
वाचनाच्या नवीन पिढ्या रुजवण्यासाठी शब्दांचे वृक्षारोपण करणारे व्यासपीठ…📖 #पुस्तकआणिबरचकाही : https://nitter.gq/t.co/RHviCCghvr
साहित्यविश्व
Joined May 2022
- Tweets6.5K
- Following78
- Followers4.7K
- Likes15.1K
पुस्तकं आणि बरच काही 📖 retweeted
#पुस्तकांची_ओळख
(#कॉपीपेस्ट 😊)
A compulsively readable account of a journey to the Congo a country virtually inaccessible to the outside world - vividly told by a daring and adventurous journalist.
Ever since Stanley first charted its mighty river in the 1870s, the Congo has epitomized the dark and turbulent history of a failed continent. However, its troubles only served to increase the interest of Daily Telegraph correspondent Tim Butcher, who was sent to cover Africa in 2000. Before long he became obsessed with the idea of recreating Stanley's original expedition but travelling alone.
Despite warnings Butcher spent years poring over colonial-era maps and wooing rebel leaders before making his will and venturing to the Congo's eastern border. He passed through once thriving cities of this country and saw the marks left behind by years of abuse and misrule. Almost, 2,500 harrowing miles later, he reached the Atlantic Ocean, a thinner and a wiser man.
Butcher's journey was a remarkable feat. But the story of the Congo, vividly told in Blood River, is more remarkable still.
#नाद_पुस्तकांचा 📚 #वेड_पुस्तकांचे
#वाचत_राहूया_शिकत_राहूया
#मोबाईल_जिथे_पुस्तक_तिथे
#पुस्तकांशी_सलगी
#पुतळे_नको_पुस्तकं_हवी
#वाचन_शुभेच्छा 💐
🤖 Made with AI
पुस्तकं आणि बरच काही 📖 retweeted
#पुस्तकांची_ओळख
(#कॉपीपेस्ट 😊)
✍🏻 डॉ. आनंद नाडकर्णी
कसोटीच्या कालखंडाला कसं सामोरं जायचं ह्या विषयावर मी जसा वागत होतो तसाच बोलत होतो... ते पुस्तकी नव्हतं. विवेकनिष्ठ माणूस म्हणून मानसोपचारतज्ज्ञ आणि अद्वैत तत्त्वज्ञान ह्या दोहोंमधली माझी समज विस्तारणारं होतं. शिवाय, माझं माणूस म्हणूनचं जगणं आणि मनआरोग्य प्रसारक म्हणून माझं उद्दिष्ट ही दोन्ही अगदी एकजीव झाल्याचा अनुभव मला यायला लागला.
या पुस्तकात तुमच्या भेटीला येणारे लेख तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे आधीच वाचले, ऐकले, पाहिले, अनुभवले असण्याची शक्यता आहे. पण आता हा त्यांचा एकत्रित असा गुच्छ आहे. ह्यामध्ये कोरोनाच्या कालखंडाचे वैयक्तिक, सामाजिक, भावनिक असे दस्तऐवजीकरण तर आहेच; पण त्याचबरोबर ह्या पालक खंडातून जाताना नेमकं काय शिकायचं आणि पुढे काय न्यायचं ह्याचं भरीव सूचनही आहे. आजूबाजूची अनिश्चितता काही रातोरात संपणार नाही हे आपल्याला कळून चुकलं आहे. अशा संक्रमणकाळातून जाताना स्वतःच्या विचारभावनांचं आरोग्य कसं जपायचं ह्यासाठी एक 'गाईड' म्हणूनही हे पुस्तक उपयोगाचं आहे आणि ह्या साऱ्यातून पार पडल्यावर उद्याच्या पिढीला कोरोनाची गोष्ट सांगण्यासाठीसुद्धा हे लिखाण उपयुक्त ठरणारं आहे.
