DIST. INFORMATION OFFICE CHHATRAPATI SAMBHAJINAGAR (@InfoCSNagar) header
DIST. INFORMATION OFFICE CHHATRAPATI SAMBHAJINAGAR (@InfoCSNagar) profile picture

Official Twitter Account of District Information Office, @MahaDGIPR, Government of Maharashtra, Chhatrapati Sambhaji Nagar

Chhatrapati Sambhaji Nagar, MH
Joined July 2016
Photo by DIST. INFORMATION OFFICE CHHATRAPATI SAMBHAJINAGAR (@InfoCSNagar)Photo by DIST. INFORMATION OFFICE CHHATRAPATI SAMBHAJINAGAR (@InfoCSNagar)Photo by DIST. INFORMATION OFFICE CHHATRAPATI SAMBHAJINAGAR (@InfoCSNagar)Photo by DIST. INFORMATION OFFICE CHHATRAPATI SAMBHAJINAGAR (@InfoCSNagar)Photo by DIST. INFORMATION OFFICE CHHATRAPATI SAMBHAJINAGAR (@InfoCSNagar)Photo by DIST. INFORMATION OFFICE CHHATRAPATI SAMBHAJINAGAR (@InfoCSNagar)Photo by DIST. INFORMATION OFFICE CHHATRAPATI SAMBHAJINAGAR (@InfoCSNagar)Photo by DIST. INFORMATION OFFICE CHHATRAPATI SAMBHAJINAGAR (@InfoCSNagar)Photo by DIST. INFORMATION OFFICE CHHATRAPATI SAMBHAJINAGAR (@InfoCSNagar)Photo by DIST. INFORMATION OFFICE CHHATRAPATI SAMBHAJINAGAR (@InfoCSNagar)
DIST. INFORMATION OFFICE CHHATRAPATI SAMBHAJINAGAR retweeted
व्हाट्सअप वेबचा वापर करताना घ्यावयाच्या काळजीसंदर्भात #गृह मंत्रालयाने सायबर सुरक्षेबाबत सतर्कतेचा इशारा दिला आहे.
📍नवी दिल्ली शासकीय कार्यालयांमध्ये संगणकावरून व्हॉट्सॲप वेबचा वापर करताना अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी विशेष खबरदारी घ्यावी, असे आवाहन केंद्रीय गृह मंत्रालयाने केले आहे. व्हॉट्सॲप वेबच्या लॉगिन सत्राचा गैरवापर करून वापरकर्त्यांच्या खात्यांमध्ये अनधिकृत प्रवेश मिळविण्याचा धोका भारतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्राच्या (I4C) राष्ट्रीय #सायबर गुन्हे धोका विश्लेषण विभागाने अधोरेखित केला आहे. या पार्श्वभूमीवर #गृह मंत्रालयाने सायबर सुरक्षेबाबत सतर्कतेचा इशारा दिला आहे. व्हॉट्सॲप वेबच्या लॉगिन सत्रावर सायबर गुन्हेगारांनी अनधिकृत ताबा मिळवल्यास संबंधित खात्यातील संदेश वाचणे, वापरकर्त्याच्या नावाने संदेश पाठविणे, संपर्क क्रमांक आणि ग्रुपमधील संभाषणांची माहिती मिळविणे शक्य होते. अशा प्रवेशाचा वापर करून शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांची ओळख धारण करणे, आर्थिक फसवणूक करणे, फिशिंगद्वारे माहिती मिळविणे तसेच अन्य सायबर गुन्हे घडविण्याचा धोका आहे. शासकीय कामकाजाशी संबंधित कागदपत्रे, प्रशासकीय माहिती, आर्थिक व्यवहारांचा तपशील, गोपनीय पत्रव्यवहार आणि अन्य संवेदनशील माहितीची देवाणघेवाण व्हॉट्सॲप वेबद्वारे करू नये, असा स्पष्ट सल्ला देण्यात आला आहे. कार्यालयीन संगणकावर व्हॉट्सॲप वेबचे लॉगिन कायमस्वरूपी सुरू ठेवू नये. प्रत्येक वापरानंतर खात्यातून लॉगआऊट करणे आवश्यक आहे. तसेच सार्वजनिक संगणक, सायबर कॅफे, हॉटेलमधील