Yogesh nawale patil (@Dialecticsy) header
Yogesh nawale patil (@Dialecticsy) profile picture

मा.श्री.देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वावर विश्वास 🙏 श्री.देवेंद्र फडणवीस यांच्या विकासात्मक दृष्टिकोनाचा समर्थक 📈⛳

Pune, India
Joined September 2016
Photo by Yogesh nawale patil (@Dialecticsy)Photo by Yogesh nawale patil (@Dialecticsy)Photo by Yogesh nawale patil (@Dialecticsy)Photo by Yogesh nawale patil (@Dialecticsy)Photo by Yogesh nawale patil (@Dialecticsy)Photo by Yogesh nawale patil (@Dialecticsy)Photo by Yogesh nawale patil (@Dialecticsy)Photo by Yogesh nawale patil (@Dialecticsy)
Yogesh nawale patil retweeted
काल रात्री राज्याचे धुरंदर मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना फोन करून स्पर्धा परीक्षा करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने मनःपूर्वक आभार व्यक्त केले. इतक्या दिवसांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर अखेर काल MPSC च्या इतिहासातील सर्वात मोठ्या भरती प्रक्रियेची घोषणा झाली. तब्बल १६,७१७ जागांची घोषणा राज्य शासन आणि MPSC ने अधिकृत प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली. परीक्षा तीन आठवड्यांनी पुढे गेली असली, तरी आपण निवेदनातून केलेल्या मागणीनुसार ती जानेवारी महिन्यातच होत आहे, ही निश्चितच समाधानाची बाब आहे. या निर्णयामुळे राज्यातील हजारो विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र, विद्यार्थ्यांमध्ये सध्या एक प्रश्न उपस्थित होत आहे की, कोअर MPSC अर्थात नॉन-टेक्निकल (Qualification – Any Degree) पदांच्या जागांमध्ये अपेक्षित वाढ झालेली नाही. मला या निमित्ताने प्रत्येक विद्यार्थ्याला एकच सांगायचे आहे, तुम्ही आता २४ जानेवारी रोजी होणाऱ्या Group-C Prelims 2026 च्या अनुषंगाने फक्त आणि फक्त आपल्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करा. विद्यार्थी बंधू-भगिनींनो तुमचा प्रतिनिधी म्हणून तुम्हाला विश्वास देतो की, नॉन-टेक्निकल पदांच्या जागा कशा वाढवता येतील, यासाठी माझा पाठपुरावा कालपासूनच सुरू झाला आहे. सहकार विभाग, समाजकल्याण विभाग यांसह इतर विभागांमधील रिक्त पदे लवकरात लवकर भरती प्रक्रियेत समाविष्ट व्हावीत, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. हा विषय काल रात्रीच देवेंजींच्या निदर्शनास आणून दिला आहे. मित्रांनो, मला तुमच्या मेहनतीची, तुमच्या संघर्षाची आणि या परीक्षेसाठी तुम्ही घेत असलेल्या कष्टांची जाणीव आहे. अनेक विद्यार्थी वर्षानुवर्षे या एका संधीची वाट पाहत आहेत. कोणाचे वय वाढत चालले आहे, कोणावर कौटुंबिक जबाबदाऱ्या आहेत, तर कोणाचे आई-वडील आपल्या मुलाच्या यशाची आशा डोळ्यांत साठवून बसले आहेत. त्यामुळे प्रत्येक जागा आणि प्रत्येक संधी आपल्यासाठी किती महत्त्वाची आहे, याची मला पूर्ण जाणीव आहे. १६,७१७ जागांचा ऐतिहासिक टप्पा आपण गाठला आहे. आता नॉन-टेक्निकलच्या जागांमध्येही अपेक्षित वाढ व्हावी, यासाठी मी पूर्ण ताकदीने पाठपुरावा करणार आहे. तुम्ही फक्त अभ्यास करा, बाकी तुमच्या प्रश्नांसाठी तुमचा हा सहकारी, विद्यार्थी चळवळीतील एक कार्यकर्ता म्हणून मी प्रामाणिकपणे प्रयत्न करत राहीन. तुमच्या स्वप्नांच्या आड येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी माझा संघर्ष सुरूच राहील! @Dev_Fadnavis @mpsc_office @VRadhaIAS
