, luxury hospitality and destination development across Maharashtra
🔸Tadoba-Andhari Tiger Conservation Foundation (TATRCF) and National Centre for Biological Sciences (NCBS), Bengaluru - To strengthen collaboration in wildlife conservation, biodiversity research, ecosystem restoration and climate change studies in Tadoba-Andhari Tiger Reserve.
🔸Habitats Trust. Delhi and Melghat Tiger Reserve, Maharashtra - To implement a science-based meadow restoration and management programme.
🔸Sahyadri Tiger Reserve and Sahyadri Widile Foundation - To strengthen wildlife conservation through joint efforts in scientific research, biodiversity monitoring, habitat restoration, wildlife protection, human-wildlife conflict mitigation, eco-tourism and community participation.
🔸Navegaon–Nagzira Tiger Reserve (NNTR) and Wildlife Trust of India (WTI) - To strengthen wildlife conservation in Maharashtra and to focus on wildlife crime prevention, mitigation of linear infrastructure impacts, human-wildlife coexistence, wildlife surveys, research, capacity building and public awareness
🔸Navegaon–Nagzira Tiger Reserve (NNTR) and Wild-CER -To establish and operate a One Health Centre and to strengthen wildlife conservation, public health, disease surveillance, zoonotic disease prevention, vaccination programmes and community awareness
🔸Navegaon–Nagzira Tiger Reserve (NNTR) and Satpuda Foundation - To strengthen wildlife conservation through technology-based monitoring. The project includes deployment of 150 GSM-enabled camera traps and a drone for wildlife monitoring, biodiversity documentation, corridor assessment, and human-wildlife conflict mitigation
🔸IRCTC and the Government of Maharashtra (Forest Department) - To promote sustainable wildlife tourism through integrated tour packages, safari reservations and ecotourism initiatives across Maharashtra's protected areas and to enhance visitor experiences while supporting wildlife conservation and local community livelihoods
🔸BAIF Institute and Government of Maharashtra (Forest Department) - To implement the Jal Samruddhi Project in selected villages of Parseoni Taluka, Nagpur, with support from HDFC Bank's Parivartan CSR initiative and to focus on sustainable agriculture, water conservation, natural resource management, wildlife-friendly farming, reducing crop losses caused by wildlife and strengthening rural livelihoods through technical support, farmer training and community participation.
Minister Ganesh Naik, MoS Dr. Pankaj Bhoyar, MoS Adv. Ashish Jaiswal, MLA Sumit Wankhede, Representatives from Bhutan, Cambodia, Bangladesh and other dignitaries were also present.
🤝मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज नागपूर येथे ‘आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन 2026’ निमित्त आयोजित कार्यक्रमात 3 सामंजस्य करार (MoU) करण्यात आले. कार्यक्रमात विविध संस्थांदरम्यान एकूण 11 सामंजस्य करारांची देवाणघेवाण करण्यात आली.
खालीलप्रमाणे सामंजस्य करार करण्यात आले
🔸ताडोबा-अंधारी व्याघ्र संवर्धन प्रतिष्ठान (TATRCF) आणि Airbnb India Pvt. Ltd. - होमस्टे मालकांना डिजिटल प्रशिक्षण, ऑनबोर्डिंग आणि ऑनलाइन लिस्टिंगसाठी सहाय्य दिले जाणार. तसेच शाश्वत पर्यटनाच्या माध्यमातून स्थानिकांच्या उपजीविकेला चालना मिळेल.
🔸नवेगाव–नागझिरा व्याघ्र प्रकल्प (NNTR) आणि टाटा मोटर्स फाउंडेशन (TMF) - बफर व पर्यावरण-संवेदनशील क्षेत्रातील गावांमध्ये एकात्मिक ग्रामविकास कार्यक्रम (IVDP 2.0) राबविणे. उपजीविका विकास, नैसर्गिक संसाधन व्यवस्थापन, आरोग्य, शिक्षण आणि समुदाय सक्षमीकरणाद्वारे शाश्वत ग्रामीण विकासाला चालना देणे.
🔸आरोहा ग्रुप, महिंद्रा हॉलिडेज अँड रिसॉर्टस् इंडिया लिमिटेड आणि महाराष्ट्र शासन (वन विभाग) - महाराष्ट्रात पर्यावरणपूरक पर्यटन, लक्झरी हॉस्पिटॅलिटी आणि पर्यटनस्थळांचा विकास करणे.
