अडचण भरपूर असेल,
त्रास ही भरपूर असेल...
प्रत्येक पावलाखाली,
नग्न तळव्यांना टोचणारी खडी ही असेल...
प्रत्येकवेळी शरीर बोलेल,
थांब, मागे फिर कशाला त्रास करून घेतोयस,
तुझ्याकडे जेवढं आहे तेवढं खूप आहे,
का स्वतःला मारतोयस...
पण,
स्वतःमध्ये एक जिद्द ठेवा,
यशस्वी होण्याची नशा ठेवा,
आजच्या त्रासात,
भविष्याचं शिखर पहा,
हा त्रासच आयुष्यात उदाहरण बनेल,
जे तू आज सहन करशील,
किती तरी जणांसाठी ताकत बनशील...
जो कोणी व्यक्ती मोडकळून पडेल,
तो तुझी कहाणी वाचेल,
कदाचित तुझी हिंमत पाहून
तो स्वतःत हिंमत भरेल...!!!