97
182
8
277
8,220
Yogesh nawale patil retweeted
Group C 2026 परीक्षेमध्ये १६,००० हून अधिक पदांचा समावेश करण्यासह उमेदवारांना एक वर्षाची वयोमर्यादा वाढ देण्याच्या निर्णयाबद्दल सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि महाराष्ट्र शासनाचे मनःपूर्वक अभिनंदन व आभार! V. राधा समितीने आपल्या अहवालात केलेल्या शिफारशीनुसार, Group C 2026 परीक्षेच्या माध्यमातून १६,००० हून अधिक पदांची भरती करण्यात यावी. तसेच, उर्वरित सर्व रिक्त पदांचे शुद्धीपत्रक तातडीने अधिकृतरीत्या प्रसिद्ध करण्यात यावे. कोणत्याही पात्र उमेदवाराला या महत्त्वपूर्ण संधीपासून वंचित राहावे लागू नये, यासोबतच सदर परीक्षा कोणत्याही परिस्थितीत जानेवारी महिन्यातच घेण्यात यावी, अशी राज्यभरातील हजारो विद्यार्थ्यांची आग्रही मागणी आहे. विद्यार्थ्यांच्या या मागण्यांचे गांभीर्य लक्षात घेऊन मी सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याशी दूरध्वनीद्वारे सविस्तर चर्चा केली आणि या विषयासंदर्भातील विद्यार्थ्यांच्या भावना व अपेक्षा त्यांच्यासमोर मांडल्या. या चर्चेदरम्यान, वर्णनात्मक परीक्षा पद्धतीमुळे विद्यार्थ्यांच्या मनात निर्माण झालेली अपारदर्शकतेची भावना आणि त्यासंदर्भातील विविध शंकाही मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिल्या. तसेच, राज्यसेवा परीक्षेच्या वस्तुनिष्ठ (Objective) स्वरूपातील परीक्षा पद्धतीसह इतर विविध विद्यार्थीहिताच्या विषयांवरही सकारात्मक चर्चा झाली. मला विश्वास आहे की, ही चर्चा अत्यंत सकारात्मक आणि फलदायी ठरली आहे. त्यामुळे यंदाच्या दिवाळीत राज्यातील स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि भावी अधिकाऱ्यांना निश्चितच आणखी एक आनंदाची बातमी मिळेल, अशी अपेक्षा आहे. @Dev_Fadnavis @mpsc_office @CMOMaharashtra
92
292
5
321
7,246
Yogesh nawale patil retweeted
Descriptive Pattern / Objective Pattern हे जे पोरं MPSC #Prelims उत्तीर्ण झाले त्यांना विचारायला हवं. काही माठखैरे..तलाठी MPSCत आली म्हणून MPSC देताय.. त्यांना तर OBJECTIVE तुक्केबाजीच आवडणार..! पण; जोपर्यंत Descriptive साठी Infrastructure नाही तोपर्यंत OBJECTIVE असूद्या! ✅
1
2
3
8
1,521
साहेबांना जरा reality check दिला.तर साहेबांनी block करून टाकलं 🤣🤣 Classes ची लॉबी खूप मोठी आहे. ज्या ज्ञानेशकुमार यांच्याविषयी साहेब काल पासून बोलून बोलून मीडिया publicity घेत आहेत ते "ज्ञानेशकुमार" कोणत्या pattern ची परीक्षा देऊन पास झाले आहेत. @ashish_jadhao
9
25
99
3,200
