🔷गोरेगाव-मुलुंड जोडरस्ता (GMLR) प्रकल्पाच्या टप्पा ३ (ब) अंतर्गत संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या (SGNP) खालून बांधण्यात येणाऱ्या दुहेरी भूमिगत बोगद्याच्या कामात महत्त्वपूर्ण टप्पा गाठण्यात यश आले आहे. या दुहेरी बोगद्यांपैकी पहिल्या बोगद्याचे खोदकाम करणाऱ्या ‘तुळशी’ या बोगदा खनन यंत्राद्वारे (Tunnel Boring Machine –TBM) आतापर्यंत २७० मीटर लांबीचे खोदकाम पूर्ण करण्यात आले आहे. तर दुसऱ्या बोगद्याच्या खोदकामासाठी सज्ज असलेल्या ‘विहार’ या दुसऱ्या बोगदा खनन यंत्राद्वारे शनिवार, दिनांक ७ नोव्हेंबर २०२६ पासून प्रत्यक्ष खोदकामास प्रारंभ करण्यात आला आहे. त्यामुळे या महत्त्वाकांक्षी प्रकल्पातील दोन्ही बोगद्यांच्या निर्मितीच्या कामाला आता गती प्राप्त झाली आहे.
🔷गोरेगाव - मुलुंड जोडरस्ता हा बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणारा १२.२० किलोमीटर लांबीचा महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधा प्रकल्प आहे. हा प्रकल्प चार टप्प्यांमध्ये राबविण्यात येत आहे. प्रकल्प टप्पा ३ (ब) अंतर्गत गोरेगाव (पूर्व) येथील दादासाहेब फाळके चित्रनगरी ते मुलुंड (पश्चिम) येथील अमर नगर दरम्यान संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या खाली अत्याधुनिक टनेल बोरिंग मशीन (TBM) तंत्रज्ञानाद्वारे ५.३४ किलोमीटर लांबीचे, प्रत्येकी तीन मार्गिकेचे दुहेरी बोगदे बांधण्यात येत आहेत.
🔷यापैकी पहिल्या बोगदा खणन सयंत्राचे नामकरण 'तुळशी' आणि दुसऱ्या बोगदा खणन सयंत्राचे नामकरण ‘विहार’ असे करण्यात आले आहे. संपूर्ण तांत्रिक प्रक्रिया व चाचण्या पूर्ण झाल्यानंतर दिनांक १७ ऑगस्ट २०२६ रोजी ‘तुळशी’ कार्यान्वित करण्यात आले आहे. त्यानंतर आतापर्यंत गोरेगावकडून मुलुंडच्या दिशेने २७० मीटरपेक्षा अधिक लांबीचे खोदकाम पूर्ण केले आहे.
🔷दुसऱ्या बोगद्याच्या खोदकामासाठी वापरण्यात येणाऱ्या ‘विहार’ या बोगदा खनन संयंत्राची स्थळ स्वीकृत चाचणी (Site Acceptance Test) नुकतीच यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आली आहे. त्यानंतर , शनिवार, ७ नोव्हेंबर २०२६ पासून दुसऱ्या बोगद्याच्या खोदकामास अधिकृतपणे प्रारंभ करण्यात आला आहे.
🔷‘विहार’ हे दुसरे बोगदा खनन संयंत्र ‘तुळशी’ प्रमाणेच अत्याधुनिक सिंगल शिल्ड अर्थ प्रेशर बॅलन्स (Single Shield Earth Pressure Balance – EPB) तंत्रज्ञानावर आधारित आहे. या संयंत्राच्या कटर हेडचा व्यास १४.४९ मीटर असून संपूर्ण संयंत्राची लांबी ८३ मीटर आहे. यामध्ये २२ मीटर लांबीचा शिल्ड भाग आणि तीन मजली रचनेचा ६१ मीटर लांबीचा बॅकअप गॅन्ट्री विभाग समाविष्ट आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे खोदकाम करताना बोगद्याच्या अग्रभागातील मातीचा दाब नियंत्रित ठेवता येतो. परिणामी, जमिनीची स्थिरता राखून सुरक्षित आणि नियोजनबद्ध पद्धतीने बोगद्याचे खोदकाम करणे शक्य होते.
🔷संपूर्ण प्रकल्प फेब्रुवारी २०२९ पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे.
#mybmcupdates
@CMOMaharashtra
@mieknathshinde
@SunetraA_Pawar
@ShelarAshish
@MPLodha
@TawdeRitu
@misanjayghadi
🔷माननीय मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार, सार्वजनिक रस्ते, गल्ल्या आणि पदपथांवर फटाके फोडण्यास सक्त मनाई आहे.