बिझनेस सेंटर किंवा अविश्वसनीय संगणकांवरून व्हॉट्सॲप वेब वापरणे टाळावे. व्हॉट्सॲप खात्यावरून आपल्या नकळत संदेश पाठविले जाणे, संपर्क व्यक्तींकडून अनपेक्षित प्रतिसाद मिळणे किंवा खात्यात अन्य संशयास्पद हालचाली आढळणे, ही संभाव्य सायबर घुसखोरीची लक्षणे असू शकतात. त्यामुळे अशा बाबींकडे दुर्लक्ष न करता तातडीने आवश्यक खबरदारी घ्यावी. कार्यालयीन संगणकांची ऑपरेटिंग सिस्टिम, इंटरनेट ब्राउझर आणि सुरक्षा प्रणाली नियमितपणे अद्ययावत ठेवावी. अनोळखी फाइल्स, संशयास्पद डाउनलोड, क्रॅक सॉफ्टवेअर तसेच अविश्वसनीय स्रोतांमधून प्राप्त झालेल्या फाइल्स उघडू नयेत, असेही सूचित करण्यात आले आहे. शासकीय माहितीची गोपनीयता, कार्यालयीन पत्रव्यवहाराची सुरक्षितता आणि डिजिटल यंत्रणांचे संरक्षण सुनिश्चित करण्यासाठी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सायबर सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करावे आणि डिजिटल संवाद साधताना विशेष दक्षता बाळगावी, असे आवाहन केंद्रीय गृह मंत्रालयाने केले आहे. #सायबरसुरक्षा #व्हॉट्सॲपवेब #WhatsApp
1
2
107
DIST. INFORMATION OFFICE CHHATRAPATI SAMBHAJINAGAR retweeted
एल निनोच्या संभाव्य प्रभावामुळे उद्भवणारी #पाणीटंचाई आणि दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन राज्यात जलसंधारणाची कामे वेगाने पूर्ण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ३० जून २०२७ पर्यंत जास्तीत जास्त गावांमध्ये मृद व जलसंधारणाची कामे पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असून, मृद व जलसंधारण, कृषी, ग्रामविकास, महसूल आदी विभागांच्या समन्वयातून ही कामे राबविण्यात येणार असल्याची माहिती मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी दिली. राज्यात कोल्हापूर पद्धतीचे बंधारे, साठवण तलाव, सिमेंट नाला बांध, पाझर तलाव तसेच गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार यांसारखी जलसंधारणाची कामे सुरू आहेत. ग्रामीण भागात शेतकऱ्यांशी थेट संपर्क असलेल्या कृषी विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सहभागामुळे या कामांचा विस्तार आणि गती वाढणार आहे. हा निर्णय विभागांच्या कार्यक्षमतेवर अविश्वास नसून, सामूहिक जबाबदारीतून उद्दिष्टपूर्ती करण्यासाठी घेतलेला आहे, असे मंत्री राठोड यांनी स्पष्ट केले. जलसंधारणाच्या कामांमध्ये गुणवत्ता आणि पारदर्शकता राखण्यासाठी #जलदर्पण पोर्टल, एमएच-युआयडी (MH-UID) आणि जिओ-टॅगिंग यांसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. कृषी विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना या प्रणालींच्या वापराबाबत तसेच कामांच्या तांत्रिक प्रक्रियेबाबत आवश्यक मार्गदर्शन आणि सहकार्य देण्यात येईल. पाणीटंचाई आणि दुष्काळाच्या संभाव्य संकटावर मात करून राज्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे, असे आवाहन मंत्री संजय राठोड यांनी केले. @SanjayDRathods #दुष्काळ #एलनिनो
5
13
3