🔸ताडोबा-अंधारी व्याघ्र संवर्धन प्रतिष्ठान (TATRCF) आणि नॅशनल सेंटर फॉर बायोलॉजिकल सायन्सेस (NCBS), बंगळुरु - ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात वन्यजीव संवर्धन, जैवविविधता संशोधन, परिसंस्था पुनर्स्थापना आणि हवामान बदल अभ्यास क्षेत्रात परस्पर सहकार्य बळकट करणे.
🔸द हॅबिटॅट्स ट्रस्ट (THT), दिल्ली आणि मेळघाट व्याघ्र प्रकल्प, महाराष्ट्र - वैज्ञानिक पद्धतीने कुरणांचे पुनर्स्थापन आणि व्यवस्थापन करणे. गवताळ भागातील अधिवासाची गुणवत्ता सुधारून तृणभक्षी वन्यप्राण्यांची संख्या वाढविण्यासह दीर्घकालीन व्याघ्र संवर्धनाला बळकटी देणे.
🔸सह्याद्री व्याघ्र प्रकल्प आणि सह्याद्री वाइल्डलाइफ फाउंडेशन - वैज्ञानिक संशोधन, जैवविविधता निरीक्षण, अधिवास सुधारणा, वन्यजीव संरक्षण, मानव-वन्यजीव संघर्ष कमी करणे, पर्यावरणपूरक पर्यटन आणि लोकसहभागाच्या माध्यमातून वन व्यवस्थापनाला चालना देणे.
🔸नवेगाव–नागझिरा व्याघ्र प्रकल्प (NNTR) आणि वाइल्डलाइफ ट्रस्ट ऑफ इंडिया (WTI) - महाराष्ट्रातील वन्यजीव संवर्धन अधिक बळकट करण्यासह वन्यजीव गुन्हे प्रतिबंध, रस्ते व रेल्वेसारख्या रेखीय पायाभूत सुविधांमुळे होणारे परिणाम कमी करणे, मानव-वन्यजीव सहअस्तित्व, वन्यजीव सर्वेक्षण, संशोधन, क्षमता विकास आणि जनजागृती यावर भर दिला जाईल.
🔸नवेगाव–नागझिरा व्याघ्र प्रकल्प (NNTR) आणि Wild-CER - 'वन हेल्थ सेंटर'ची स्थापना व संचालन करण्यासह. वन्यजीव संवर्धन, सार्वजनिक आरोग्य, रोगनियंत्रण, प्राणीजन्य (Zoonotic) रोग प्रतिबंध, लसीकरण कार्यक्रम आणि जनजागृतीला बळकटी दिली जाईल.
🔸नवेगाव–नागझिरा व्याघ्र प्रकल्प (NNTR) आणि सातपुडा फाउंडेशन - तंत्रज्ञानाधारित वन्यजीव निरीक्षणाद्वारे व्याघ्र संवर्धन अधिक बळकट केले जाईल. याअंतर्गत वन्यजीव निरीक्षण, जैवविविधतेचे दस्तऐवजीकरण, वन्यजीव मार्गिका (Corridors) मूल्यांकन आणि मानव-वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी 150 GSM-सक्षम कॅमेरा ट्रॅप्स आणि ड्रोनचा वापर केला जाईल.
🔸IRCTC आणि महाराष्ट्र शासन (वन विभाग) - एकात्मिक पर्यटन पॅकेजेस, सफारी आरक्षण आणि पर्यावरणपूरक पर्यटन उपक्रमांद्वारे महाराष्ट्रातील संरक्षित क्षेत्रांमध्ये शाश्वत वन्यजीव पर्यटनाला चालना दिली जाईल.
🔸बीएआयएफ (BAIF) संस्था आणि महाराष्ट्र शासन (वन विभाग) - HDFC बँकेच्या ‘परिवर्तन’ या CSR उपक्रमाच्या सहकार्याने नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी तालुक्यातील निवडक गावांमध्ये ‘जल समृद्धी’ प्रकल्पाची अंमलबजावणी, शाश्वत शेती, जलसंधारण, नैसर्गिक संसाधन व्यवस्थापन, वन्यजीवपूरक शेती, वन्यप्राण्यांमुळे होणारे पीक नुकसान कमी करणे तसेच तांत्रिक सहाय्य, शेतकरी प्रशिक्षण आणि लोकसहभागाच्या माध्यमातून ग्रामीण उपजीविका अधिक सक्षम केली जाईल.