🔷आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी संपर्क
🔷1916 (मदतसेवा क्रमांक)
आपत्कालीन व्यवस्थापन विभाग, मुख्यालय, बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई
[email protected]
#mybmcupdates
@CPCB_OFFICIAL
@mpcb_official
@EnvironmentMaha
@mybmcSWM
@MumbaiPolice
🔷बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने आश्रय योजना कक्ष, टप्पा-२ अंतर्गत नव्याने बांधण्यात आलेल्या कर्मचारी निवासस्थानांच्या चाव्यांचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. चावी वितरणाचा समारंभ राजवाडकर स्ट्रीट, पंचशील नगर, कुलाबा येथे आज पार पडला.
🔷महाराष्ट्राचे उप मुख्यमंत्री तथा पालकमंत्री (मुंबई शहर जिल्हा) श्री. एकनाथ शिंदे, महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष तथा स्थानिक आमदार अॅड. राहुल नार्वेकर यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. मुंबईच्या महापौर श्रीमती रितू राजेश तावडे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच उपमहापौर श्री. संजय घाडी यांच्या विशेष उपस्थितीत हा सोहळा पार पडला.
🔷सभागृह नेता श्री. गणेश खणकर, शिवसेना गटनेता श्री. अमेय घोले, महानगरपालिका आयुक्त श्रीमती अश्विनी भिडे, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. विपिन शर्मा, नगरसेवक अॅड. मकरंद नार्वेकर, स्थानिक नगरसेविका श्रीमती हर्षिता नार्वेकर, नगसेविका श्रीमती गौरवी शिवलकर-नार्वेकर, नामनिर्देशित नगरसेवक श्री. कमलाकर दळवी, उप आयुक्त (घनकचरा व्यवस्थापन) श्री. किरण दिघावकर, श्रीमती शायना एन. सी आदी उपस्थित होते.
🔷बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या वतीने आश्रय योजना कक्ष, टप्पा-२ अंतर्गत पंचशील नगर, राजवाडकर स्ट्रीट, कुलाबा येथे ४ हजार १६६.९० चौरस मीटर क्षेत्रफळावर दोन मजली इमारती बांधण्यात आल्या आहेत. तळमजला अधिक तीन मजल्याच्या या दोन्ही इमारतींमध्ये एकूण १४० सदनिका आहेत.
🔷स्वच्छता कर्मचारी पूर्वी १५० चौरस फुटांच्या घरांत राहायचे. त्याऐवजी आता त्यांच्यासाठी ३०० चौरस फूट क्षेत्रफळ असलेली सर्व सोयीसुविधांनी युक्त नवीन सेवानिवासस्थाने उपलब्ध झाली आहेत. यामध्ये स्वतंत्र स्नानगृह आणि शौचालयाची व्यवस्था आहे. या सदनिकांच्या बांधकामासाठी प्रीफॅब्रिकेटेड तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे.
#mybmcupdates
@CMOMaharashtra
@mieknathshinde
@SunetraA_Pawar
@ShelarAshish
@MPLodha
@TawdeRitu
@misanjayghadi
🔷मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत धारावी येथे मलजल प्रक्रिया केंद्राची (STP) उभारणी करण्यात येत आहे. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) श्री. अभिजीत बांगर यांनी या मलजल प्रक्रिया केंद्र प्रकल्पस्थळास भेट देऊन पाहणी केली. तसेच, प्रकल्पाच्या स्थापत्य, यांत्रिकी तसेच विद्युत अभियांत्रिकी कामांचा सविस्तर आढावा घेतला. मुंबई महानगराच्या मध्यवर्ती भागात उभारण्यात येत असलेल्या या महत्त्वाकांक्षी मलजल प्रक्रिया केंद्र प्रकल्पाची आतापर्यंत ७६ टक्के भौतिक प्रगती साध्य झाली असून, निर्धारित नियोजनापेक्षाही अधिक वेगाने प्रकल्पाचे काम सुरू आहे.
🔷प्रकल्प स्थळ पाहणीदरम्यान अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) श्री. अभिजीत बांगर यांनी मलजल प्रक्रियेसाठी आवश्यक असलेल्या विविध प्रक्रिया टाक्या, इनलेट व आउटलेट व्यवस्था, पंप हाऊस, स्लज प्रक्रिया युनिट, अंतर्गत पाइपलाइन तसेच अन्य स्थापत्य कामांच्या प्रगतीचा आढावा घेतला. यासोबतच पंप, एरेशन ब्लोअर्स, स्क्रीनिंग व स्लज प्रक्रिया यंत्रणा, विविध यांत्रिक उपकरणे आणि पाइपिंगच्या उभारणीची पाहणी केली. विद्युत अभियांत्रिकी कामांचादेखील त्यांनी आढावा घेतला.