#नाद_पुस्तकांचा 📚 #वेड_पुस्तकांचे
#वाचत_राहूया_शिकत_राहूया
#मोबाईल_जिथे_पुस्तक_तिथे
#पुस्तकांशी_सलगी
#पुतळे_नको_पुस्तकं_हवी
#वाचन_शुभेच्छा 💐
पुस्तकं आणि बरच काही 📖 retweeted
द एथिकल डॉक्टर - डॉ .कमलकुमार महावर
अनुवाद - अभिजीत कुलकर्णी
आपल्या आजारपणाच्या भांडवलाच्या जोरावर नफा कमवणारी एक अख्खी यंत्रणाच अस्तित्वात आहे. फक्त इतर व्यवसायांप्रमाणे या उत्पादकांना त्यांची उत्पादने थेट बाजारात ग्राहकापर्यंत नेता येत नाहीत.
@LetsReadIndia @PABKTweets 👇
पुस्तकं आणि बरच काही 📖 retweeted
#पुस्तकांची_ओळख
(#कॉपीपेस्ट 😊)
✍🏻 गिरीश प्रभुणे
जमिनीत खोलवर लुप्त झालेली संस्कृती उत्खननातून सापडते. 'मोहेन्जोदाडो-हराप्पा' या अशाच सापडलेल्या शहरांमुळेच आपले पूर्वज-गणगोत आपल्याला गवसले ! जमिनीत खोलवर खणत जाता येतं. गाळाखाली गाडलेलं उकरून काढता येतं. गाळाने, मातीने जतन करून ठेवलेलं आपल्या आघातानं तुटणार नाही, नष्ट होणार नाही असं काढावं लागतं.
इथं झंझावाती वेगानं, आधुनिकतेनं नष्ट होत चाललेली संस्कृती. अगदी आपल्यातच प्राण हळूहळू निघून जावा तसा. आपल्यातच आपल्या जवळच वावरणारा एक आपलाच संस्कृती समूह 'इतिहासकालीन' सांस्कृतिक जीवन जगणारा. हळूहळू नष्ट होत जाणारा... त्याचं दर्शन अंगावर रोमांच उभं करणारं. तसंच खिन्न करणारं, वेदना देणारं.
ही भारतीय लोकगंगा अनादी काळापासून वाहत आलेली. त्यातल्या काही ओंजळी म्हणजे हे लेखन. या समाजदर्शनानं माझं जीवन समृद्ध झालं. या लोकगंगेच्या काठावर अजून खूप घनदाट अरण्य आहे. अनेक जाती-समूह प्राचीन भारतीय वैभवसंपन्न समृद्ध संस्कृतीचे चालतेबोलते अवशेष त्या ठिकाणी जगत आहेत. अनेक अस्पर्श वाटा खुणावताहेत.
हे पुस्तक म्हणजे एक अवघड प्रवास आहे. भटक्या-विमुक्त समजातले असंख्य सहकारी कार्यकर्ते, समरसता मंचाचे कार्यकर्ते यांच्या बरोबरच्या चर्चा, बैठका, प्रवास यामधूनच हे लेखन साकारले.
#नाद_पुस्तकांचा 📚 #वेड_पुस्तकांचे
#वाचत_राहूया_शिकत_राहूया
#मोबाईल_जिथे_पुस्तक_तिथे
#पुस्तकांशी_सलगी
#पुतळे_नको_पुस्तकं_हवी
#वाचन_शुभेच्छा 💐
पुस्तकं आणि बरच काही 📖 retweeted
पुस्तकाचे नाव - परदेशी
लेखक - रत्नाकर मतकरी
प्रकाशक - मेहता पब्लिशिंग हाऊस
प्रकाशनकाल - ऑक्टोबर, २०१५
पुनर्मुद्रण - फेब्रुवारी, २०१९
पृष्ठसंख्या - ११२
मूल्य - १५० रुपये
थ्रेड🧵 ⬇️
पुस्तकं आणि बरच काही 📖 retweeted
#पुस्तकांची_ओळख
(#कॉपीपेस्ट 😊)
डिमोना ही इस्रायलची छुपी अणुभट्टी.
तिचं रहस्य 'दि संडे टाइम्स' या दैनिकासमोर उघड करणारा इस्त्रायली जागल्या मोर्देचाई व्हॅनुनू.
