ThePawanUpdates (@ThePawanUpdates) header
ThePawanUpdates (@ThePawanUpdates) profile picture

आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि स्थानिक बातम्यांचे ONE STOP JUNCTION. For any querries, suggestions or news you can contact [email protected].

Joined March 2013
Photo by ThePawanUpdates (@ThePawanUpdates)Photo by ThePawanUpdates (@ThePawanUpdates)Photo by ThePawanUpdates (@ThePawanUpdates)Photo by ThePawanUpdates (@ThePawanUpdates)Photo by ThePawanUpdates (@ThePawanUpdates)Photo by ThePawanUpdates (@ThePawanUpdates)Photo by ThePawanUpdates (@ThePawanUpdates)Photo by ThePawanUpdates (@ThePawanUpdates)Photo by ThePawanUpdates (@ThePawanUpdates)Photo by ThePawanUpdates (@ThePawanUpdates)
नाशिक! महापालिकेतील स्वीकृत नगरसेवकांच्या नियुक्तीवरून भाजपमध्ये सुरू असलेली धुसफूस आता चव्हाट्यावर आली आहे. 'स्वीकृत' पदी संधी न मिळाल्याने नाराज असलेले शहराध्यक्ष सुनील केदार यांनी नियुक्त्तीचा अहवाल प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडे पाठविण्यास टाळाटाळ केल्याने प्रदेश
1
1
9
1,186
नेतृत्वाने त्याची गंभीर दखल घेत याच मुद्द्यावरून चव्हाण यांनी केदार यांची कानउघाडणी करत त्यांचा राजीनामा घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. मात्र, पक्षाच्या वरिष्ठ स्तरावरून या वृत्ताला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.
2
144
बोगस शिक्षक भरती प्रकरणात बीड जिल्ह्यात शिक्षण विभागाने मोठी कारवाई केल्याने खळबळ उडाली आहे. येथील प्राथमिक व माध्यमिक विभागाच्या खासगी अनुदानित शाळांमधील 73 शिक्षकांची सेवा थेट समाप्त करण्यात आली आहे. त्यात प्राथमिक विभागातील 7 तर माध्यमिक विभागातील 66 शिक्षकांचा समावेश आहे.
1
2
16
937
राज्यात 2012 पासून शिक्षक भरती बंद असतानाही या शिक्षकांची भरती करण्यात आली. न्यायालयांच्या सूचनांचा सोयीस्कर अर्थ लावून यांना नियुक्ती दिल्या गेल्या. काही ठिकाणी संच मान्यतेच्या दुरुस्तीच्या नावाखाली पदं वाढवण्यात आली आहेत. तर इतर ठिकाणी बनावट विद्यार्थ्यांच्या आधारे
1
1
101
संच मान्यतेचे पद वाढवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. त्यासाठी अन्य बनावट कागदपत्रे वापरले.
1
80
पुण्यातील नारायण पेठ परिसरात स्पर्धा परीक्षांचे क्लासेस चालवणाऱ्या एका संचालकाला लाखो रुपयांची खंडणी मागून धमकावण्यात आले आहे. याप्रकरणी पीडित क्लास चालकाने दिलेल्या तक्रारीवरून माऊली डुचाळ नावाच्या तरुणाविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे
9
826
महाराष्ट्र पोलीस दलातील प्रशासकीय पातळीवर राज्य शासनाच्या गृह विभागाने काल एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्यातील दोन वरिष्ठ भारतीय पोलीस सेवा (IPS) अधिकाऱ्यांना पोलीस महासंचालक (DGP) श्रेणीत पदोन्नती देण्यात आली आहे. यासंदर्भातील अधिकृत शासन आदेश 20 नोव्हेंबर 2026
2
24
2,991
रोजी जारी करण्यात आला असून, याचा लाभ मुंबई आणि ठाणे शहर पोलीस आयुक्तपदी कार्यरत असलेल्या दोन्ही दिग्गज अधिकाऱ्यांना मिळाला आहे. या निर्णयानुसार मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारती आणि ठाण्याचे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांचा आता पोलीस महासंचालक (DGP) श्रेणीमध्ये समावेश झाला आहे.