🔷मुंबई महानगरातील पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून धारावी येथे ४१८ दशलक्ष लीटर प्रतिदिन क्षमतेच्या मलजल प्रक्रिया केंद्राची उभारणी केली जात आहे. मलजल प्रक्रिया केंद्राच्या उभारणीचे काम प्रकल्प स्थळी दिनांक ०५ जुलै २०२२ पासून सुरू झाले आहे. जागेची उपलब्धता कमी असल्याने वैशिष्ट्यपूर्ण रचनेच्या बहुमजली इमारतीत धारावी मलजल प्रक्रिया केंद्र उभारले जात आहे.
🔷बापट नाला आणि सफेद पूल येथून मिठी नदीत मिसळणारे मलजल बोगद्याद्वारे संकलित करून धारावी येथील मलजल प्रक्रिया केंद्राकडे वळविण्यात येणार आहे. यामुळे मिठी नदीत थेट मिसळणारे सुमारे १६८ दशलक्ष लिटर मलजल धारावी मलजल प्रक्रिया केंद्राकडे वळवून त्यावर शास्त्रोक्त प्रक्रिया करणे शक्य होणार आहे. परिणामी, मिठी नदीचे जलप्रदूषण रोखण्यास आणि नदीच्या पाण्याच्या गुणवत्तेत लक्षणीय सुधारणा घडवून आणण्यास मदत होणार आहे.या कामामध्ये सिक्वेन्सियल बॅचिंग रिअॅक्टर तंत्रज्ञान प्रस्तावित आहे. प्रकल्पामध्ये दररोज ४१८ दशलक्ष लीटर मलजलावर द्वितीय स्तरीय प्रक्रिया व त्यापैकी २०९ दशलक्ष लीटर मलजलावर तृतीय स्तरीय प्रक्रिया केली जाणार आहे. यासमवेतच, वर्ग 'अ' स्तरापर्यंत गाळ प्रक्रिया, प्रक्रियेअंती तयार होणाऱ्या बायोगॅसपासून वीज निर्मितीदेखील केली जाणार आहे. त्यामुळे ऊर्जेची बचत होण्यास तसेच पर्यावरणपूरक ऊर्जानिर्मितीस प्रोत्साहन मिळणार आहे.
🔷लिक्विड लाईन अंतर्गत विविध दहा घटकांची कामे सुरू असून, त्यापैकी ट्रॅश रॅकचे काम १०० टक्के पूर्ण झाले आहे. इनफ्लुएंट पंपिंग स्टेशनचे बांधकाम ७५ टक्के पूर्ण झाले असून, डिसेंबर २०२६ मध्ये यंत्रसामग्री बसविण्याचे काम सुरू होणार आहे. सिक्वेन्सिंग बॅच रिॲक्टर (SBR) युनिटचे बांधकाम ९९ टक्के पूर्ण झाले आहे. एअर ब्लोअर इमारतीचे बांधकामदेखील पूर्ण झाले आहे. या संपूर्ण कामांची पाहणी श्री. बांगर यांनी केली.
🔷दुहेरी बोगदा (Twin Tunnel) आणि रिसिविंग शाफ्ट (Receiving Shaft) बांधण्यासाठी महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण (MCZMA) कडून परवानगी प्राप्त झाली आहे. तथापि, राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेने (NIO) शिफारस केल्यानुसार प्रक्रिया केलेल्या मलजलाची विल्हेवाट करायची आहे. दुहेरी बोगद्याचे लॉन्चिंग शाफ्टचे काम नोव्हेंबर २०२६ अखेरपर्यंत पूर्ण करावे. संरक्षक भिंतीलगतच्या बाधित बांधकामांचे विभाग कार्यालयाच्या (Ward Office) माध्यमातून पुनर्वसन करावे. संरक्षक भिंत (Boundary Wall), अंतर्गत रस्त्यांची कामे (Road Works) पूर्ण करावीत, असे निर्देश श्री बांगर यांनी दिले.
🔷द्वितीय स्तरीय प्रक्रियेच्या लिक्विड लाईनचे काम फेब्रुवारी २०२७ पर्यंत पूर्ण करावे. सद्यस्थितीत प्रकल्पस्थळी दररोज ६८८ मनुष्यबळ कार्यरत आहे. कामाच्या ठिकाणी गुणवत्ता, सुरक्षितता आणि कार्यक्षमता यांना सर्वोच्च प्राधान्य द्यावे. जुलै २०२७ पर्यंत प्रकल्प कार्यान्वित करण्याचे उद्दिष्ट असले तरी, मे २०२७ पर्यंत मलजल प्रकल्पाचे काम पूर्ण करावे असे निर्देश अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) श्री. अभिजीत बांगर यांनी दिले.