20
6,427
DIST. INFORMATION OFFICE CHHATRAPATI SAMBHAJINAGAR retweeted
तुमचा फार्मर आयडी तयार आहे का? आजच जवळच्या सीएससी केंद्राला भेट द्या #शेतकरी #फार्मरआयडी #FarmerID #MahaDGIPR
7
5
2,144
DIST. INFORMATION OFFICE CHHATRAPATI SAMBHAJINAGAR retweeted
📍पंढरपूर कार्तिकी यात्रा २०२६ निमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात आयोजित शासकीय महापूजा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मानाचे वारकरी सुधाकर दशरथ शिंदे यांच्या हस्ते सपत्नीक संपन्न झाली. राज्यातील दुष्काळी परिस्थिती दूर होऊन बळीराजा आणि सर्वसामान्य जनतेच्या जीवनात सुख, समृद्धी व समाधान नांदू दे, असे साकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्री विठ्ठलाच्या चरणी घातले. यावेळी फलोत्पादन मंत्री भरत गोगावले, सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर, खासदार श्रीकांत शिंदे, खासदार संजय जाधव, आमदार अभिजित पाटील, बापूसाहेब पठारे, राजू खरे, जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, समितीचे कार्यकारी अधिकारी श्रीकांत यादव, समिती सदस्य व अन्य मान्यवर उपस्थित होते. पंढरपूर येथे कार्तिकी यात्रेदरम्यान लाखो भाविक श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी येतात. सध्या संपूर्ण पंढरपूर भक्तिमय वातावरणाने भारावून गेले आहे. आपण सर्वजण येथे वारकरी भावनेने येतो. सर्वसामान्य वारकऱ्यांना श्री विठ्ठलाचे दर्शन सुलभतेने व कमी वेळेत मिळावे, यासाठी व्हीआयपी दर्शन बंद करण्यात आले आहे. त्यामुळे दर्शनासाठी लागणारा वेळ कमी होऊन वारकऱ्यांना लवकर दर्शनाचा लाभ मिळत असल्याबद्दल उपमुख्यमंत्री शिंदे यांनी समाधान व्यक्त केले. राज्यातील ३१० तालुक्यांमध्ये दुष्काळी परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे. खरीप व रब्बी हंगामातील पाऊस अत्यंत कमी झाल्यामुळे शेतकऱ्यांवर मोठे संकट ओढवले असून, शेतीपिकांचे नुकसान झाले आहे. अशा संकटाच्या काळात शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. दुष्काळी परिस्थिती दूर होऊन चांगला पाऊस पडावा, बळीराजावरील संकट दूर व्हावे आणि त्याच्या जीवनात सुख-समाधानाचे दिवस यावेत, असे साकडे पांडुरंगाला घातल्याचे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. दुष्काळी परिस्थितीतून शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व सर्व मंत्री शेतकऱ्यांच्या बांधावर तसेच त्यांच्या घरी जाऊन भेटी घेत आहेत. दिवाळीच्या काळात शासनाकडून आर्थिक मदत तत्परतेने वितरित करण्यात आली असून, दुष्काळी परिस्थितीत लागू असलेल्या विविध सवलतीही जाहीर करण्यात आल्या आहेत. आपत्तीच्या काळात शासन शेतकऱ्यांना तातडीने मदत करत असल्याचे त्यांनी सांगितले. आषाढी व कार्तिकी यात्रेदरम्यान वारकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या सुविधांमध्ये दरवर्षी सुधारणा करण्यात येत आहेत. वारकऱ्यांसाठी आवश्यक सुविधा निर्माण करण्याकरिता शासनाकडून निधी