पण हे इस्रायलला कसं चालणार?
मग त्यानं एका मदनिकेकरवी व्हॅनुनूवर टाकलं सौंदर्याचं जाळं.
व्हॅनुनूला स्वतःच्या जाळ्यात ओढून '#मोसाद ' या गुप्तचर यंत्रणेला व्हॅनुनूचं अपहरण करण्यात मदत करणारी चेरील बेंटॉव्ह उर्फ सिंडी.
सिंडी एकाच वेळी 'सीआयए' आणि 'मोसाद' या दोन यंत्रणांसाठी गुप्तहेर म्हणून काम करत होती का?
युनायटेड स्टेट्स, फ्रान्स, बेल्जियम आणि दक्षिण आफ्रिका या राष्ट्रांनी इस्रायलला आण्विक ज्ञान आणि तंत्रज्ञान मिळवण्यात गुप्तपणे कशी मदत केली?
अपहरणानंतर मोर्देचाई व्हॅनुनू डिमोनाचं रहस्य उघड करू शकला का?
तो आपल्या ध्येयात यशस्वी झाला का?
सिंडीचं पुढे काय झालं?
या सर्व घटनांवर भेदक प्रकाश टाकणारी, इस्त्रायलच्या 'मोसाद' या गुप्तचर यंत्रणेचं क्रूर जाळं छेदणाऱ्या जागल्याची कहाणी...
#नाद_पुस्तकांचा 📚 #वेड_पुस्तकांचे
#वाचत_राहूया_शिकत_राहूया
#मोबाईल_जिथे_पुस्तक_तिथे
#पुस्तकांशी_सलगी
#पुतळे_नको_पुस्तकं_हवी
#वाचन_शुभेच्छा 💐
🤖 Made with AI
पुस्तकं आणि बरच काही 📖 retweeted
#पुस्तकांची_ओळख
(#कॉपीपेस्ट 😊)
✍🏻 प्रो. शैलेंद्र लेंडे
'कोयतूर' ही कादंबरी आदिवासी जीवनरूपाला, त्यांच्या समस्याग्रस्ततेला, प्रश्नोपप्रश्नांना व अभ्युदयमार्गांना सुस्पष्ट करणारी अशी महत्त्वपूर्ण कादंबरी आहे.
विदर्भाच्या भौगोलिक परिसरातील गोंड आदिवासी जमातीवर केंद्रिभूत असलेली ही कादंबरी समस्त आदिवासी समाजाच्या जीवनसंघर्षाला व त्यांच्या शोषित-वंचिततेला अधोरेखित करते, तसेच त्यांच्या अस्मिता व अस्तित्व शोधाची खडतर वाटचालही प्रातिनिधिकपणे अभिव्यक्त करीत जाते. स्थानिक, प्रादेशिक, राज्यस्तरीय, देशस्तरीय आणि एकूण वैश्विक संदर्भाची संपृक्तीदेखील या कादंबरीमधून ठळकपणे पाहावयास मिळते. अनेक शतकांपासून उपेक्षित व वंचित गोंड आदिवासींच्या जीवनरूपांना, जीवनसमस्यांना ही कादंबरी कधी चर्चात्मक, तर कधी चिंतनात्मक पद्धतीने हात घालते आणि त्या समस्यांच्या निराकरणाचे मार्गदेखील अधिक सुस्पष्ट करू पाहते.
भारतीय समाजसंरचनेमध्ये सर्वार्थाने उपेक्षित असलेल्या गोंड या आदिवासी जीवनाचा असा प्रदीर्घ पट डॉ. विनोद कुमरे यांच्या 'कोयतूर' या कादंबरीच्या रूपातून मराठी कादंबरीमध्ये पहिल्यांदाच इतक्या कलात्मक, प्रत्ययकारी व प्रभावी पद्धतीने प्रगट झालेला आहे.