🔷उपायुक्त (अभियांत्रिकी) श्री. शशांक भोरे, सहायक आयुक्त (जी दक्षिण विभाग) प्रमुख अभियंता (मुंबई मलनि:सारण प्रकल्प) श्री. राजेंद्र परब तसेच संबंधित अभियंते, सल्लागार उपस्थित होते.
#mybmcupdates
@CMOMaharashtra
@mieknathshinde
@SunetraA_Pawar
@ShelarAshish
@MPLodha
@TawdeRitu
@misanjayghadi
🔷बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने आश्रय योजना कक्ष, टप्पा-२ अंतर्गत राजवाडकर स्ट्रीट, पंचशील नगर, कुलाबा येथे दोन इमारती बांधण्यात आल्या आहेत.
🔷याठिकाणी स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठी ३०० चौरस फूट क्षेत्रफळ असलेली नवीन १४० सेवानिवासस्थाने उपलब्ध झाली आहेत.
🔷या सदनिकांमध्ये स्वतंत्र स्नानगृह व शौचालयासोबत विविध सोयीसुविधा उपलब्ध आहेत.
🔷या संदर्भातील ही चित्रफीत…
#mybmcupdates
@CMOMaharashtra
@mieknathshinde
@SunetraA_Pawar
@ShelarAshish
@MPLodha
@TawdeRitu
@misanjayghadi
🔷बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने आश्रय कक्ष, टप्पा-२ अंतर्गत नव्याने बांधण्यात आलेल्या कर्मचारी निवासस्थानांच्या चाव्यांचे वितरण
#MyBMCUpdates
@CMOMaharashtra
@mieknathshinde
@SunetraA_Pawar
@ShelarAshish
@MPLodha
@TawdeRitu
@misanjayghadi
🔷मुंबईतील वायू गुणवत्ता राखण्यासाठी तसेच रस्त्यांवरील धूळ आणि बांधकाम व पाडकामातून निर्माण होणाऱ्या राडारोड्यामुळे (C&D Waste) होणाऱ्या प्रदूषणास प्रतिबंध करण्याच्या उद्देशाने, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून दिनांक २८ ऑक्टोबर ते ६ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत रस्ते स्वच्छता व धूळ नियंत्रणासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.
🔷या मोहिमेतंर्गत आतापर्यंत ३६८.९१ टन धूळ आणि ७७९.५५ टन बांधकाम व पाडकाम राडारोडा संकलित करण्यात आला आहे.
🔷एकूण ९६६ स्वच्छता कर्मचारी आणि स्वयंसेवी संस्थांचे स्वयंसेवक यांच्यासह १६ जेसीबी, १९ डंपर, १९ बहुउद्देशीय मिस्टिंग मशीन, २२ मेकॅनिकल पॉवर स्वीपर, ५ वॉक-बिहाइंड ई-स्वीपर आणि ७ दुभाजक स्वच्छता यंत्रे, अशा एकूण ८८ संयंत्रांच्या सहाय्याने सखोल स्वच्छता करण्यात आली.
#MyBMCUpdates
🔷भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून पुरविण्यात येणाऱ्या विविध सेवा-सुविधांच्या पूर्वतयारीबाबत बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयात महानगरपालिका आयुक्त श्रीमती अश्विनी भिडे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष आढावा बैठक पार पडली.
🔷महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमी येथे अभिवादनासाठी येणाऱ्या अनुयायांना आवश्यक त्या सर्व नागरी सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महानगरपालिकेच्या सर्व संबंधित विभागांनी विशेष खबरदारी घ्यावी. तसेच, सजगतेने व समन्वयाने कार्यरत राहून प्रत्येकाने आपापली जबाबदारी चोखपणे पार पाडावी, असे निर्देश श्रीमती भिडे यांनी यावेळी दिले.
🔷मा. नगरसेवक श्री. अनिल कदम, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) श्रीमती प्राजक्ता वर्मा-लवंगारे, उप आयुक्त (आयुक्त कार्यालय) श्री. प्रशांत गायकवाड, उप आयुक्त (परिमंडळ २) श्री. प्रशांत सपकाळे, उप आयुक्त (परिमंडळ ७) श्री. मनीष वळंजू, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे संबंधित सहायक आयुक्त आणि संबंधित अधिकारी यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी व सदस्य तसेच पोलीस प्रशासनातील अधिकारीही यावेळी उपस्थित होते.
#mybmcupdates
@CMOMaharashtra
@mieknathshinde
@SunetraA_Pawar
@ShelarAshish
@MPLodha
@TawdeRitu
@misanjayghadi
🔷मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) – २०२६ कार्यक्रम अंतर्गत प्रारुप मतदार यादीतील नाव किंवा नोंदीबाबत दावे व हरकती दाखल करण्यासाठी प्राप्त प्रलंबित अर्जांचा वेळेत निपटारा करावा, असे निर्देश महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी श्री. एस. चोक्कलिंगम यांनी दिले आहेत.