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात पार पडलेली ‘व्ही. राधा समिती’ची बैठक ही लाखो स्पर्धा परीक्षार्थींच्या मूलभूत मागण्यांकडे दुर्लक्ष करणारी आणि विद्यार्थ्यांच्या तोंडाला पाने पुसणारी सरकारपुरस्कृत प्रशासकीय ‘औपचारिकता’ ठरली आहे. हजारो विद्यार्थ्यांनी एकमुखाने #ObjectivePattern व सर्व एक्साम #offline ची ठाम मागणी लावून धरलेली असताना, समितीच्या अध्यक्षा मा. व्ही. राधा यांनी या अत्यंत महत्त्वाच्या आणि विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी थेट संबंधित मागणीबाबत एकही स्पष्ट भूमिका मांडली नाही. या प्रमुख मुद्द्यावर त्यांनी सोयीस्कर मौन का बाळगले, हा प्रश्न लाखो विद्यार्थ्यांना पडला आहे. विद्यार्थ्यांच्या परीक्षा पद्धतीमध्ये आवश्यक सुधारणा करण्यासाठी आणि त्यांचे मत जाणून घेण्यासाठी समितीची स्थापना करण्यात आली असेल, तर विद्यार्थ्यांची सर्वाधिक आग्रही मागणी असलेल्या #ObjectivePattern या मुद्द्यावर सविस्तर चर्चा होणे अपेक्षित होते. मात्र, तसे न होता आधीच निश्चित करण्यात आलेल्या डिस्क्रिप्टिव्ह आणि ऑनलाइन परीक्षा पद्धतीचाच आग्रह धरला जात असेल, तर ही प्रक्रिया नेमकी कोणाच्या हितासाठी राबवली जात आहे, याचे स्पष्टीकरण प्रशासनाने देणे आवश्यक आहे. ‘शिक्षणाचे माहेरघर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात डिस्क्रिप्टिव्ह पद्धतीचे समर्थन करणाऱ्या खासगी क्लासचालकांचे म्हणणे ऐकून घेणे आणि दुसरीकडे उन्हातान्हात आपल्या न्याय्य मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या प्रामाणिक विद्यार्थ्यांना पुरेसा संवाद व प्रतिनिधित्वाची संधी न देणे, हा कोणता न्याय? पहिल्याच डिस्क्रिप्टिव्ह परीक्षेच्या मूल्यमापन प्रक्रियेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झालेले असताना, त्याच परीक्षा पद्धतीचा पुनर्विचार न करता तिचाच आग्रह का धरला जात आहे? विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याशी संबंधित निर्णय घेताना पारदर्शकता, निष्पक्षता आणि विद्यार्थ्यांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. जर या समितीचा दौरा आणि बैठक केवळ विशिष्ट घटकांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करण्यासाठी आयोजित करण्यात आली असेल, तर त्याचा आम्ही तीव्र निषेध करतो. ही समिती विद्यार्थ्यांच्या प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी आहे की केवळ त्यांच्या डोळ्यात धूळफेक करण्यासाठी, याचे स्पष्ट उत्तर प्रशासनाने द्यावे. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित निर्णय विद्यार्थ्यांना विश्वासात न घेता आणि त्यांच्या प्रमुख मागण्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून घेतले जाणार असतील, तर हा अन्याय आम्ही कोणत्याही परिस्थितीत सहन करणार नाही. विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांकडे दुर्लक्ष करण्याचा हा प्रकार तात्काळ थांबवावा आणि #ObjectivePattern बाबत स्पष्ट, पारदर्शक व लेखी भूमिका जाहीर करावी. अन्यथा, प्रशासनाला विद्यार्थ्यांच्या तीव्र आंदोलनाला आणि जनतेच्या प्रश्नांना सामोरे