1
5
394
राज्याच्या मुख्य सचिवपदासाठी नवीन चेहरा दिला जाईल की आधीच्या मुख्य सचिवांना तीन महिन्यांची मुदतवाढ दिली जाईल? सध्या राज्याच्या मुख्य सचिवपदावर राजेश अग्रवाल आहेत. अग्रवाल यांना मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव राज्य सरकारने केंद्राकडे पाठवलेला नाही. त्यात अग्रवाल हे 30 नोव्हेंबर
1
1
32
2,765
रोजी निवृत्त होत आहे. त्यामुळे आता या पदासाठी मनीषा म्हैसकर, संजय सेठी आणि मिलिंद म्हैसकर यांच्या नावाची चर्चा होत आहे.
2
366
ठाणे महापालिकेतील स्थायी समितीसह विविध विषय समित्यांची निवड रखडली होती. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर शुक्रवारी झालेल्या महासभेत स्थायी समितीच्या 16 सदस्यांची अधिकृत घोषणा करण्यात आली. या निवडीत सर्वाधिक सदस्य संख्या असलेल्या शिवसेनेकडून ज्येष्ठ नगरसेवक दिलीप बारटक्के, राजेश मोरे,
1
8
1,548
पवन कदम, बाबाजी पाटील, महेश साळवी, संध्या मोरे, प्रमिला केणी, विक्रांत तांडेल आणि आदेश भगत या नऊ जणांची सदस्यपदी निवड केली. भाजपकडून कमल चौधरी, भरत चव्हाण आणि मृणाल पेंडसे यांना संधी देण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने यासिन कुरेशी व पल्लवी जगताप,
1
196
राष्ट्रवादी काँग्रेसने सुहास देसाई तसेच एमआयएमने शोहेब डोंगरे यांची या समितीच्या सदस्यपदी निवड केली. या सदस्य निवडीत शहराच्या प्रत्येक विभागातील सदस्यांना सामावून घेत सर्वसमावेशक पद्धतीनुसार प्रतिनिधी निवड करण्यात आली आहे.
101
नागपूर शहर पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या नावाचा गैरवापर करत एका व्यक्तीने पुण्यातील महिला डॉक्टर नेहा पेळपकर या महिलेची आर्थिक फसवणूक केली आहे. नेमकं काय घडलं? या व्यक्तीने या महिला डॉक्टरला भीती दाखवली की, आम्ही विश्वास नांगरे पाटलांचे पीए आहे, तुमच्या आधार
1
48
5,222
चौधरी बोलतोय आणि विश्वास नांगरे पाटील सरांचा पीए आहे. त्यानंतर परत एका अनोळखी नंबरवरून फोन आला. हा मोबाईल नंबर पहिला नंबर नव्हता. या फोनवर असलेला व्यक्ती म्हणाला की, मुंबई क्राईम ब्रँचचे वरिष्ठ अधिकारी आहे. ते म्हणाले की, तुमचे आधार कार्ड एका संशयास्पद नंबरला लिंक आहे.
1
3
579
यातून तुम्ही अवैध जाहिरातबाजी व अश्लील मेसेज पाठवून पैसे कमवत आहात. तसेच मनी लाँड्रिंग व टेरर फंडिंगच्या गुन्ह्यात समोर आलं आहे. आता जर तुम्हाला अटक टाळायची असेल तर आम्ही सांगू त्या बँक अकाऊंटमध्ये 3 लाख रुपये ट्रान्सफर करा. अटकेच्या भीतीने महिलेने 3 लाख रुपये ट्रान्सफर केले.
4
512
राज्यातील 4 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या... 1. अशोक वामन काकडे यांची दिव्यांग कल्याण विभागाच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली. सध्या ते महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक पदावर कार्यरत आहे. 2. प्रवीण कुंडलिक पुरी : यांची महाराष्ट्र राज्य बाल हक्क
1
5
76
15,106
संरक्षण आयोगाच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली. 3. गुलाब राजाराम खरात : यांची महाराष्ट्र राज्य वित्तीय महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती करण्यात आली. 4. मकरंद प्रल्हाद देशमुख :  यांची मुंबईतील राज्यकर सहआयुक्तपदी बदली करण्यात आली आहे. सध्या ते  मुख्य सचिव
1
2
6
2,511
कार्यालयात सहसचिव पदावर कार्यरत आहेत.
4
2,350