उपलब्ध करून दिला जात आहे. दर्शन मंडपासाठी आवश्यक असलेला अतिरिक्त २५ कोटी रुपयांचा निधी पर्यटन विभागामार्फत तत्काळ उपलब्ध करून देण्यात आला आहे. पंढरपूर कॉरिडॉरचे काम सर्व संबंधितांना विश्वासात घेऊनच करण्यात येणार असल्याचेही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले. प्रारंभी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांच्या पत्नी लता एकनाथ शिंदे तसेच मानाचे वारकरी सुधाकर दशरथ शिंदे व त्यांच्या पत्नी प्रणिता सुधाकर शिंदे यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा करण्यात आली. यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते मानाचे वारकरी शिंदे दाम्पत्याचा श्री विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती व वस्त्र देऊन सन्मान करण्यात आला. तसेच एसटी महामंडळातर्फे देण्यात येणारा एक वर्षाचा मोफत प्रवास पास त्यांना प्रदान करण्यात आला. मंदिर समितीच्या वतीने उपमुख्यमंत्री शिंदे यांचाही सन्मान करण्यात आला. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते मंदिर समितीच्या 'दैनंदिनी २०२७' चे प्रकाशन करण्यात आले. @mieknathshinde @ibharatgogawale @iprakashabitkar @DrSEShinde #कार्तिकीएकादशी #कार्तिकीवारी #कार्तिकीएकादशी२०२६ #पंढरपूर
6
2
17
2,708
DIST. INFORMATION OFFICE CHHATRAPATI SAMBHAJINAGAR retweeted
महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात प्राणांची आहुती देणाऱ्या हुतात्म्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हुतात्मा चौक, मुंबई येथे पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, कौशल्य, रोजगार, उद्योजकता मंत्री मंगलप्रभात लोढा, विधानपरिषदेच्या माजी उपसभापती नीलम गोऱ्हे, कोकण विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल, पोलीस महासंचालक सदानंद दाते, मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारती तसेच मुंबई शहर जिल्हाधिकारी (अतिरिक्त कार्यभार) बप्पासाहेब थोरात यांनीही हुतात्मा स्मृतिस्थळावर पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. यावेळी विविध पदाधिकारी, वरिष्ठ शासकीय अधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते. @Dev_Fadnavis @SunetraA_Pawar @MPLodha @neelamgorhe #HutatmaSmrutiDin
12
1
11
2,538
DIST. INFORMATION OFFICE CHHATRAPATI SAMBHAJINAGAR retweeted
📍पंढरपूर कार्तिकी एकादशी निमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सपत्नीक श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा. @mieknathshinde #कार्तिकीएकादशी #कार्तिकीवारी #कार्तिकीएकादशी२०२६ #पंढरपूर
12
26
2,876
DIST. INFORMATION OFFICE CHHATRAPATI SAMBHAJINAGAR retweeted
At the 'Swachh Survekshan Awards 2025-26', held in New Delhi, Navi Mumbai was honoured as India’s Cleanest City. The awards were presented at the hands of Honourable President Smt. Droupadi Murmu.
