RD PATIL : राजेश दातखिळे पाटील retweeted
दिवाळी निमित्त Zee मराठीने बनवलेला हा व्हिडिओ बरंच काही सांगून जातो.
आपली परंपरा, आपली शान… आपली संस्कृती, आपली ओळख आहे.आपली भाषा, आपले सण, आपले उत्सव, आपल्या रूढी-परंपरा आणि आपला सांस्कृतिक वारसा जपण्याची जबाबदारी सर्वप्रथम आपलीच आहे. त्यासाठी आपल्या मुलांना प्रोत्साहन द्या, त्यांना आपल्या संस्कृतीची ओळख करून द्या आणि आपल्या मातीशी जोडून ठेवा.
महाराष्ट्र ही आपली भूमी आहे. आपण या भूमीत बाहेरून आलेले नाही, तर या भूमीचेच भूमिपुत्र आहोत. म्हणूनच आपल्या संस्कृतीचा संकोच नको, तर अभिमान हवा ! परप्रांतीय बांधवांनाही आपल्या महाराष्ट्राची भाषा, संस्कृती, परंपरा आणि इतिहास यांची ओळख व जाण करून देणे हे आपले कर्तव्य आहे.कारण संस्कृती जपली तरच अस्मिता टिकेल आणि अस्मिता टिकली तरच आपली ओळख कायम राहील !
जय महाराष्ट्र ! जय शिवराय !
RD PATIL : राजेश दातखिळे पाटील retweeted
एका उद्योगसमूहाच्या फायद्यासाठी हे सरकार कसं काम करतंय यावर राजसाहेब ठाकरे दीर्घकाळ मांडणी करत आहेत. मुंबईचं सध्याचं विमानतळ टप्प्याटप्प्याने हलवून हळूच एक दिवस ती जमीन कशी गिळंकृत केली जाईल हे मी.राजसाहेबांनी वारंवार ठासून सांगितलं. त्याची प्रचिती मुंबई विमानतळाच्या T १ चा पुनर्विकास करायचा म्हणून विमानं नवी मुंबईत हलवण्याचा निर्णय लादण्याचा प्रयत्न सुरु झाला आणि याला आंतरराष्ट्रीय विमान कंपन्यांचा विरोध असून देखील तो रेटण्याचा जो प्रयत्न सुरू आहे त्यातून याची प्रचिती दिसते.
#Airport #Mumbai #MNSAdhikrut
सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे मनसे अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा💐
@mnsdombivLive
@mnsKalyanShahar @MNSKalyanDcity
@AmhiDombivlikar
@mnsadhikrut
1
22
RD PATIL : राजेश दातखिळे पाटील retweeted
सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा हा आजचा १९ वा दिवस. त्यांच्या तब्येतीच्या ज्या बातम्या ऐकू येत आहेत किंवा जी दृश्य खासकरून सोशल मीडियावर दिसत आहेत ती निश्चितच काळजीत टाकणारी आहेत. हे म्हणायला प्रचंड वाईट वाटतंय की सरकारने सोनम वांगचुक यांचा आणि पर्यायाने या देशातील आंदोलनाची म्हणून एक जागा आहे तिचा बळीच घ्यायचा ठरवला आहे. हे सरकार जिथे श्रीरामाच्या तिजोरीला लुटलं जात असताना शांतपणे बघू शकते तिथे त्यांना नागरिकांच्या आंदोलनांने काय फरक पडणार ?
ज्या संस्थांनी निष्पक्ष वागायला हवं त्यांनाच स्वतःच्या ताब्यात घेतलं आहे. निवडणुका हव्या तशा मॅनेज करून घेतल्या जात आहेत. त्यासाठी अतिप्रचंड पैसा खर्च केला जात आहे. तो कुठून आला असा प्रश्न बहुसंख्य माध्यमं विचारत नाहीयेत. उलट हीच बहुसंख्य माध्यमं त्यांच्या अदृश्य बॉसच्या सांगण्यावरून सत्ताधाऱ्यांच्या पक्षातील स्वकीयांची आणि विरोधकांना कसं बदनाम करता येईल यांत व्यस्त आहेत. आणि जी माध्यमं बोलत आहेत त्यांना आणि त्यांच्या मालकांच्या डोक्यावर एक टांगती तलवार फिरत आहे. त्यामुळे एका चांगल्या मुद्द्यासाठी उभ्या केलेल्या आंदोलनाला चिरडणं, आंदोलनकर्त्याच्या शरीराचे हाल करणं हे सरकारला सहज सोपं आहे.