🔷जिल्हा निवडणूक अधिकारी तथा बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त श्रीमती अश्विनी भिडे आणि महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी श्री. एस. चोक्कलिंगम यांच्या प्रमुख उपस्थितीत मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) – २०२६ कार्यक्रम संदर्भात महानगरपालिका मुख्यालयात आज आढावा बैठक पार पडली.
🔷अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी तथा अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) श्रीमती प्राजक्ता वर्मा- लवंगारे, अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी तथा अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. विपिन शर्मा, अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी तथा अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) श्री. अभिजीत बांगर, अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी तथा अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अविनाश ढाकणे, कोकण विभागाचे मतदार यादी निरीक्षक डॉ. किरण कुलकर्णी, सह मुख्य निवडणूक अधिकारी (महाराष्ट्र) श्री. मनोहर पारकर, सह आयुक्त (करनिर्धारण व संकलन) श्री. विश्वास शंकरवार, सर्व मतदार नोंदणी अधिकारी (ईआरओ) आदींची यावेळी उपस्थिती होती.
#mybmcupdates
#SIR
#SIR2026
#SpecialIntensiveRevision
@maharashtrasec
@ecisveep
@CEO_Maharashtra
मुंबईच्या वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणिसंग्रहालयात आशियाई सिंह येण्याचा मार्ग मोकळा!
साकरबाग प्राणिसंग्रहालय आणि मुंबई प्राणिसंग्रहालय या दोघांदरम्यान सामंजस्य करार करण्याचे गुजरातचे मुख्यमंत्री श्री. भूपेंद्रभाई पटेल यांचे निर्देश
मुंबईच्या महापौर श्रीमती रितू तावडे यांनी मुख्यमंत्री श्री. पटेल यांना आज प्रत्यक्ष भेटून केलेल्या प्रयत्नांना यश, मुंबईला महापौरांकडून दिवाळी भेट
🔷मुंबईतील भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालयात (राणी बाग) आशियाई सिंह दाखल होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. याबाबतच्या प्रस्तावाला मंजुरी मिळण्यासंदर्भात मुंबईच्या महापौर श्रीमती रितू राजेश तावडे यांनी गुजरातचे मुख्यमंत्री श्री. भूपेंद्रभाई पटेल यांची गांधीनगर (गुजरात) येथील मुख्यमंत्री निवास येथे आज (दिनांक ४ नोव्हेंबर २०२६) सायंकाळी प्रत्यक्ष भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. ही भेट अतिशय सकारात्मक व फलदायी ठरली आहे.
🔷याबाबत, लवकरात लवकर प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करून, जुनागढचे साकरबाग प्राणिसंग्रहालय आणि मुंबई प्राणिसंग्रहालय यांच्यादरम्यान सामंजस्य करार करण्याचे निर्देश गुजरातचे मुख्यमंत्री श्री. भूपेंद्रभाई पटेल यांनी गुजरात राज्य प्रशासनाला दिले आहेत. त्यानुसार बृहन्मुंबई महानगरपालिकेला लवकरच गुजरात शासनाकडून मंजुरीचे लेखी पत्र आणि सामंजस्य करार मसुदा प्राप्त होणार आहे. या मंजुरीमुळे मुंबईच्या महापौर श्रीमती रितू तावडे यांनी मुंबईला एकप्रकारे दिवाळी भेट दिली आहे.
🔷या भेटीवेळी गुजरातचे मुख्यमंत्री श्री. भूपेंद्रभाई पटेल, मुंबईच्या महापौर श्रीमती रितू तावडे यांच्यासह ध्रंगध्रा विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री. प्रकाशभाई वरमोरा, गुजरात मुख्यमंत्री कार्यालयातील प्रधान सचिव श्री. संजीव कुमार, क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष श्री. जक्षय शाह, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे संचालक (प्राणिसंग्रहालय) डॉ. संजय त्रिपाठी आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.
🔷गुजरातचे वन राज्यमंत्री श्री. प्रवीणकुमार माळी यांचीदेखील मुंबईच्या महापौर श्रीमती रितू तावडे यांनी आज गांधीनगर येथे भेट घेतली. मुंबई प्राणिसंग्रहालयाला आशियाई सिंह लवकर द्यावेत, यासाठी वन विभागाला योग्य ते निर्देश देण्याची विनंती महापौरांनी राज्यमंत्री श्री. माळी यांना केली. त्यावर, श्री. माळी यांनीदेखील महापौरांचे निवेदन स्वीकारून त्यावर तत्काळ शेरा लिहून वन खात्याच्या प्रधान सचिवांना कार्यवाहीचे निर्देश दिले.