यावेळी मंत्री गणेश नाईक, राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, आमदार सुमित वानखेडे, भूतान, कंबोडिया आणि बांगलादेश येथील प्रतिनिधी व इतर मान्यवर उपस्थित होते.
@Dev_Fadnavis @NaikSpeaks @DRPANKAJBHOYAR @Ashishjaisw3Adv @Sumitwankhede86 @Airbnb_in @TataMotors @wti_org_india @IRCTCofficial
#Maharashtra #DevendraFadnavis #InternationalTigerDay
Maha Forest Official retweeted
आदरणीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांनी आज नागपूर येथे 'आंतर्राष्ट्रीय व्याघ्र दिन 2026' निमित्त आयोजित कार्यक्रमात वन्यजीव अभ्यासक ए. जे. टी. जॉनसिंह आणि पी. ओ. नामीर लिखित 'Mammals of India' तसेच किशोर रिठे लिखित 'जन जंगल' या पुस्तकांचे प्रकाशन केले.
वन्यजीव संवर्धन, जैवविविधतेचे संरक्षण आणि पर्यावरणाबाबत जनजागृती करण्यासाठी अशा संशोधनाधारित साहित्याची मोठी भूमिका आहे. निसर्ग आणि वन्यजीवांविषयी समाजात संवेदनशीलता निर्माण करण्यासाठी हा उपक्रम निश्चितच प्रेरणादायी ठरेल.
#जागतिकव्याघ्रदिन2026
#देवेंद्रफडणवीस
#नागपूर
#वन्यजीवसाहित्य
#MammalsOfIndia
#JanJangal
#InternationalTigerDay2026
@Dev_Fadnavis
@BJP4Maharashtra
Maha Forest Official retweeted
आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते आज नागपूर येथे 'आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन 2026' निमित्त मार्व्हल कंपनीने विकसित केलेल्या एआय आधारित मानव-वन्यजीव निरीक्षण प्रणालीचे (AI Based Human-Wildlife Monitoring Platform) उद्घाटन करण्यात आले.
ही अत्याधुनिक कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित प्रणाली मानव आणि वन्यजीवांच्या हालचालींवर प्रभावीपणे लक्ष ठेवून संभाव्य मानव-वन्यजीव संघर्ष टाळण्यास, वन्यजीव संरक्षण अधिक सक्षम करण्यास आणि वन व्यवस्थापनात आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यास महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
तंत्रज्ञानाच्या बळावर वन्यजीव संवर्धन अधिक प्रभावी करत, सुरक्षित आणि शाश्वत पर्यावरणाच्या दिशेने महाराष्ट्राने आणखी एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.
-------
Hon' Chief Minister Shri Devendra Fadnavis ji today inaugurated an AI-Based Human-Wildlife Monitoring Platform developed by MARVEL company during a special program organized in Nagpur on the occasion of 'International Tiger Day 2026'.
This cutting-edge Artificial Intelligence (AI) based system will effectively monitor human and wildlife movements, playing a crucial role in preventing potential human-wildlife conflicts, strengthening wildlife protection and ensuring the efficient use of modern technology in forest management.
By leveraging technology to make wildlife conservation more effective, Maharashtra has taken yet another significant step towards a safer and sustainable environment.
#AIForConservation
#TigerAlertSystem
#MARVEL_AI
#WildlifeTechnology
#SmartForestry
#आंतरराष्ट्रीयव्याघ्रदिन2026
#देवेंद्रफडणवीस
#नागपूर
@Dev_Fadnavis
@BJP4Maharashtra
Maha Forest Official retweeted
महाराष्ट्र राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज नागपूर येथे ‘आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन 2026’ निमित्त आयोजित कार्यक्रमात 3 सामंजस्य करार (MoU) करण्यात आले. कार्यक्रमात विविध संस्थांदरम्यान एकूण 11 सामंजस्य करारांची देवाणघेवाण करण्यात आली.
खालीलप्रमाणे सामंजस्य करार करण्यात आले,
- ताडोबा-अंधारी व्याघ्र संवर्धन प्रतिष्ठान (TATRCF) आणि Airbnb India Pvt. Ltd. - होमस्टे मालकांना डिजिटल प्रशिक्षण, ऑनबोर्डिंग आणि ऑनलाइन लिस्टिंगसाठी सहाय्य दिले जाणार.