जावे लागेल. @maha_governor @MahaDGIPR @bhimanwar @mpsc_office @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mieknathshinde @SunetraA_Pawar @RahulGandhi @PawarSpeaks @NANA_PATOLE @INCHarshsapkal @supriya_sule @vishwajeetkadam @satejp @atullondhe @Jayant_R_Patil @VijayWadettiwar @TV9Marathi @abpmajhatv @zee24taasnews @saamTVnews @News18lokmat @SakalMediaNews @LoksattaLive @lokmat @mataonline @ashish_jadhao @waglenikhil @_prashantkadam @aajtak @mumbaitak @pudharionline @LokshahiMarathi @bolbhidu @RahulAsks @omkarasks @sahiljoshii
154
1,271
18
1,072
38,764
ASO ते SO पदोन्नतीची प्रक्रिया करून रिक्त ASO पदांचा अहवाल तयार करण्यास तब्बल ४ महिने उलटले, तरीही अद्याप अहवाल तयार झालेला नाही. यांना मुद्दाम रिक्त पदांची माहिती पाठवायची नाही आणि नंतर सरळसेवेच्या ASO पदांच्या जागा पदोन्नतीधारकांना “तदर्थ पदोन्नती” या नावाखाली वाटून टाकण्याचा डाव आखला जात आहे. याच हेतूने विविध पळवाटा शोधल्या जात आहेत. यावर सर्वांनी गांभीर्याने विचार करावा…! @INCHarshsapkal @VarshaEGaikwad @MahaChiefSec @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @mieknathshinde
6
97
1
109
2,839
Yogesh nawale patil retweeted
'एमपीएससी'च्या राज्यसेवा परीक्षा -२०२४ च्या निकालाबाबत उमेदवारांमध्ये नाराजी आहे. अनेक उमेदवारांना तीनही टप्पे यशस्वीपणे पार करुनही अंतीम यादीतून वगळण्यात आले आहे. तर काही उमेदवारांना किरकोळ तांत्रिक कारणे पुढे करुन मुलाखतीसाठी अपात्र ठरविण्यात आले. या प्रक्रियेत पारदर्शकतेचा अभाव असल्याचा या सर्वांचा आरोप आहे. माझी शासनाला विनंती आहे की कृपया आपण याची दखल घ्यावी. एकाही पात्र उमेदवारावर अन्याय होऊ नये याची कृपया काळजी घ्यावी. तसेच या उमेदवारांचे म्हणणे ऐकून घेऊन त्यासंदर्भात योग्य ती कार्यवाही करावी. @CMOMaharashtra
19
119
2
231
12,973
🔶 रोगापेक्षा इलाज भयंकर करणाऱ्या महाराष्ट्र नागरी सेवा संयुक्त परीक्षा 2024 चा मराठा आरक्षणसंदर्भात एक वर्षापासून खेळखंडोबा करणाऱ्या @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mpsc_office @Drsuvarnas यांनी असंविधानिकपणे व स्वतःचेच कायदे, नियम ,अटी ,शर्ती धाब्यावर बसवून जाहिरात न्यायप्रविष्ट होऊन 4-5 वर्ष तरी अडकून कशी राहील याची जातीने काळजी घेतली आहे, धन्यवाद 🙏🙏🙏 🔶 मा. @mpsc_office @Drsuvarnas ma'am दोन दिवसापूर्वी आपण सुधारित निकाल जाहीर करून नवीन 318 EWS उमेदवारांना सामावून घेतले. 👉 link open न् करता असा कोणता साक्षात्कार झाला? 👉कोणता निकष /नियम लावला गेला ? 👉जर हे उमेदवार पात्र होते तर 12 मार्च च्या निकालात यांची नावे का नव्हते ? 👉 आधी त्यांनी असे कोणते पाप केले ज्याची त्यांना शिक्षा मिळाली ? 👉 मूळ मुद्दा पुन्हा बाजूला करून original EWS व मराठा SEBC व काही कुणबी (OBC) ह्यांचा जो घोळ झालाय तो अजूनही आपल्या लक्षात आला नाही काय ? 