🔷गुजरातमधील जुनागढ येथील प्रसिद्ध साकरबाग प्राणिसंग्रहालयाकडून मुंबईतील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालयासाठी दोन जोड्या (२ नर व २ मादी) आशियाई सिंह देण्याचा प्रस्ताव आहे. या बदल्यात मुंबई प्राणिसंग्रहालयातर्फे तीन जोड्या टफ्टेड कॅपुचिन माकडे (Tufted Capuchin Monkeys) साकरबाग प्राणिसंग्रहालयास देण्यात येणार आहे. दोन्ही प्राणिसंग्रहालयांनी या देवाणघेवाणीस आधीच संमती दर्शविली आहे.
🔷केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरण (CZA) (नवी दिल्ली) यांच्या अंतिम मान्यता प्राप्त आराखड्यानुसार (मास्टर लेआऊट प्लॅन) मुंबई प्राणिसंग्रहालयात आशियाई सिंहांसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे अत्याधुनिक निवासस्थान (Exhibit) सज्ज करण्यात आले आहे.
🔷मुंबईच्या महापौर श्रीमती रितू राजेश तावडे यांच्या या सक्रिय पुढाकारामुळे दोन्ही राज्यांमधील वन्यजीव संवर्धन सहकार्याला नवी दिशा मिळाली आहे. ही भेट महाराष्ट्र आणि गुजरात यांच्यातील नैसर्गिक वारसा व परस्पर सौहार्दाचे उत्तम प्रतीक ठरणार आहे.
#MyBMCUpdates
@CMOMaharashtra
@mieknathshinde
@SunetraA_Pawar
@ShelarAshish
@MPLodha
@TawdeRitu
@misanjayghadi
🔷दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर, मुंबईतील महिला बचत गटांनी निर्मित केलेल्या विविध वस्तूंचे प्रदर्शन आज बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयात भरविण्यात आले.
🔷महिला व बालकल्याण समितीच्या अध्यक्षा श्रीमती मीनल तुर्डे, महानगरपालिका आयुक्त श्रीमती अश्विनी भिडे, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) श्रीमती प्राजक्ता वर्मा-लवंगारे,अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. विपिन शर्मा, संचालक (नियोजन) डॉ. (श्रीमती) प्राची जांभेकर यांनी भेट देऊन प्रदर्शनातील वस्तूंची खरेदी केली. महानगरपालिका मुख्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही या प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
🔷महानगरपालिकेच्या सर्व प्रशासकीय विभाग कार्यालयांमध्येही दिवाळीनिमित्त प्रदर्शन-विक्रीसाठी स्टॉल उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
🔷महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनविण्यासह गरजू महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या नियोजन विभागामार्फत महिला बचत गटांना प्रोत्साहन दिले जाते. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून महिला व बालकल्याण योजना तसेच दीनदयाळ अंत्योदय योजना–राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.
🔷दिवाळी सणानिमित्त आयोजित या प्रदर्शनामुळे महिला बचत गटांना त्यांच्या उत्पादनांच्या विक्रीतून उत्पन्न मिळविण्याची संधी उपलब्ध झाली. या प्रदर्शनात उटणे, अगरबत्ती, ज्यूट बॅग्ज, इमिटेशन ज्वेलरी, मोत्यांचे दागिने, रांगोळी, सुवासिक द्रव्ये, सुशोभित पणत्या, विविध प्रकारची आकर्षक तोरणे, आकाशकंदील आदी सजावटीच्या वस्तूंसह विविध खाद्यपदार्थ विक्रीसाठी मांडण्यात आले होते.
🔷बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या विशेष शाळांमधील दिव्यांग विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पकतेने व स्वहस्ते तयार केलेल्या सुंदर आणि नाविन्यपूर्ण वस्तूही या प्रदर्शनात मांडण्यात आल्या होत्या. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन मिळावे आणि आत्मविश्वास वाढावा, यासाठी त्यांना या प्रदर्शनात सामावून घेण्यात आले.
#MyBMCUpdates
@CMOMaharashtra
@mieknathshinde
@SunetraA_Pawar
@ShelarAshish
@MPLodha
@TawdeRitu
@misanjayghadi
🔷बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या 'पेडेस्ट्रियन फर्स्ट' (Pedestrian First) अभियान अंतर्गत शामलदास गांधी मार्ग (प्रिन्सेस स्ट्रीट) उड्डाणपुलाखालील परिसराचे सुशोभिकरण करण्यात आले आहे. या परिसरात आता सुरक्षित पादचारी मार्ग, उद्यान, वृक्षारोपण आणि आकर्षक सुशोभीकरण करण्यात आले आहे. या विकसित परिसराचे महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष तथा स्थानिक आमदार श्री. राहुल नार्वेकर यांच्या हस्ते आज लोकार्पण करण्यात आले.