- नवेगाव–नागझिरा व्याघ्र प्रकल्प (NNTR) आणि टाटा मोटर्स फाउंडेशन (TMF) - बफर व पर्यावरण-संवेदनशील क्षेत्रातील गावांमध्ये एकात्मिक ग्रामविकास कार्यक्रम (IVDP 2.0) राबविणे. उपजीविका विकास, नैसर्गिक संसाधन व्यवस्थापन, आरोग्य, शिक्षण आणि समुदाय सक्षमीकरणाद्वारे शाश्वत ग्रामीण विकासाला चालना देणे.
- आरोहा ग्रुप, महिंद्रा हॉलिडेज अँड रिसॉर्टस् इंडिया लिमिटेड आणि महाराष्ट्र शासन (वन विभाग) - महाराष्ट्रात पर्यावरणपूरक पर्यटन, लक्झरी हॉस्पिटॅलिटी आणि पर्यटनस्थळांचा विकास करणे.
- ताडोबा-अंधारी व्याघ्र संवर्धन प्रतिष्ठान (TATRCF) आणि नॅशनल सेंटर फॉर बायोलॉजिकल सायन्सेस (NCBS), बंगळुरु - ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात वन्यजीव संवर्धन, जैवविविधता संशोधन, परिसंस्था पुनर्स्थापना आणि हवामान बदल अभ्यास क्षेत्रात परस्पर सहकार्य बळकट करणे.
- द हॅबिटॅट्स ट्रस्ट (THT), दिल्ली आणि मेळघाट व्याघ्र प्रकल्प, महाराष्ट्र - वैज्ञानिक पद्धतीने कुरणांचे पुनर्स्थापन आणि व्यवस्थापन करणे. गवताळ भागातील अधिवासाची गुणवत्ता सुधारून तृणभक्षी वन्यप्राण्यांची संख्या वाढविण्यासह दीर्घकालीन व्याघ्र संवर्धनाला बळकटी देणे.
- सह्याद्री व्याघ्र प्रकल्प आणि सह्याद्री वाइल्डलाइफ फाउंडेशन - वैज्ञानिक संशोधन, जैवविविधता निरीक्षण, अधिवास सुधारणा, वन्यजीव संरक्षण, मानव-वन्यजीव संघर्ष कमी करणे, पर्यावरणपूरक पर्यटन आणि लोकसहभागाच्या माध्यमातून वन व्यवस्थापनाला चालना देणे.
- नवेगाव–नागझिरा व्याघ्र प्रकल्प (NNTR) आणि वाइल्डलाइफ ट्रस्ट ऑफ इंडिया (WTI) - महाराष्ट्रातील वन्यजीव संवर्धन अधिक बळकट करण्यासह वन्यजीव गुन्हे प्रतिबंध, रस्ते व रेल्वेसारख्या रेखीय पायाभूत सुविधांमुळे होणारे परिणाम कमी करणे, मानव-वन्यजीव सहअस्तित्व, वन्यजीव सर्वेक्षण, संशोधन, क्षमता विकास आणि जनजागृती यावर भर दिला जाईल.
- नवेगाव–नागझिरा व्याघ्र प्रकल्प (NNTR) आणि Wild-CER - 'वन हेल्थ सेंटर'ची स्थापना व संचालन करण्यासह. वन्यजीव संवर्धन, सार्वजनिक आरोग्य, रोगनियंत्रण, प्राणीजन्य (Zoonotic) रोग प्रतिबंध, लसीकरण कार्यक्रम आणि जनजागृतीला बळकटी दिली जाईल.
- नवेगाव–नागझिरा व्याघ्र प्रकल्प (NNTR) आणि सातपुडा फाउंडेशन - तंत्रज्ञानाधारित वन्यजीव निरीक्षणाद्वारे व्याघ्र संवर्धन अधिक बळकट केले जाईल. याअंतर्गत वन्यजीव निरीक्षण, जैवविविधतेचे दस्तऐवजीकरण, वन्यजीव मार्गिका (Corridors) मूल्यांकन आणि मानव-वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी 150 GSM-सक्षम कॅमेरा ट्रॅप्स आणि ड्रोनचा वापर केला जाईल.