सोनम वांगचुक यांच्याबद्दल एकेकाळी भारतीय जनता पक्षाला आस्था होती. अर्थात भारतीय जनता पक्षाचं एक बरं असतं की त्यांच्या सोयीचा असेपर्यंत त्यांना तो माणूस प्रिय असतो. सोनम वांगचुक यांना २०१८ साली री-इन्व्हेस्ट कॉन्फरन्सला बोलावून त्यांच्याकडून अपारंपरिक ऊर्जा इत्यादींबद्दल ऐकून घेऊन त्यांचं कौतुक पण केलं होतं. अर्थात तेंव्हा आम्ही किती अपारंपरिक उर्जेला महत्व देतो हे दाखवायचं होतं म्हणून सोनम वांगचुक चालले. पुढे लडाख हा स्वतंत्र प्रदेश घोषित झाल्यावर वांगचुक यांना पण भाजपचं कौतुक वाटलं. पण पुढे वांगचुक यांच्या लक्षात आलं की यांचे हेतू अजिबात स्वच्छ नाहीत. लडाखला स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळायला हवा, लडाखमध्ये दोन लोकसभा मतदारसंघ हवेत, तिथल्या लोकांच्या जमिनीवरचा हक्क राखला गेला पाहिजे या मागण्या वांगचुक यांनी केल्या, त्यासाठी उपोषण, आंदोलनं केली पण सरकारने काहीही केलं नाही. त्यांना आश्वस्त केलं आणि पुढे कृती काहीच नाही. कारण हेतू जे दाखवले जातात तसे कधीच नसतात.
आज वांगचुक यांची मागणी नीट परीक्षेचा झालेला गोंधळ आणि तो ज्या व्यक्तीमुळे झाला त्या मंत्र्याची हकालपट्टी करा आणि या परीक्षांमध्ये पारदर्शकता आणा हीच आहे. यात काहीच वावगं नाही. भाजपच्या सत्तेच्या काळात सर्वत्र परीक्षांमध्ये घोळ होत आलेत. मध्यप्रदेशातील व्यापम घोटाळ्यापासून ते नीटच्या परीक्षांचे पेपर्स फुटणे ते अगदी आत्ता शिक्षकांच्या परीक्षांचे पेपर्स फुटण्यापर्यंत. हे सगळं यांच्या काळात का होतं आणि ते झाल्यावर हे इतके निर्ढावल्यासारखे का वागतात याचं उत्तर सोपं आहे. ते म्हणजे हाताशी सगळ्या यंत्रणांना धरून आलेली अमर्याद सत्ता.
निवडणुकांत अनेक उद्योग करून ओढून आणलेलं यश हे लोकांच्या मूकसंमतीचं द्योतक म्हणून दाखवायचं आणि आम्हाला कोणी प्रश्न विचारायचे नाहीत हा एक वेगळाच माज सध्या भाजपला आला आहे. आणि मी भाजप अशा अर्थाने म्हणतोय की त्यांच्या घटक पक्षांना स्वतंत्र अस्तित्वच नाहीये, त्यांना दिल्लीतूनच चालवलं जात आहे.