🔷या लोकार्पण सोहळ्यास सी व डी प्रभाग समिती अध्यक्ष श्री. आकाश पुरोहित, स्थानिक नगरसेविका श्रीमती रिटा मकवाना, उप आयुक्त (परिमंडळ १) श्रीमती चंदा जाधव तसेच सहायक आयुक्त (सी विभाग) श्री. सुनील माने, स्थानिक रहिवासी यांची प्रमुख उपस्थिती होती.
🔷या प्रकल्पांतर्गत ई रोडवर सुमारे १५० मीटर लांबीचा नवीन पदपथ बांधण्यात आला आहे. तसेच एच रोडवर सुमारे १०० मीटर लांबीचे वळणदार पादचारी मार्ग विकसित करण्यात आले आहेत. ई रोडलगतच्या भिंतीवर सुमारे ४०० चौरस मीटर क्षेत्रफळात आकर्षक त्रिमितीय (३डी) भित्तिचित्र साकारण्यात आले आहे. तसेच संपूर्ण २५० मीटर लांबीच्या परिसरात आकर्षक सजावटीचे विद्युत खांब बसविण्यात आले आहेत.
🔷या प्रकल्पामुळे शामलदास गांधी मार्ग ( प्रिन्सेस स्ट्रीट) उड्डाणपुलाखालील पूर्वी दुर्लक्षित आणि वाहतुकीस अडथळा ठरणारा परिसर सुरक्षित, सुशोभित आणि हरित सार्वजनिक जागेत रूपांतरित झाला आहे. पादचाऱ्यांना सुरक्षितपणे ये-जा करण्यासाठी सुविधा उपलब्ध होण्यासोबतच नागरिकांना विरंगुळ्यासाठी एक आकर्षक जागाही उपलब्ध झाली आहे.
#mybmcupdates
@CMOMaharashtra
@mieknathshinde
@SunetraA_Pawar
@ShelarAshish
@MPLodha
@TawdeRitu
@misanjayghadi
@rahulnarwekar
🔷बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत राबविण्यात येत असलेल्या 'रस्ते स्वच्छता व धूळ नियंत्रण मोहीम' अंतर्गत वांद्रे-कुर्ला संकुल जोड मार्गावर (बीकेसी कनेक्टर रोड) आणि धारावी टी जंक्शन येथे स्वच्छता करण्यात आली.
🔷या अंतर्गत एकूण ५.१ किलोमीटर रस्त्याची स्वच्छता करण्यात आली. त्यामध्ये एकूण १.६ टन धूळ व गाळ तसेच ३ टन बांधकाम व पाडकाम (C&D) राडारोडा संकलित करण्यात आला.
🔷महानगरपालिकेचे ३५ स्वच्छता कर्मचारी व १० स्वयंसेवी संस्थेचे स्वयंसेवक यावेळी विविध संयंत्रांसह कार्यरत होते.
#mybmcupdates
@CMOMaharashtra
@mieknathshinde
@SunetraA_Pawar
@ShelarAshish
@MPLodha
@TawdeRitu
@misanjayghadi
माझी Mumbai, आपली BMC retweeted
राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान अंतर्गत कार्यरत ७१९ आशा स्वयंसेविकांनाही प्रत्येकी पाच हजार रुपये भाऊबीज भेट
महापौर श्रीमती रितू तावडे यांचे निर्देश
आशा स्वयंसेविका; आरोग्य स्वयंसेविका, बालवाडी शिक्षिका व मदतनिसांसह सर्व घटकांच्या कामाची बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून दखल
🔷दीपावली २०२६ निमित्त बृहन्मुंबई महानगरपालिकेतील आशा स्वयंसेविकांबाबत महापौर श्रीमती रितू तावडे यांनी महत्त्वपूर्ण आणि संवेदनशील निर्णय घेतला आहे. महानगरपालिकेच्या अखत्यारीतील १,४६१ आशा स्वयंसेविकांना पहिल्यांदाच प्रत्येकी ५,००० रुपये भाऊबीज भेट जाहीर केल्यानंतर, आता राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान (NUHM) अंतर्गत बृहन्मुंबई महानगरपालिकेसाठी कार्यरत असलेल्या ७१९ आशा स्वयंसेविकांचाही यामध्ये समावेश करण्यात आला आहे. यामुळे मुंबईत आरोग्य सेवेत कार्यरत असलेल्या एकूण २,१८० आशा स्वयंसेविकांना प्रथमच ५,००० रुपयांचे दीपावली सानुग्रह अनुदान मिळणार आहे.