- IRCTC आणि महाराष्ट्र शासन (वन विभाग) - एकात्मिक पर्यटन पॅकेजेस, सफारी आरक्षण आणि पर्यावरणपूरक पर्यटन उपक्रमांद्वारे महाराष्ट्रातील संरक्षित क्षेत्रांमध्ये शाश्वत वन्यजीव पर्यटनाला चालना दिली जाईल.
- बीएआयएफ (BAIF) संस्था आणि महाराष्ट्र शासन (वन विभाग) - HDFC बँकेच्या ‘परिवर्तन’ या CSR उपक्रमाच्या सहकार्याने नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी तालुक्यातील निवडक गावांमध्ये ‘जल समृद्धी’ प्रकल्पाची अंमलबजावणी, शाश्वत शेती, जलसंधारण, नैसर्गिक संसाधन व्यवस्थापन, वन्यजीवपूरक शेती, वन्यप्राण्यांमुळे होणारे पीक नुकसान कमी करणे तसेच तांत्रिक सहाय्य, शेतकरी प्रशिक्षण आणि लोकसहभागाच्या माध्यमातून ग्रामीण उपजीविका अधिक सक्षम केली जाईल.
#आंतरराष्ट्रीयवाघदिन
#वाघसंवर्धन
#DevendraFadnavis
#InternationalTigerDay
#EcoTourism
#MaharashtraForests
@Dev_Fadnavis
Maha Forest Official retweeted
आज मंत्रालय येथे आयोजित विशेष बैठकीत 'एक पेड माँ के नाम' या अभियानांतर्गत मुंबई पोर्ट ट्रस्ट, सह्याद्री देवराई फाउंडेशन आणि वन विभाग यांच्यात त्रिपक्षीय करारनामा करून अवनत (डिग्रेडेड) वनक्षेत्राचे वनीकरण करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
या उपक्रमाच्या माध्यमातून निसर्ग संवर्धन, जैवविविधतेचे संरक्षण आणि हरित महाराष्ट्र घडविण्याच्या दिशेने प्रभावी पावले उचलली जाणार आहेत. शासन, सामाजिक संस्था आणि विविध यंत्रणांच्या समन्वयातून अधिकाधिक वृक्षलागवड करून पर्यावरणाचा समतोल राखण्याचा आपला संकल्प अधिक बळकट होईल.
या बैठकीस सह्याद्री देवराई फाउंडेशनचे संस्थापक-अध्यक्ष व ख्यातनाम अभिनेते सयाजी शिंदे, वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी तसेच मुंबई पोर्ट ट्रस्टचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
------
A special meeting was held at Mantralaya to review the 'Ek Ped Maa Ke Naam' campaign, where a tripartite MoU was signed between the Mumbai Port Trust, Sahyadri Devarai Foundation and the Forest Department for the afforestation of degraded forest land.
The initiative aims to strengthen environment conservation, protect biodiversity and promote large-scale tree plantation through collaborative efforts.
The meeting was attended by Shri Sayaji Shinde, Founder-President of the Sahyadri Devarai Foundation along with senior officials from the Forest Department and Mumbai Port Trust.
#EkPedMaaKeNaam
#SahyadriDevaraiFoundation
#एक_पेड_माँ_के_नाम
#वनविभाग
#हरितमहाराष्ट्र
Maha Forest Official retweeted
महाराष्ट्र राज्यातील कांदळवन क्षेत्रांतील संवेदनशील भागांमध्ये मा. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्याबाबत मंत्रालयात आज महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली.
कांदळवन ही राज्याची अमूल्य नैसर्गिक संपत्ती असून जैवविविधतेचे संरक्षण, किनारपट्टीची सुरक्षितता आणि पर्यावरणीय संतुलन राखण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका आहे. संवेदनशील भागांमध्ये अत्याधुनिक सीसीटीव्ही यंत्रणा उभारून बेकायदेशीर कृत्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवणे, सतत देखरेख करणे आणि कांदळवनांचे अधिक सक्षम संरक्षण करणे हा या बैठकीचा प्रमुख उद्देश होता.
पर्यावरण संरक्षणासाठी तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करत राज्यातील कांदळवनांचे संवर्धन अधिक बळकट करण्यासाठी वन विभाग कटिबद्ध आहे.
#कांदळवन
#पर्यावरण_संवर्धन
#हरितमहाराष्ट्र
#Biodiversity
#CoastalProtection

























