#नाद_पुस्तकांचा 📚 #वेड_पुस्तकांचे
#वाचत_राहूया_शिकत_राहूया
#मोबाईल_जिथे_पुस्तक_तिथे
#पुस्तकांशी_सलगी
#पुतळे_नको_पुस्तकं_हवी
#वाचन_शुभेच्छा 💐
🤖 Made with AI
पुस्तकं आणि बरच काही 📖 retweeted
पुस्तकाचे नाव - त्सुबाकी स्टेशनर्स
मूळ लेखिका - इतो ओगावा
भाषांतर - मयुरेश कुलकर्णी
मूळ प्रकाशक - Gentosha Publishing
प्रकाशक (मराठी भाषांतर) - कलासक्त, पुणे
आवृत्ती - प्रथमावृत्ती, ऑगस्ट २०२५
पृष्ठसंख्या - ३४२
मूल्य - ५५० रुपये
#marathi #marathipustak #भाषांतर
🧵 ⬇️
पुस्तकं आणि बरच काही 📖 retweeted
#पुस्तकांची_ओळख
(#कॉपीपेस्ट 😊)
श्री. ना. पेंडसे यांच्या कादंबरीविश्वात 'हत्या' ही कादंबरी विशेषत्त्वाने उठून दिसते; ती तिच्यातील वेगळेपणाने. वास्तवाच्या पातळीवरील, तर्कसंगत आणि हृद्य अशी ही कथा पेंडसे यांनी आपल्या कादंबरीसाठी निवडली आणि पेंडसे यांची कादंबरी खऱ्या अर्थाने जीवनाशी पहिल्यांदा अधिक समरस झाली; परिस्थितीने आबाळलेला, शारीरिक व्यंगामुळे अव्हेरलेला आणि गरिबीने पिचलेला असा हा कुठल्याही अर्थाने तत्कालीन 'नायक' न शोभणारा, पौगंडावस्थेतील मुलगा या कादंबरीचा नायक झाला ही तत्कालीन वाङ्मयाभिरुचीच्या चौकटीत न बसणारी गोष्ट होती. आपल्या वेदनेची आणि परिस्थितीने दिलेल्या चटक्यांची खालच्या सुरात दुःखार्त अशी मांडणी करणारी आणि काळजाला हात घालणारी ही कादंबरी आहे. पेंडसेविश्वातील पुढील कादंबऱ्यांच्या विकासाची बीजे या कादंबरीत सुप्तपणे विखुरलेली दिसतात. 'हत्या'च्या निमित्ताने पेंडसे यांनी मराठी कादंबरीतील 'हिरो'ची प्रतिमा पार बदलवून टाकण्याचे जे धाडस केले, त्यासाठी तरी या कादंबरीचे मोल आपण मान्य करायला हवे. (✍🏻 डॉ. रवींद्र शोभणे)
'हत्या' कादंबरीचा 'कलंदर' हा पुढील भाग; - पण किती तरी वेगळा. 'हत्या'तील आत्मकथनाची शैलीच केवळ इथे बदलली आहे, असे नाही, तर पेंडसे यांच्या कलेने आपल्या विकासाचा पुढील टप्पा गाठला आहे. निसर्ग येथे कथेच्या भावगुणाशी एकजीव आणि म्हणून अधिक समृद्ध झाला आहे; व्यक्तिचित्रणाचे सामर्थ्य तसेच रसरशीत आहे. पण ते अधिक विविध रूपे धारण करते आहे; कथानकाची गुंफण अधिक सूक्ष्म आणि म्हणून अधिक वेधक झाली आहे. 'एल्गार', 'हद्दपार', 'गारंबीचा बापू', 'हत्या' या आपल्या पूर्वीच्या कादंबऱ्यांत पेंडसे यांनी रंगविलेले जीवनाचे चित्र अधिकाधिक सूक्ष्म व संमिश्र होत गेले आहे. 'कलंदर'मध्ये तर पाश्चात्त्य संगीतातील अनेक वाद्यांच्या स्वरमेळाची आठवण व्हावी, इतके ते संमिश्र, चढते आणि अनेक बिंदूंभोवती रुंजी घालूनही एका केंद्राकडे झेप घेणारे व अनेक पातळ्यांवर विकास पावूनदेखील एकात्म व सुसंवादी आहे.