🔷प्रारंभी, महानगरपालिकेच्या १,४६१ आशा स्वयंसेविकांना भाऊबीज भेट जाहीर झाली होती. याच धर्तीवर मुंबईत तळागाळात आरोग्य सेवा देणाऱ्या राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानातील (NUHM) आशा स्वयंसेविका या लाभापासून वंचित राहू नयेत, यासाठी महापौर श्रीमती रितू तावडे यांनी व्यक्तिशः पुढाकार घेतला. त्यांनी प्रशासनाला निर्देश देत उर्वरित ७१९ आशा स्वयंसेविकांनाही समान न्याय मिळवून दिला आणि त्यांचा समावेश या सानुग्रह अनुदानात करून घेतला आहे.
🔷महानगरपालिकेचे नियमित अधिकारी व कर्मचाऱ्यांप्रमाणेच जनसामान्यांशी थेट जोडल्या गेलेल्या इतर सर्व घटकांच्या कामाचीही महानगरपालिकेने यथोचित दखल घेतली आहे. या निर्णयानुसार महानगरपालिकेतील २,३९३ सामाजिक आरोग्य स्वयंसेविकांना (CHV) प्रत्येकी १४,००० रुपये, तर २,३६० बालवाडी शिक्षिका आणि मदतनिसांना प्रत्येकी ७,००० रुपयांची भाऊबीज भेट दिली जाणार आहे.
🔷मुंबईकरांच्या आरोग्याची अहोरात्र काळजी घेणाऱ्या आशा व आरोग्य स्वयंसेविका आणि बालकांच्या शिक्षणाचा पाया रचणाऱ्या बालवाडी शिक्षिका-मदतनीस हे सर्व जण महानगरपालिकेच्या यंत्रणेचा महत्त्वाचा भाग आहेत, असे नमूद करून या सर्व भगिनींची दिवाळी आनंदाची व उत्साहाची व्हावी, याच उद्देशाने हा सर्वसमावेशक निर्णय घेण्यात आल्याचे महापौर श्रीमती रितू तावडे यांनी स्पष्ट केले आहे.
@CMOMaharashtra
@mieknathshinde
@SunetraA_Pawar
@ShelarAshish
@MPLodha
@TawdeRitu
@misanjayghadi
🔷Committing to Cleaner Air in Mumbai! Mitigate Dust Pollution!
#mybmcupdates
@CMOMaharashtra
@mieknathshinde
@SunetraA_Pawar
@ShelarAshish
@MPLodha
@TawdeRitu
@misanjayghadi
🔷मुंबईच्या स्वच्छ हवेसाठी कटिबद्ध होऊया! धूळ रोखूया, प्रदूषण टाळूया!
#mybmcupdates
@CMOMaharashtra
@mieknathshinde
@SunetraA_Pawar
@ShelarAshish
@MPLodha
@TawdeRitu
@misanjayghadi
🔷मुंबई मराठी साहित्य संघाचा ९१ वा वर्धापन दिन आणि 'वाचन प्रेरणा दिन' आज सायंकाळी मुंबई मराठी साहित्य संघाच्या डॉ. अ. ना. भालेराव सभागृहात संपन्न झाला.
🔷या समारंभाचे अध्यक्षपद सुप्रसिद्ध ज्येष्ठ नाट्यकर्मी श्रीमती रोहिणी हट्टंगडी यांनी भूषविले. प्रमुख अतिथी म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्त श्रीमती अश्विनी भिडे या होत्या.
🔷या सोहळ्यात 'दिवाळी अंक प्रकाशन साहित्य विशेषांक' तसेच मुंबई मराठी साहित्य संघ प्रा. प्रतिभा सराफ संपादित 'मराठी ग़ज़ल : एक दृष्टिक्षेप या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी 'तेथे कर अपुले जुळती' हा विशेष कार्यक्रम पार पडला. या वेळी साहित्य संघाकडून विविध पुरस्कार वितरित करण्यात आले.
🔷मुंबई मराठी साहित्य संघाच्या अध्यक्ष प्रा. उषा तांबे, कार्याध्यक्ष डॉ. उज्ज्वला मेहेंदळे, प्रमुख कार्यवाह डॉ. अश्विनी भालेराव-गांधी, कोषाध्यक्ष श्री. आनंद बिर्जे, कार्यवाह प्रा. प्रतिभा सराफ, श्रीमती मंगल केंकरे, आदींसह साहित्य क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
#mybmcupdates
@CMOMaharashtra
@mieknathshinde
@SunetraA_Pawar
@ShelarAshish
@MPLodha
@TawdeRitu
@misanjayghadi
@AshwiniBhide