👉 सुधारित निकाल मध्ये 318 EWS उमेदवार आले,त्यापैकी original EWS किती आहेत ? category change न केलेले SEBC व कुणबी किती आहेत ?? याचे उत्तर #MPSC ला द्यावेच लागेल 👉 मा.मुख्यमंत्री @Dev_Fadnavis साहेब 2019 ला न टिकणारे मराठा आरक्षण दिले, EWS व SEBC वादात 5 -5 वर्ष जाहिराती न्यायप्रविष्ट होऊन बसल्या, अजूनही काही जणांना नियुकी नाही. मराठा उमेदवारांचा खेळ मांडून् ठेवला होता,अजूनही आपले समाधान झाले नाही काय ????? पुन्हा 2024 पासुन् तेच करत आहात 👉 2024 ला मराठा समाजाला आरक्षण दिले,काहींना कुणबी प्रमाणपत्र दिले. पण हे सर्व आरक्षण आपण "मुद्दाम " retrospectively ( पूर्वलक्ष प्रभाव ) लागू केले,जेणेकरून आधी आलेल्या जाहिराती सुद्धा ह्या आपोआपच कोर्टात अडकून राहतील,नियुक्तीचा प्रश्नच नको. 👉 मराठा ,EWS,कुणबी मध्ये आपोआप वाद होऊन परीक्षेला बसणाऱ्या प्रत्येक category च्या उमेदवाराला ह्याचा फटका बसायलाच हवा याची मात्र आपण पुरेपूर काळजी घेतली. 🔶🔶 मा. @mpsc_office @Drsuvarnas #MPSC च्याच नियमानुसार पूर्व परीक्षा form मध्ये भरलेली महत्वाची सर्व माहिती त्या जाहिरातीच्या अंतिम टप्प्यापर्यंत कायम राहते,त्यात कोणताच बदल करता येत नाही,केल्यास अंतिम टप्प्यावर त्या उमेदवाराला या प्रक्रियेतून बाद करण्यात येते. बरोबर ना ? मग गेल्या एक वर्षात मराठा आरक्षण मुळे 4 वेळेस postpone केलेल्या exam चा तोच गोंधळ अजूनही कायम आहेच,त्याचे काय ???? 👉 category change न करून SEBC असून देखील EWS मध्ये राहणारे उमेदवार अंतिम टप्प्यात आपण बाद करणार आहातच,त्यांना EWS चा लाभ मिळणार नाहीच. ( आपणच समाजकल्याण परीक्षेतून बाहेर काढले ना ) मग त्या उमेदवारांना आता EWS मधून pass करून खोटे आमिष दाखवत तर आहातच पण ह्या गोंधळात original EWS वर पण अन्याय करत आहात. सरकारच्या व MPSC च्या गोंधळाचा फटका प्रत्येक category च्या उमेदवाराला बसला व इथून पुढे बसणार 🔶 @mpsc_office @Drsuvarnas। स्वतःचेच नियम,अटी ,शर्ती चे उल्लंघन केले आहे व अजून एक सांगतो आपल्याला कोणत्याच एका category चा passing ratio असा वाढवता येत नाही. आपण नेमकं EWS च्या नादात SEBC जास्त उमेदवार जास्त घेतले की EWS जास्त घेतले ????? यापैकी दोन्हीही चूकच. बाकीच्या category उमेदवारांवर तर अन्याय आहेच आहे पण प्रामाणिकपणे SEBC category निवडलेले उमेदवार सुद्धा निकालातून बाहेर पडले. 🔶 @Dev_Fadnavis साहेब स्पर्धा परीक्षा संदर्भात आपले जे कुणी सल्लागार आहेत,ते बदला कारण ते आपल्याला अर्धवट माहिती तर देतातच वरून सरकारची नाचक्की होते कायम. 👉हे कसले आरक्षण दिले मराठ्यांना जे ते घ्यायला तर तयार नाहीतच ,त्यांना नियम मोडायचा आहे पण EWS मधून बाहेर पडण्यास तयार नाहीत. जे असंविधानिक आहे. टीप :- सरकार असो की MPSC संविधान सर्वोच्च राहील,नियमबाह्य कार्यवाही करून मनमानी कारभार करण्याचा अधिकार कुणालाच नव्हता,नाही व नसेल @maha_governor @MahaDGIPR @AjitPawarSpeaks @NANA_PATOLE @INCHarshsapkal @INCIndia @ssaunik @atullondhe @Awhadspeaks @TV9Marathi @abpmajhatv
86
499
13
522
28,770
