दीपावलीचा हा मंगलमय सण प्रत्येकाच्या जीवनात आनंद, आरोग्य, सुख आणि समृद्धी घेऊन येवो. लक्ष्मीमातेच्या कृपेने प्रत्येक घरात धनधान्याची भरभराट आणि नात्यांमध्ये प्रेमाचा गोडवा कायम राहो, हीच प्रार्थना.
लक्ष्मीपूजन आणि दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा! 🪔
#शुभ_दीपावली #HappyDiwali
सत्संगाचे आयोजन करण्यात आले आहे.
दिनांक : मंगळवार, १० नोव्हेंबर २०२६
वेळ : सकाळी ११ ते दुपारी १ वाजेपर्यंत
स्थळ : शिवपुरी तांडा, पहूर ईजारा, ता. कळंब, जि. यवतमाळ. [2/2]
प्रथम पुण्यस्मरण व पुतळा अनावरण!
मातोश्री स्व. प्रमिलादेवी दुलीचंद राठोड यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त विनम्र अभिवादन व भावपूर्ण आदरांजली!
याप्रसंगी मातोश्रींच्या पुतळ्याचे अनावरण तसेच परमपूज्य आनंद चैतन्यजी महाराज यांच्या अमृतवाणीतून मातोश्रींना समर्पित विशेष [1/2]
त्यांच्या घामाचा प्रत्येक थेंब त्यांच्या कष्टांची कहाणी सांगतो. या कष्टकरी हातांना मनापासून सलाम! [2/2]
#उसतोड_मजूर #ऊसतोडकामगार #diwali #maharashtra
दुसऱ्यांच्या घरात गोडवा निर्माण करणाऱ्या हातांसोबत दिवाळीचा आनंद साजरा केला...
ऊसतोड कामगार बांधवांना दिवाळीचा शिधा देत त्यांच्यासोबत आनंदाचे क्षण घालवले. त्यांच्या कष्टाची जाणीव करून घेण्यासाठी स्वतः हातात कोयता घेऊन ऊसतोड केली आणि त्यांच्याशी मनमोकळा संवाद साधला. [1/2]
समूहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे, कोपरगाव नगराध्यक्ष पराग संधान, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर परजने, सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे संचालक त्र्यंबक सरोदे, विश्वासराव माने, सुधाकर राठोड, शासकीय अधिकारी आणि कामगार बांधव उपस्थित होते. [4/4]
#maharashtrafarmers #ऊसतोड_मजूर
यामध्ये सुरक्षेसाठी बूट, हातमोजे तसेच इतर आवश्यक साहित्य कामगारांपर्यंत पोहोचवण्याच्या साठी तातडीने प्रयत्न करावे असे निर्देश दिले.
आपल्या कष्टाने साखर कारखानदारीला बळ देणाऱ्या ऊसतोड कामगार बांधवांना दिवाळीचा शिधा देत दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी संजीवनी उद्योग [3/4]
झाल्यानंतर त्याच्या सुविधा या कामगारांना मिळाल्या की नाही, त्यात काही अडचणी आहेत काय या बाबत त्यांच्याशी चर्चा केली.
तसेच कामगारांच्या आरोग्याची काळजी घेण्यासोबतच त्यांच्या दैनंदिन कामासाठी आवश्यक असणारे साहित्य उपलब्ध करून देण्याचाही महामंडळाचा प्रयत्न आहे. [2/4]
काल अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील सहजानंदनगर येथील सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना, संजीवनी ग्रुप, येथे भेट दिली. यावेळी कारखान्याचे संचालक मंडळ, अधिकारी, शेतकरी बांधव आणि ऊसतोड कामगारांशी संवाद साधला.
ऊसतोड कामगारांचे महामंडळ स्थापन [1/4]
यावेळी आमदार आशुतोष काळे, व्हाईस चेअरमन दिनार कुदळे, संचालक सूर्यभान कोळपे, डॉ. बर्डे, कारखान्याचे एमडी सोमनाथ बोरनारे, अनिल राठोड, सुधाकर राठोड, शासकीय अधिकारी तसेच ऊसतोड कामगार बांधव उपस्थित होते. [4/4]
#ऊसतोडकामगार #ऊसतोड_मजूर #diwali #maharashtra #ahilyanagar
सुविधा, आरोग्य सेवा आणि आवश्यक सुरक्षा साहित्य उपलब्ध करून देण्यात आले असून, कामगारांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले. तसेच कारखाना व्यवस्थापनाने कामगारांच्या निवासाची, पिण्याच्या पाण्याची आणि आरोग्याची योग्य व्यवस्था करावी, अशा सूचनाही दिल्या. [3/4]
महामंडळाकडे नोंदणी होणे आवश्यक असल्याचे सांगितले. त्यांना शासनाच्या विविध योजना आणि सुविधांचा लाभ मिळावा, यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून विशेष नोंदणी मोहीम राबविण्याचे प्रयत्न करण्यात येतील, असेही स्पष्ट केले.
ऊसतोड कामगारांच्या मुलांच्या शिक्षणासाठी वसतिगृहांची [2/4]
काल अहिल्यानगर जिल्ह्यातील कोळपेवाडी येथील कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना लिमिटेड येथे दिवाळीनिमित्त ऊसतोड कामगारांसह इतर कामगार बांधवांना किराणा साहित्याचे वाटप केले. यावेळी कामगार बांधवांसोबत दिवाळीचा आनंद साजरा केला.
यावेळी मार्गदर्शन करताना ऊसतोड कामगारांची [1/4]
या कष्टकरी बांधवांच्या मेहनतीला आणि जिद्दीला मनापासून सलाम करत त्यांना दिवाळीचा शिधा देत सणाच्या शुभेच्छा दिल्या. [4/4]
#ऊसतोड_कामगार #ऊसतोड_मजूर #farmers #maharashtra
असलेल्या विविध उपक्रमांची माहिती त्यांना दिली. तसेच, ऊसतोड कामगारांची महामंडळाकडे नोंदणी होणे अत्यंत आवश्यक असून, त्यांना शासनाच्या विविध योजना आणि सुविधांचा लाभ मिळावा, यासाठी विशेष नोंदणी मोहीम राबविण्याबाबत राज्य सरकार प्रयत्नशील राहील, अशी ग्वाही दिली. [3/4]
गाळणाऱ्या या कष्टकरी बांधवांसोबत काम करताना एक वेगळाच आनंद मिळाला. त्यांच्या अडचणी, प्रश्न आणि अपेक्षा जवळून जाणून घेता आल्या. आजही ऊसतोड कामगार बांधव समाजाच्या मुख्य प्रवाहापासून दूर असल्याची खंत मनाला लागली.
त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी शासनाच्या माध्यमातून सुरू [2/4]
आज कोळपेवाडी, कोपरगाव, अहिल्यानगर येथे शेतात ऊसतोड कामगार बांधवांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी त्यांच्या कामात सहभागी होत स्वतः ऊसतोडीचा अनुभव घेतला आणि त्यांच्या कष्टांची जाणीव जवळून करून घेतली.
रणरणत्या उन्हात आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी घाम [1/4]
धन, आरोग्य आणि समृद्धीचा प्रकाश प्रत्येकाच्या आयुष्यात उजळत राहो. माता लक्ष्मी आणि भगवान धन्वंतरी यांच्या कृपेने प्रत्येक कुटुंबात सुख, समाधान आणि मांगल्य नांदो, हीच मनःपूर्वक सदिच्छा.
धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा! 🙏🪔
#धनत्रयोदशी #Dhantrayodashi #Diwali2026






















