1
485
DIST. INFORMATION OFFICE CHHATRAPATI SAMBHAJINAGAR retweeted
महाराष्ट्रात एसटी बस प्रवासासाठीचे #NCMC कार्ड रद्द झाले असून, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना ‘नोव्हेंबरची भेट’ म्हणून एकाच कार्डवर अर्धे तिकीट मिळणार असल्याचा यूट्यूब व्हिडिओमधील दावा खोटा आहे. #FactCheck #DGIPRFactCheck NCMC कार्ड रद्द करण्यात आलेले नाही. महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी हे कार्ड काढण्याची मुदत दि. ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत वाढवली आहे. १ जानेवारी २०२७ पासून एसटी प्रवास सवलतींसाठी हे कार्ड अनिवार्य असेल. महिलांना मार्च २०२३ पासून महिला सन्मान योजनेअंतर्गत ५०% सवलत मिळत असून, नोव्हेंबरमध्ये कोणतीही नवीन सवलत जाहीर झालेली नाही. #MSRTC
1
3
3
2,508
DIST. INFORMATION OFFICE CHHATRAPATI SAMBHAJINAGAR retweeted
सन २०२२ ते २०२५ या चार वर्षांचा प्रलंबित पीक विमा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या खात्यात एकाच वेळी जमा होत असल्याचा आणि १६ जिल्ह्यांची दुसरी यादी जाहीर झाल्याचा सोशल मीडियावरील दावा खोटा आहे. #FactCheck #DGIPRFactCheck राज्य किंवा केंद्र शासनाने चार वर्षांचा पीक विमा एकत्रितपणे देण्याचा कोणताही निर्णय घेतलेला नाही आणि १६ जिल्ह्यांची अशी कोणतीही यादी जाहीर केलेली नाही. पीक विमा योजनेत प्रति हेक्टर ठराविक रक्कम दिली जात नाही. व्हिडिओतील १,२१९ कोटी रुपयांचा आकडा जुना आहे. ही रक्कम एप्रिल २०२६ मध्ये खरीप २०२५ हंगामासाठी ३० जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना मंजूर करण्यात आली होती. यंदाच्या खरीप हंगामाचे पीक कापणी प्रयोग अद्याप सुरू असून, नुकसानभरपाईची रक्कम अद्याप जाहीर झालेली नाही. #पीकविमा #शेतकरी
4
1
3
4,994
DIST. INFORMATION OFFICE CHHATRAPATI SAMBHAJINAGAR retweeted
‘जय महाराष्ट्र’ या वृत्तवाहिनीवरील ‘समृद्ध महाराष्ट्र’ हा कार्यक्रम… #साप्ताहिकमहाराष्ट्र #MaharashtraThisWeek #DGIPR
4
1
2
2,331
DIST. INFORMATION OFFICE CHHATRAPATI SAMBHAJINAGAR retweeted
यूट्यूबवरील किसान हेल्पलाइन (@kisanhelpline) या चॅनलवरील व्हिडिओमध्ये दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातामागील गुन्हेगाराला अटक झाल्याचा आणि मुख्यमंत्र्यांनी त्याचे नाव उघड केल्याचा दावा खोटा आहे. #FactCheck #DGIPRFactCheck मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १६ नोव्हेंबर २०२६ रोजी पुण्यात अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या चौकशीचा अहवाल लवकर समोर यावा, अशी विनंती केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे केल्याचे सांगितले आहे. राज्य गुन्हे अन्वेषण विभाग आणि विमान अपघात तपास ब्युरो या अपघाताची स्वतंत्रपणे चौकशी करत आहेत. #अजितपवार
4
1
3,302
DIST. INFORMATION OFFICE CHHATRAPATI SAMBHAJINAGAR retweeted
मोबाइल फोनवरील जीएसटी १८% वरून ५% होऊन २० हजार रुपयांचा फोन १७ हजार रुपयांना मिळणार असल्याचा सोशल मीडियावरील दावा दिशाभूल करणारा आहे. #FactCheck #DGIPRFactCheck मोबाइल उद्योग संघटनेने जीएसटी कपातीची मागणी केली असली तरी अद्याप जीएसटी परिषदेने याबाबत निर्णय घेतलेला नाही. #GST #Mobile
4
4
5,295
DIST. INFORMATION OFFICE CHHATRAPATI SAMBHAJINAGAR retweeted
माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ या कार्यक्रमात क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले यांच्या द्विशताब्दी जन्मवर्षानिमित्त अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांची निवेदक प्रणय चव्हाण यांनी घेतलेली विशेष मुलाखत पाहा... मंत्री भुजबळ यांनी महात्मा फुले यांच्या महान जीवनकार्याचा आणि परिवर्तनवादी विचारांचा या मुलाखतीद्वारे आढावा घेतला आहे. @ChhaganCBhujbal #जयमहाराष्ट्र #महात्माफुले200 #MahatmaPhule200 #महात्माजोतीरावफुले_द्विशताब्दीजन्मवर्ष #MahatmaJyotiraoPhule_BicentenaryBirthYear
6
5
13
3,064
DIST. INFORMATION OFFICE CHHATRAPATI SAMBHAJINAGAR retweeted
📍 नागपूर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोहारी सावंगा (ता.नरखेड) येथे शेतकऱ्यांसोबत दिवाळी साजरी केली. शेतकरी रामभाऊ बालपांडे यांच्या निवासस्थानी त्यांनी मुक्काम केला होता. आज अरुणाबाई बालपांडे यांनी मुख्यमंत्री यांचे औक्षण केले. #लोहारीसावंगा #दुष्काळ #शेतकरी #FarmerWelfare #DiwaliWithFarmers #Diwali
18
4
17
3,631
DIST. INFORMATION OFFICE CHHATRAPATI SAMBHAJINAGAR retweeted
📍 नागपूर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लोहारी सावंगा येथील शेतकरी रामभाऊ बालपांडे यांच्या घरी आगमन झाले. कुटुंबातील सदस्यांशी त्यांनी आपुलकीने संवाद साधला.. @Dev_Fadnavis #लोहारीसावंगा #दुष्काळ #शेतकरी #FarmerWelfare #DiwaliWithFarmers #Diwali
23
5
140
7,153
DIST. INFORMATION OFFICE CHHATRAPATI SAMBHAJINAGAR retweeted
📍 नागपूर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज लोहारी सावंगा येथील शेतकरी रामभाऊ बालपांडे यांच्या निवासस्थानी दिवाळीनिमित्त त्यांच्या कुटुंबियांसमवेत घरगुती भोजनाचा आनंद घेतला. सर्वांशी आपुलकीने संवाद साधला... @Dev_Fadnavis #लोहारीसावंगा #दुष्काळ #शेतकरी #FarmerWelfare #DiwaliWithFarmers #Diwali
20
4
52
3,883
DIST. INFORMATION OFFICE CHHATRAPATI SAMBHAJINAGAR retweeted
📍नागपूर लोहारी सावंगा गावातील ग्रामपंचायत आवारातील सभामंडपात गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने आयोजित प्रार्थना सभेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ग्रामस्थांना अश्वस्त केले. राज्यात दुष्काळी परिस्थितीत राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहे. आर्थिक मदतीसह विविध योजनांचा आधार दुष्काळग्रस्तांना दिला जात आहे. शेतकरी संकटात असताना दिवाळीचे हे पर्व त्याला धीर देण्यात घालवावे, या उद्देशाने आम्ही गावात आलो आहोत. आगामी काळातही अनेक योजना लागू करण्यात येणार असून या अस्मानी संकटाचा सर्वांना एकजुटीने सामना करावा लागेल, त्यांनी सांगितले. हे वर्ष आव्हानांचे आहे. पावसाने शेवटपर्यंत दडी मारल्याने अतोनात नुकसान झाले आहे. राज्यात काही ठिकाणी चाऱ्याचा आणि पिण्याच्या पाण्याचाही गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या कठीण प्रसंगी राज्य सरकार भक्कमपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहिलेले आहे. लाखो शेतकऱ्यांना या कर्जमुक्ती योजनेचा लाभ देण्यात आला. मात्र, दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांपुढे पुन्हा एकदा संकट उभे ठाकले आहे. त्यासाठी आता राज्य सरकारने शेतकऱ्यांना थेट मदतीचा हात दिला आहे. शेतकऱ्यांना दिवाळी साजरी करता यावी यासाठी सरकारने सुमारे दीड कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात पाच हजारांची रक्कम जमा केली आहे. ही रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सुरूच आहे. शेतकऱ्यांचे विज बिल माफ करण्यात आले आहे. शिवाय वीज बिलाची थकबाकी देखील माफ करण्यात आली आहे. जलसंधारणाची कामे व्यापक प्रमाणात हाती घेतली जाणार आहेत. लोकांच्या आरोग्यासह विविध प्रश्न दूर करण्याचे प्रयत्न केले जाणार आहेत. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या भजनांमध्ये फार मोठी शक्ती आहे. संकटकाळात व्यक्ती कितीही खचली तरी राष्ट्रसंतांच्या विचारांनी त्याला उभारी मिळते. त्यांच्या ग्रामगीतेचा विचार गावांना सर्वच अंगांनी समृद्ध बनवतो. दुष्काळाच्या काळात आपण नेमके काय केले केले पाहिजे, यावर राष्ट्रसंतांनी मांडलेले विचार अत्यंत प्रेरक आणि दिशादर्शक आहेत. गुरुदेवांच्या या विचारांनी देखील आम्हा सर्वांना या संकटाचा सामना करण्याचे बळ मिळो - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार सर्वश्री चरणसिंह ठाकूर, आशिष देशमुख, डॉ. राजीव पोतदार, माजी आमदार सुधाकर कोहळे, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी आदी उपस्थित होते. @Dev_Fadnavis @cbawankule #लोहारीसावंगा #दुष्काळ #शेतकरी #FarmerWelfare #DiwaliWithFarmers #Diwali
11
1
9
905
DIST. INFORMATION OFFICE CHHATRAPATI SAMBHAJINAGAR retweeted
📍नागपूर दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शक्य तिथे विंधन विहिरी घेण्यास परवानगी देण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. नागपूर जिल्ह्यातील लोहारी सावंगा या गावात शेतकऱ्याच्या घरी मुक्काम करून दिवाळी साजरी केली. शेतकरी रामभाऊ बालपांडे यांच्या निवासस्थानी मुक्काम केला. शेतकऱ्यांसमोरील संकट आणि या संकटावर कशी मात करता येईल, या संदर्भात त्यांनी बालपांडे यांच्यासोबत संवाद साधला. चिंताग्रस्त शेतकऱ्यांना त्यांनी धीर दिला. हवामान बदलामुळे काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी झाली त्यानंतर पाऊसच पडला नाही आणि अद्यापही पाऊस नसल्यामुळे शेतातील पिकांची हानी झाली आहे. या दोन्ही प्रसंगांमध्ये शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांना मदत दिली जात आहे. काटोल, नरखेड परिसरात संत्र्यासह मोसंबीचे मोठ्या प्रमाणात पीक होत आहे. परंतु, बांगलादेशने निर्बंध घातल्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान सोसावे लागत आहे. या संदर्भात मिहान येथे मोठा प्रकल्प सुरू होत असून या पिकांवर प्रक्रिया करण्यासाठी शेतकऱ्यांना संधी उपलब्ध होणार आहे .शेतकरी अडचणीत येणार नाही, त्याची खबरदारी घेण्यात येत आहे. रब्बीचे पीक वाचवण्यासाठी काय उपाययोजना करता येईल, या संदर्भातही शेतकऱ्यांसोबत चर्चा केली. शेतीच्या संरक्षणासाठी कुंपण घालण्याची योजना राबविण्यात येत असून शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा. असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले. शेतकऱ्यांच्या दुःखांमध्ये सहभाग घेऊन दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्री आमच्या घरी आलेत सोबत मुक्काम केला तसेच आमच्या घरच्या चटणी भाकरीचा आस्वाद घेतला, याचा आम्हाला अभिमान वाटला, मुख्यमंत्र्यांनी आम्हाला जो धीर दिला त्यामुळे आम्हाला संकटावर मात करण्याची हिंमत मिळाली, अशी भावना रामभाऊ बालपांडे यांनी व्यक्त केली. @Dev_Fadnavis #लोहारीसावंगा #दुष्काळ #शेतकरी #FarmerWelfare #DiwaliWithFarmers #Diwali