🔷मा.मुख्यमंत्री @Dev_Fadnavis महोदय.... आपण दोन दिवसापूर्वी विधानपरिषदेत स्पर्धा परीक्षा व #MPSC संदर्भात नेहमीप्रमाणे आदर्शवत काही मुद्दे मांडले 🔶 भविष्यात मोठीं पदभरती करणार 👉 स्पर्धा परीक्षार्थ्यांचा भूतकाळ व वर्तमान उद्धवस्त करून भविष्यकाळाच्या भूलथापांना बळी पाडण्याचे हे षडयंत्र आहे. मागची आश्वासने पूर्ण करण्यापूर्वीच नवीन स्वप्ने दाखवून त्यांच्या भावनांचा बाजार मांडला जातोय. 🔶 मा. @mpsc_office च्या राज्यसेवा नवीन परीक्षा पद्धती साठी दोन वर्ष वाढवून मिळवण्यासाठी आम्ही 3 वेळेस रस्त्यावर उतरून ते 2 attempts मिळवले. मी "नैतिकतेच्या " आधारावर आजही हजारो विद्यार्थ्यांच्या मागणीकडे कठोरपूर्वक दुर्लक्ष करून माझ्या शब्दावर ठाम आहे,पुन्हा त्यासाठी आंदोलन वगैरे करणार नाही पण सरकारच्या नैतिकतेचे काय ?? 👉दोन attempt तर दिले पण अत्यल्प पदांच्या जाहिराती काढून दोन्ही attempt वाया घालवले आपण 2023 ला तेच केले,2024 ला पण तेच. वर्षभर अविरत पाठपुरावा करून कसबसं 2024 ला आपण काढलेली अत्यल्प 205 पदांची जाहिरात आम्ही 477 पर्यंत ओढूनताणून आणण्यास सरकारला भाग पाडलं. 100 खेटे घातले व विनवण्या केल्या त्यासाठी. त्यामुळे 205 ची 477 पर्यंत वाढ झाली. पण उपजिल्हाधिकारी,तहसीलदार सारखी महत्वाची पदे जाणीवपूर्वक आपण जाहिरातीत "न "आणून विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना कायमची तिलांजली आपण दिलीत. इतकी सूडभावना का ?? 🔶 #MPSC Combined grp B & grp C ( non gazetted )2024 जाहिरातीत पण तेच केले. 9 महिने उशिरा जाहिरात आली.त्यात अत्यल्प पदे आहेत. 🔷 आपण बोललात @mpsc_office चा कारभार गेल्या काही वर्षापासून अत्यंत पारदर्शकतेने सुरु आहे. 👉 होय हे खरे आहे. फक्त एक लक्षात असू द्या 2012 मध्ये #MPSC चा कारभार व परीक्षा अतिपारदर्शकतेने चालण्यासाठी काँग्रेस सरकारने अर्थातच तत्कालीन मुख्यमंत्री मा.पृथ्वीराज चव्हाण @prithvrj साहेबांनी राज्यसेवा व इतर परीक्षा यासाठी जो #Objectivepattern आणला त्यानंतर सर्व परीक्षा आपोआप च पारदर्शकतेने पार पडल्या यात शंकाच नाही. 🔶आणि हो #MPSC वर आमचा पूर्ण विश्वास आहेच,पण आम्ही "अंधभक्त" नाहीत ,डोळसपणे विश्वास ठेवतो. त्यामुळेच जेंव्हा जेंव्हा ह्या विश्वासाला तडा जातो/अन्याय होतो तिथे तिथे न्यायासाठी आम्ही लढतोच. म्हणून खालील काही अत्यंत गंभीर मुद्दे आपल्या निदर्शनास आणून देतो. त्यावर आता आपणच @mpsc_office च्या वतीने स्पष्टीकरण द्यावे. 👉 राज्यसेवा 2022 मुख्य परीक्षा भाषा विषयाच्या वर्णनात्मक परीक्षेत गैरव्यवहार/गैरप्रकार कोणता झाला होता ? ज्यामुळे मुख्य परीक्षेचा निकाल लांबवावा लागला. मी स्वतः यावर #MPSC चे तत्कालीन अध्यक्ष यांना जाहीरपणे या गंभीर विषयावर स्पष्टीकरण देण्याची मागणी केली होती. आजपर्यंत @mpsc_office यावर मौन बाळगून का आहे ??? 🔶 1 डिसेंबर 2024 रोजी पार पडलेल्या परीक्षेत ज्यांनी जुन्या प्रवेशपत्रानुसार परीक्षा दिली त्या उमेदवारांना निकाल प्रक्रियेतून वगळण्यात आले असे #MPSC ने निकालादिवशी जाहीर केले. 