माझी पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांना विनंती आहे की जरा या प्रश्नात लक्ष घाला. NEET परीक्षांचा विषय आणि त्यातला गोंधळ हा काही सोपा विषय नाही. या परीक्षेतील घोळाने लाखो विद्यार्थ्यांच्या आयुष्याची वाट लागली आहे. आणि हे आत्ताच घडलं आहे असं नाही याच्या आधी पण असे प्रकार घडले आहेत. *आणि हा विषय राजकीय नाहीये. हा विषय सामाजिक आहे. NEET परीक्षा देणारे लाखो विद्यार्थी, त्यांचे पालक हे ज्या त्रासातून गेले, जो मनस्ताप झाला त्याच्याशी संबंधित हा विषय आहे. आणि यात भारतीय जनता पक्षाचे समर्थक, त्यांचे पदाधिकारी, त्यांचे कार्यकर्ते या सगळ्यांनाच त्रास झालेला असणार. त्यामुळे आंदोलनाकडे राजकीय नजरेतून केंद्रातील सत्ताधारी पाहत आहेत, तेच मुळात त्यांच्या लघुदृष्टीचं लक्षण आहे*.
RD PATIL : राजेश दातखिळे पाटील retweeted
“राज्य छोटं का असेना, पण स्वतःचं असावं, तरच जग तुमचा आदर करतं”
— छत्रपती श्री शिवाजी महाराज
#मराठीअस्मिता
RD PATIL : राजेश दातखिळे पाटील retweeted
आमचे श्रद्धास्थान,आमचे दैवत माननीय श्री.राजसाहेब ठाकरे यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा ! 🌹
#श्री_राजसाहेब_ठाकरे #वाढदिवस
हीच घसरली असावी, पाचवीला पूजलेल्या मध्य रेल्वेमार्गावरील वाहतूक सोमवारी सकाळी विस्कळीत.
@drmmumbaicr @RailwaySeva @Central_Railway
CSMT-Kalyan ही लोकल डोंबिवलीत येतच नाही, कृपया लक्ष घाला🚊
रोज लोकांचा खोळंबा होतोय🙏
@ashwinivaishnav
@dadarmatters @DombivliNews
@maharailpass @drmmumbaicr @Central_Railway @KalyanForum @RailMinIndia
#MumbaiLocalTrainAccident #MumbaiLocal #Centralline
#mumbailocalstatus
18
RD PATIL : राजेश दातखिळे पाटील retweeted
अपंगांसाठी राखीव डब्यात अनधिकृत प्रवास करु नका.
@Central_Railway @YatriRailways
Respect sir,
Pls action🙏
@Tukaram_IndIAS @AshwiniVaishnaw
रेल्वे प्रशासनाला विनंती आहे की प्रत्येक दिव्यांजन डब्ब्याजवळ RPF उभे करा. लोकांचा धक्का लागून अपंगांचा तोल जाऊन पडत आहेत प्रवासी🙏
@AshwiniVaishnaw @RailwaySeva @Central_Railway @RailMinIndia
@maharailpass
#mumbailocaltrainaccident
27
रेल्वे प्रशासनाला विनंती आहे की प्रत्येक दिव्यांजन डब्ब्याजवळ RPF उभे करा. लोकांचा धक्का लागून अपंगांचा तोल जाऊन पडत आहेत प्रवासी🙏
@AshwiniVaishnaw @RailwaySeva @Central_Railway @RailMinIndia
@maharailpass
#mumbailocaltrainaccident
आदरणीय दादांच्या निधनाची बातमी अत्यंत वेदनादायक आहे. त्यांच्या अशा जाण्याने जुन्नर, पुणे जिल्ह्यासह महाराष्ट्र व राष्ट्रवादी परिवाराची कधीही न भरुन येणारी हानी झाली आहे.
#maharashtra #DCM #FinanceMinister #MaharashtraState #DeputyChiefMinister #ajitdadapawar #ncpmaharashtra #NCP
29
CSMT-Kalyan ही लोकल डोंबिवलीत येतच नाही, कृपया लक्ष घाला🚊
रोज लोकांचा खोळंबा होतोय🙏
@ashwinivaishnav
@dadarmatters @DombivliNews
@maharailpass @drmmumbaicr @Central_Railway @KalyanForum @RailMinIndia
#MumbaiLocalTrainAccident #MumbaiLocal #Centralline
#mumbailocalstatus
