10
2
14
2,495
DIST. INFORMATION OFFICE CHHATRAPATI SAMBHAJINAGAR retweeted
📍नागपूर राज्यात दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना धीर देण्यासोबतच त्यांचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी त्यांच्यासोबत दिवाळी सण साजरा करण्याची भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केली होती. त्यानुसार त्यांनी आज लोहारी सावंगा (ता.नरखेड, जि. नागपूर) येथे शेतकऱ्यांसोबत दिवाळी साजरी केली. शेतकऱ्यांनी संवाद साधतांना दुष्काळाच्या संकटातून बाहेर पडू, असा विश्वास व्यक्त केला. गावातच रामभाऊ बालपांडे या शेतकऱ्यांच्या घरी भरीत भाकरीचे जेवण करुन मुक्काम केला. त्यांच्या आगमनानंतर महिलांनी पारंपरिक पद्धतीने त्यांचे स्वागत केले. त्यानंतर सामुदायिक प्रार्थनेत त्यांनी सहभाग घेतला. रामभाऊ बालपांडे या शेतकऱ्याच्या घरी जेवण करुन दिवाळी सणानिमित्त गावकऱ्यांशी संवाद साधला. त्यांच्या अडचणी, समस्या, दुःख जाणून घेतले. यावेळी शेतकऱ्यांनी मोकळेपणाने मुख्यमंत्र्यांशी संवाद साधत आपल्या समस्या मांडल्या. शेतकरी पुरुषोत्तम वघाळे यांनी खोरी प्रकल्पाचा प्रश्न मार्गी लावल्याचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर यासाठी मान्यता देण्यात आली असून लवकरच काम सुरू होणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. जगदीश देशमुख या शेतकऱ्याने ४३ वर्षांपूर्वी पायाभरणी झालेल्या पाझर तलावाची अडचण सोडवून तलाव पूर्ण करण्याची मागणी केल्यानंतर याबाबत आवश्यक कारवाई लवकरच करू, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. पाणी फाऊंडेशनचा युवा कार्यकर्ता जयंत चाफले यांनी जुन्या खोरी तलावाचे काम मार्गी लावल्याबद्दल आभार व्यक्त केले. राजेंद्र चाफले व तेजपाल चौधरी यांनी रोही, वाघ, रानडुकरांचा शेती पिकांना मोठा फटका बसत असल्याने त्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली. दरम्यान दुष्काळी परिस्थितीमुळे मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष तालुका स्तरावर देखील कक्ष सुरू करण्यात येत मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. नागपूर जिल्ह्याच्या एका टोकावरील असलेल्या आमच्या गावास भेट दिल्याने दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्याचे बळ आणि आत्मविश्वास दिला, अशी भावना व्यक्त करत गावकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. यावेळी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार राजू पोतदार, आमदार चरणसिंह ठाकूर, आमदार आशिष देशमुख, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी, माजी आमदार सुधाकर कोहळे, सरपंच विपीन चाफले आदी उपस्थित होते. @Dev_Fadnavis @cbawankule #लोहारीसावंगा #दुष्काळ #शेतकरी #FarmerWelfare #DiwaliWithFarmers #Diwali
15
7
2,248
DIST. INFORMATION OFFICE CHHATRAPATI SAMBHAJINAGAR retweeted
📍 नागपूर लोहारी सावंगा येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सामूहिक प्रार्थनास्थळी आगमन झाले. स्थानिक शेतकरी महिलांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे व अन्‍य मान्यवर उपस्थित... @Dev_Fadnavis @cbawankule #लोहारीसावंगा #दुष्काळ #शेतकरी #FarmerWelfare #DiwaliWithFarmers #Diwali
1
13
5
31
11,697