👉 मूळ मुद्दा हा आहे की जुन्या प्रवेशपत्रावर त्या उमेदवारांना परीक्षा देताच कशी आली? त्यांना कुणीच अडवले नाही?? strict checking असताना हे उमेदवार त्यातून सुटले कसे ? परीक्षेदिवशी संबंधित प्रशासन झोपले होते का ? हा गंभीर प्रकार घडलाच कसा ? #MPSC यावर 100 दिवस mute mode वर का ?? 🔶 #FSO 2023 #Civil चे केवळ दोन पेपर असलेल्या वर्णनात्मक परीक्षेचा निकाल जाहीर करण्यास एक वर्ष लागले.मग त्याच्या 4-5 पट असलेला राज्यसेवा मुख्य परीक्षेचा डोलारा #MPSC कसे सांभाळणार आहे??? उत्तरे हवी आहेत आम्हाला. 🔶 1 डिसेंबर 2024 रोजी झालेल्या परीक्षेत बऱ्याच उमेदवारांनी जाणीवपूर्वक SEBC category न निवडता EWS च ठेवली आहे. हे मुद्दे #MPSC च्या लक्षात आणून दिले तरी काहीच कार्यवाही नाही. final stage ला हे उमेदवार असेही या प्रक्रियेतून बाहेरच पडणार आहेत. पण सध्या original EWS category तील बरेच उमेदवार पूर्व परीक्षा निकालातून कायमचे बाहेर पडले. त्याचे काय करायचे ?? त्यांच्यावर का अन्याय ?? याची उत्तरे कोण देणार ?? 🔶 #MPSC ची पुनर्रचना करायचं म्हणताय 👉 देर आये दुरुस्त आये 🔷 पण #MPSC च्या गोपनीयतेचे काय करायचं?? 👉 कोण आहे झारीतले शुक्राचार्य?? 👉 #MPSC त् गोपनीयता नावाचा प्रकार राहिलाय काय ??? गेल्या 3-4 वर्षापासून अगदी जवळून अनुभवलं आहे 👉 प्रत्येक गोपनीय गोष्ट आधीच उमेदवारांना माहित असते. कसे काय ??? result cut off marks paper checking status meeting minutes ह्या गोपनीय गोष्टी जाहीर होण्यापूर्वी माहित असतातच यासोबत अंतर्गत पत्रव्यवहार,कुरघोडी याचे सर्व details उमेदवारांना कळतात कुठून.?? 👉 हाच काय स्वायत्त घटनात्मक आयोग?
112
671
9
556
17,337
Yogesh nawale patil retweeted
#राज्यसेवा_जागावाढ 2024 #Combine_जागावाढ 2024 #MPSC स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्याकडून शासनाला आलेल्या जाहिरात मध्ये जागा वाढबाबत नम्र विनंती.. 1. MPSC 2024 मध्ये होणारी राज्यसेवा ही शेवटची Objective पॅटर्न ची असल्याने आलेल्या जाहिरात मध्ये जास्तीत जास्त जागावाढ करावी. खूप पदांच्या जागा रिक्त आहेत..🙏 2. MPSC Combine पूर्व 2024 गट ब, गट क जाहिरात मध्ये सुद्धा जागावाढ करावी. खूप जागा सुधारित SEBC आरक्षण मुळे वापस गेलेल्या आहेत. त्या जास्तीत जास्त जागा शासनाने या जाहिरात मध्ये ऍड करून स्पर्धा परीक्षा करणाऱ्या मुलांना दिलासा द्वावा ही विनंती..🙏 @Dev_Fadnavis @AbhiPawarBJP @mieknathshinde @Dev_Fadnavis @DrSEShinde @AbhiPawarBJP @AjitPawarSpeaks @cbawankule @SMungantiwar @dhananjay_munde @ChhaganCBhujbal @SunilTatkare @girishdmahajan @atulsave_india @ChDadaPatil @Dwalsepatil @RVikhePatil @mrhasanmushrif @RajThackeray @mieknathshinde @Dev_Fadnavis @RVikhePatil @AbhiPawarBJP @PawarSpeaks @supriya_sule @uddhavthackeray @RajThackeray @AUThackeray @rautsanjay61 @ajitpawarspeaks @Chh_Udayanraje @NANA_PATOLE @bb_thorat @Jayant_R_Patil @RealBacchuKadu
175
2,390
38
1,211
21,700