#नाद_पुस्तकांचा 📚 #वेड_पुस्तकांचे
#वाचत_राहूया_शिकत_राहूया
#मोबाईल_जिथे_पुस्तक_तिथे
#पुस्तकांशी_सलगी
#पुतळे_नको_पुस्तकं_हवी
#वाचन_शुभेच्छा 💐
🤖 Made with AI
पुस्तकं आणि बरच काही 📖 retweeted
आटपाट देशातल्या गोष्टी
लेखक - संग्राम गायकवाड
आयकर आयुक्तांसारख्या अधिकाऱ्याच्या अनुभवातून जन्मलेली ही कादंबरी केवळ एका आयकर धाडीच्या निमित्ताने उघडकीस येणाऱ्या समाजाच्या विविध स्तरांचे, मानवी स्वभावाचे आणि नैतिकतेच्या गुंतागुंतीचे सखोल चित्रण आहे👇
@LetsReadIndia @PABKTweets
पुस्तकं आणि बरच काही 📖 retweeted
दिवाळी ऑफर " तुकाराम " पुस्तक
बंपर डिस्काउंटवर अधिक सविस्तर
माहितीसाठी संपर्क मो नं / व्हाॅट्सअप नं :
📞९५०३६५२५९६ / ९३७३५३७०७५
🪔🎆🏮🎇✨🪔
#tukarammunde #tukaramsir #marathibooks #marathipustak #iasofficer #HappyDiwali – at Pune, India
पुस्तकं आणि बरच काही 📖 retweeted
महामानवाचे जीवन, विचार, इतिहास समजून घेण्याच्या नव्या प्रवासाला प्रारंभ..
प. पूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर संपूर्ण चरित्र.
खंड १ – 'भिवा' (१८९१ ते १९२३)
बाबासाहेबांच्या जीवनावर अनेक लेखक, विचारवंत आणि अभ्यासकांनी लेखन केले आहे मात्र, एखाद्या महापुरुषाचे +
#DrBabasahebAmbedkar📍
पुस्तकं आणि बरच काही 📖 retweeted
📚 पुस्तकायन | सृजनवेध
‘सृजनवेध’च्या पहिल्या भागात ज्येष्ठ साहित्यिक श्री. देविदास फुलारी यांच्याशी विशेष संवाद! ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने साहित्य, लेखन आणि लेखकाच्या अनुभवविश्वाचा वेध..
🎥 नक्की पाहा!
youtu.be/ZwhevRBn8vs?si=3xwb…
#लेखकसंवाद #मराठी
पुस्तकं आणि बरच काही 📖 retweeted
आठवड्याचा वाचक....
आता तुमच्या वाचनप्रवासाला मिळणार खास व्यासपीठ.
आठवड्याचा वाचक या उपक्रमात सहभागी व्हा आणि तुमचा वाचनप्रवास आमच्यासोबत शेअर करा.
सहभागी कसे व्हाल?
📸तुमच्या आवडत्या पुस्तकासोबतचा फोटो शेअर करा.
📚 सध्या वाचत असलेल्या पुस्तकाचे नाव सांगा.
💬 त्या पुस्तकातून तुम्हाला काय शिकायला मिळाले, हे काही शब्दांत लिहा.
निवडलेल्या वाचकांना मिळेल @LetsReadIndia कडून #पुस्तकभेट
चला, आपल्या वाचनाची गोष्ट जगासोबत शेअर करूया आणि इतरांनाही वाचण्यासाठी प्रेरित करूया!
पुस्तकं आणि बरच काही 📖 retweeted
#पुस्तकांची_ओळख
(#कॉपीपेस्ट 😊)
On October 31st in New Delhi, the unthinkable occurred: the prime minister's own prized bodyguards turned their weapons on the very leader they were sworn to protect. In an unprecedented betrayal, Beant Singh and Satwant Singh-aided by their government-issued firearms, assassinated Prime Minister #IndiraGandhi in a brutal attack that left her body riddled with bullets.