सरकारने मराठा मुलांना न्याय द्यावा..750 मुलांचा भविष्याचा प्रश्न आहे...मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या आदेशाची लवकर अमंलबजावणी करावी..शेतकऱ्यांच्या मुलांना न्याय द्यावा..@mieknathshinde @CMOMaharashtra @ChDadaPatil @iambadasdanve @YuvrajSambhaji @AjitPawarSpeaks @Chh_Udayanraje
4
89
1
64
1,269
Yogesh nawale patil retweeted
#नगरपरिषद_जागावाढ मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यानी नगरपरिषद भरती मध्ये रिक्त असलेल्या पदाबाबत जागावाढ संबंधित तात्काळ कार्यवाही करण्याचे आदेश सबंधित विभागाला देऊन सुद्धा सबंधित विभागाला कार्यवाही करण्यास काय हरकत आहे. नगरविकास विभागास विनंती आपण तात्काळ कार्यवाही करावी.🙏 माननीय मुख्यमंत्री यांच्या आदेशाला आज १ महिन्यापेक्षा जास्त वेळ झाला आहे. काल शेवटी सुधारित उत्तरतालीका प्रसिद्ध कऱण्यात आली. लवकरच मार्कलिस्ट जाहीर होईल. त्या अगोदरच जागा रिक्त असताना कित्येक नगर परिषद विद्यार्थ्यांच्या #नगरपरिषद_जागावाढ या रास्त मागणीला दिरंगाई करून दडपून टाकले जात आहे. यावर शासनाने विचार करावा ही नम्र विनंती. आणी नगरपरिषद जागा वाढ करून विद्यार्थ्याच्या मागणीला न्याय द्यावा ही नम्र विनंती..🙏 👉 सोबत फोटो मध्ये रिक्त असलेल्या जागांचा #RTI लावलेला आहे..🙏🙏 @MAHA_UDD @maha_dma @CMOMaharashtra @VijayWadettiwar  @mieknathshinde @Dev_Fadnavis @DrSEShinde @AbhiPawarBJP @AjitPawarSpeaks @NANA_PATOLE
925
5,350
207
2,845
52,154
Yogesh nawale patil retweeted
♦️नगरपरिषद भरती २०२३ जागा वाढ झालीच पाहिजे.. ♦️♦️ #नगरपरिषद_जागावाढ नगरपरिषद संचालनालयामार्फत घेण्यात येणाऱ्या नगर परिषद संवर्ग भरती 2023 मध्ये विविध ८ संवर्गासाठी जाहिरात जुलै २०२३ मध्ये प्रसिद्ध करण्यात आली. १००% पद भरतीची परवानगी असताना देखील माहिती अधिकारातील माहिती नुसार सरळसेवा भरती करीता रिक्त असणाऱ्या सर्व जागांचा समावेश या जाहिरातीत करण्यात आलेला नाही. शासनाने विद्यार्थ्यांच्या मागणीचा सकारात्मक विचार करून, डिसेंबर २०२३ पर्यंत एकूण रिक्त होणाऱ्या जागांचा समावेश या जाहिरातीत करावा.ही नम्र विनंती 🙏🙏 #नगरपरिषद_जागावाढ @CMOMaharashtra @AjitPawarSpeaks @mieknathshinde @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @RVikhePatil @mieknathshinde @AUThackeray @PSamratSakal @deepakbhatuse @rajivkhandekar @BadeVilas @prachee_ps @zee24taasnews @abpmajhatv @TV9Marathi @TulsidasBhoite @saamTVnews @mataonline @girishkuber @PrasannJOSHI  @supriya_sule @kamleshsutar @jdipali @LokshahiMarathi @bbcnewsmarathi @Dev_Fadnavis @AbhiPawarBJP @AdvYashomatiINC @atullondhe @Awhadspeaks @RRPSpeaks @AjitPawarSpeaks @mieknathshinde
1,293
3,527
165
1,998
41,545
Yogesh nawale patil retweeted
Strengthening livestock value chain can equal an increase in: 🌾Food security 👩‍🌾Jobs 💰Income Read how @UNDP is working to improve the lives of #women in #Yemen. 👉https://nitter.gq/t.co/jBtwLMCeAC #GenderEquality
1
20
1
22
7,559