Opening fire - at point blank range - Beant Singh fired five rounds from his .38 revolver, while Satwant Singh unleashed 25 rounds from his 9mm Sten submachine gun. Both assassins emptied their magazines, leaving a beloved prime minister, a personification of "Mother India", fatally injured by 30 bullets.
This shocking assassination sent ripples through the global community and exposed vulnerabilities within India's security establishment. How could such an attack occur within the nation's most secure location? And how did the assassins slip past the intense surveillance measures put in place as part of India's military assault on Darbar Sahib, measures specifically designed to prevent such an incident?
Baljit Singh, the NSYF's research lead, has painstakingly examined every available source to produce a comprehensive account that focuses on the lives and motivations of the assassins.
#नाद_पुस्तकांचा 📚 #वेड_पुस्तकांचे
#वाचत_राहूया_शिकत_राहूया
#मोबाईल_जिथे_पुस्तक_तिथे
#पुस्तकांशी_सलगी
#पुतळे_नको_पुस्तकं_हवी
#वाचन_शुभेच्छा 💐
🤖 Made with AI
पुस्तकं आणि बरच काही 📖 retweeted
दिवाळी ऑफर " तुकाराम " पुस्तक
बंपर डिस्काउंटवर अधिक सविस्तर
माहितीसाठी संपर्क :📞९५०३६५२५९६ / ९३७३५३७०७५
🪔🎆🏮🎇✨🪔
#tukarammunde #tukaramsir #marathibooks #marathipustak #iasofficer #HappyDiwali – at Pune, India
पुस्तकं आणि बरच काही 📖 retweeted
#पुस्तकांची_ओळख
(#कॉपीपेस्ट 😊)
जी.ए. कुलकर्णी यांच्या कथांना मोठा वाचक वर्ग होता आणि आहे. कथेच्या वेगवेगळ्या रूपांना एकत्र करून त्यांनी समृद्ध, आशयसंपन्न कथा वाचकांना दिल्या. त्यांच्या कथेत मानवी मूल्य हमखास दिसते. सर्वसामान्य, अतिसामान्य आयुष्य त्यांनी कथांमधून उलगडली. त्यांच्या डोहकळीमा या कथासंग्रहातील प्रत्येक कथा याला अनुरूप आहेत.
त्यांच्या पहिल्या चार कथासंग्रहातील निवडक कथांचा यात समावेश केला आहे. 'बळी' या कथेत जोगतिणीच्या बेवारशी ठरलेल्या मुलीची, अमाशीची हृदयद्रावक कहाणी आहे. यात खेड्यातील जीवन, परंपरा, मानवाचे रानटी रूप दाखवून दिले आहे. 'माकडाचे काय; माणसाचे काय?' या कथेमधून माणसाच्या शेवटच्या दिवसांतील भावना व्यक्त झाल्या आहेत. तसेच 'रात्र झाली गोकुळी' मध्ये एका गरीब कुटुंबाचे चित्रण आहे. कनिष्ठ समाजाच्या परिस्थितीचे विदारक दर्शन यात घडते.
संग्रहातील अन्य कथाही भ्रामक कल्पनेपलीकडील जग आपल्यासमोर मांडतात. जी.ए. नी केलेल्या रुपकांच्या वापरामुळे कथानकाची वास्तवता दाहक मांडण्यास मदत होते. त्यामुळेच हा कथासंग्रह जी.ए. भक्तांसाठी एक खास भेट आहे.
#नाद_पुस्तकांचा 📚 #वेड_पुस्तकांचे
#वाचत_राहूया_शिकत_राहूया
#मोबाईल_जिथे_पुस्तक_तिथे
#पुस्तकांशी_सलगी
#पुतळे_नको_पुस्तकं_हवी
#वाचन_शुभेच्छा 💐
पुस्तकं आणि बरच काही 📖 retweeted
Replying to @LetsReadIndia
स्वतःसाठी केलेलं अस काही तरी...
आमचा पुस्तकवाला बुकमार्क देत नाही त्यामुळे मीच रिकाम्या वेळेत हे काम करत असतो.






























